Saturday, February 9, 2019

वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री गिरीष महाजन यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
रविवार 10 फेब्रुवारी 2019 मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.05 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. हिंगोली येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण करतील.

0000000

Friday, February 8, 2019


मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा ;  
आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 8 :- प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेऊ येत आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी याबाबत सखोल माहिती घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिपाली मोतीयेळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागू शकते. याकाळात आयोगाने दिलेल्या निर्देशाचे योग्य पालन करुन निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, भयमुक्त, पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. निवडणूक आयोगाने दिलेली आवश्यक माहिती यंत्रणेला सोप्या शब्दात समजेल अशी दिली जाणार आहे. मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर आता होणार असून मतदारांचे नाव तपासण्यासाठी विविध माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याच्या स्ट्रॉग रुमची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करुन त्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. मागील निवडणुकांचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सज्ज राहून काम केले पाहिजे, अशीही सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिली. 
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पाटील म्हणाले, निवडणूक काळात आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करतांना सर्व बाबी तपासून कराव्यात. निवडणुकीची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होण्यासाठी आयोगाने दिलेले निर्देश चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्वाचे आहे. आवश्यक त्या सुविधांबाबत माहिती घेऊन व्यवस्था केल्यास निवडणूक परिस्थिती चांगली हाताळता येते. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निवडणुका पारदर्शक चांगल्या पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे नाव चांगले राहील असे काम सर्वांना करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री जाधव यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कार्यवाही करावी. तसेच शस्त्र परवाना धारकांनी नियमाचे पालन करावे. याकाळात अवैध कामे होणार नाहीत याची काळजी घेऊन मतदान प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे सांगितले.  
आयोगाकडून निवडणूक संदर्भात वेळोवळी आढावा घेतला जात असून मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही यासह मतदार जागृतीसाठी उपक्रम, आचारसंहिता पथक, मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम, मतदारांना सुविधा, टेलीकॉम कनेक्टीव्हीटी, विद्युत, पिण्याचे पाणी, फर्निचर व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था, वाहन, मतमोजणी केंद्र, निरीक्षकांसाठी सुविधा, विश्रामगृहे, हेलीपॅड, सभा मैदानाची माहिती यासह विविध विषयांवर चर्चा करुन उपाययोजनांबाबत संबंधितांना निर्देश व जबाबदारी देण्यात आली.  
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती मोतियेळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील व्यवस्थेबाबत माहिती संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी पोलीस, महसूल अधिकारी यांचेसह संबंधीत विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000000


Thursday, February 7, 2019

हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 7 :-जिल्हयात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. मररोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी  झाडे उपटुन नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी.  सुखदेव यांनी केले आहे.
000000

डाक तिकिट प्रदर्शनास
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
नांदेड, दि. 7 :- शालेय विद्यार्थांसाठी डाक तिकिटांचे प्रदर्शन नुकतेच येथील भारतीय डाक विभागात भरविण्यात आले होत. त्यास विद्यार्थांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. डाक तिकीटा विषयी रुची वाढावी यादृष्टीने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनासाठी  निवृत्त शिक्षक श्री सोनावणे यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संग्रहित तिकिटांचा यावेळी लाभ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना तिकीटाविषयी माहिती सांगण्यात आली. या तिकीट प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी डाक अधिक्षक कार्यालय तसेच मुख्य डाकघर नांदेड येथील कर्मच्याऱ्यांनी प्रयत्न केले.
00000


रस्ता सुरक्षा नियमांची जनजागृती
नांदेड, दि. 7 :- रस्ता सुरक्षा अभियानात रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन करण्याविषयी पथनाट्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. यातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने होणारी जिवित हानी याची माहिती देण्यात आली.
बारड, तरोडा नाका, आनंदनगर चौक येथे आयोजित पथनाट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पथनाट्याच्या पथकासोबत वायुवेग पथक क्र. 1 चे मोटार वाहन निरीक्षक सुनिल पायघन, सहा. मोटार वाहन निरिक्षक संजय पल्लेवाड यांची उपस्थिती होती. यावेळी रस्ता सुरक्षेविषयी लिफलेट, माहिती पत्रके व माहिती पुस्तिका नागरिकांना देण्यात आली. तसेच राज्य परिवहन महामंडळ परिसरात वाहन चालक, वाहक यांचा प्रबोधनवर्ग घेण्यात आला. सुरक्षित वाहतुक, इंधन बचतीबाबत माहिती देवून पुस्तिका, माहिती पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी नागरिकांसह चालक, वाहक, तांत्रिक कामगार उपस्थित होते.
00000


प्रधानमंत्री किसान सन्‍मान
निधी योजनेची अंमलबजावणी सुरु
नांदेड, दि. 7 :- शेतकऱ्यांना निश्चित उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी केंद्र सरकार पुरस्‍कृत प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेची लोहा तालुक्यात अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली असून अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुंटूबाला प्रती वर्षी 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्‍यात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
या योजनेची तात्‍काळ अंमलबजावणी करण्‍यासाठी तहसिलदार यांनी एक विशेष बैठक घेतली. त्‍यात तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी / तलाठी यांना योजनेची माहिती दिली व या योजनेची गाव पातळीवर माहिती देवून तात्‍काळ अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्‍याचे निर्देश दिले.
       प्रत्‍येक गाव निहाय खातेदार शेतकऱ्यांची संगणीकृत यादी करण्‍यात येणार आहे. तसेच वनहक्‍क कायद्याअंतर्गत जिल्‍हा समितीने पात्र केलेल्‍या शेतकरी कुटूंबाचा सुध्‍दा या योजने करीता समावेश करण्‍यात यावा अशा सुचना देण्‍यात आल्‍या.
       ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्‍टर पर्यंत असेल त्‍यांना या योजना अनुज्ञेय आहे. खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्‍यानंतर ज्‍या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्‍टर किंवा त्‍यापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबाची यादी तयार करण्‍यात येणार असून 1 फेब्रूवारी 2019 रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. या यादीत पात्र खातेदारांचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक आदि माहिती संकलीत करण्‍यात येणार आहे.
या योजनेत संवैधानिक पद धारण करणारे, केलेले आजी माजी व्‍यक्‍ती, आजी माजी राज्‍यसभा सदस्‍य, माजी खासदार, आजी राज्‍यमंत्री, माजीमंत्री विधानसभा, आजी-माजी महानगरपालीकेचे महापौर, विधान परीषद सदस्‍य, जिल्‍हा परीषदेचे अध्‍यक्ष, केन्‍द्र व राज्‍य शासनाचे अधिकारी, कर्मचारी स्‍वायत्‍त संस्‍थाचे अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेले व्‍यक्‍ती, 10 हजार रुपये किंवा त्‍यापेक्षा जास्‍त निवृत्‍तवेतनधारक व्‍यक्‍ती, नोंदणीकृत व्‍यवसायीक डॉक्‍टर, वकील, चार्टर्ड आकाऊटंट सनदी लेखापाल, आर्किटेक्‍ट  इत्‍यादी क्षेत्रातील व्‍यक्‍तींना या योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी पात्र असणार नाहीत, असेही म्हटले आहे.
000000


कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 11 फेब्रुवारी 2019 रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. सगरोळी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सव शेतकरी व महिला मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली. दुपारी 12 वा. सगरोळी येथून मोटारीने बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. कृषि, पणन व पाणीपुरवठा विभाग देगलूर व बिलोली उपविभाग आढावा बैठक. स्थळ- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालय बिलोली. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथून मोटारीने मांजरम ता. नायगावकडे प्रयाण. सायं 4 वा. रयतक्रांती संघटना शाखा उद्घाटन कार्यक्रम. स्थळ- मांजरम ता. नायगाव. सायं 5 वा. मांजरम गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा व भव्य शेतकरी मेळावा. स्थळ- मांजरम ता. नायगाव. रात्री 8 वा. मांजरम येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...