कृषि
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन,
पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 11
फेब्रुवारी 2019 रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड रेल्वे स्थानक
येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय
विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड
येथून मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. सगरोळी येथे आगमन व
राखीव. सकाळी 11 वा. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आयोजित कृषि तंत्रज्ञान महोत्सव
शेतकरी व महिला मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली. दुपारी 12 वा.
सगरोळी येथून मोटारीने बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह
बिलोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. कृषि, पणन व पाणीपुरवठा विभाग देगलूर व
बिलोली उपविभाग आढावा बैठक. स्थळ- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालय
बिलोली. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह बिलोली येथे राखीव. दुपारी 3 वा.
शासकीय विश्रामगृह बिलोली येथून मोटारीने मांजरम ता. नायगावकडे प्रयाण. सायं 4 वा.
रयतक्रांती संघटना शाखा उद्घाटन कार्यक्रम. स्थळ- मांजरम ता. नायगाव. सायं 5 वा.
मांजरम गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा व भव्य शेतकरी
मेळावा. स्थळ- मांजरम ता. नायगाव. रात्री 8 वा. मांजरम येथून मोटारीने लातूरकडे
प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment