Saturday, February 2, 2019


हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 2 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु असून शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
हरभरा घाटेअळीसाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटून नष्ट करावीत. हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे कृषि संदेशात म्हटले आहे.  
00000


सोमवारी कर्करोग तपासणी शिबीर
नांदेड दि. 2 :- जागतिक कर्करोग दिन व सप्ताहनिमित्त सोमवार 4 फेब्रुवारी रोजी श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड व स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे सकाळी 9  ते दुपारी 2 यावेळेत सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी कर्करोग तपासणी शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्हा रुग्णालय नांदेड येथे मुख कर्करोग तपासणी व स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे स्त्री गर्भाशय कर्करोग व स्तनाचा कर्करोग याची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधीत कर्करोगग्रस्त रुग्ण व संशयीत कर्करोग रुग्णांनी या मोफत कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
000000


कौशल्य विकास व उद्योजकता
मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा 
नांदेड दि. 2 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 3 फेब्रुवारी 2019 रोजी लातूर येथून दुपारी 2 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 3.20 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथून ट्रूजेट एअरवेज एअरलाईन्सच्या विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000


कौशल्य विकास व उद्योजकता
मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा 
नांदेड दि. 2 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 3 फेब्रुवारी 2019 रोजी लातूर येथून दुपारी 2 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 3.20 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथून ट्रूजेट एअरवेज एअरलाईन्सच्या विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000

Friday, February 1, 2019


 दिव्यांगासाठी साहित्याचे विहित पद्धतीने अर्ज ;
संस्थेकडून प्राप्त शिफारशीचा विचार नाही
नांदेड दि. 1 :- आमदार व खासदार यांचेकडून दिव्यांगासाठी साहित्य पुरवठा करण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर विहित पद्धतीने लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. त्यामुळे आमदार व खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी एखादा संस्थेकडून प्राप्त शिफारशीचा विचार करता येणार नाही. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींने अशा संस्थाकडून दिव्यांग साहित्य उपलब्ध होण्यासाठी विनंती अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास अथवा संबंधीत संस्थेकडे करु नये, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तीना आमदार व खासदार निधीतून साहित्य पुरवठा करण्यासाठी काही संस्थांकडून आमदार व खासदारांच्या नावाने शिफारस पत्र गोळा करणे चालू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
000000


सेवानिवृत्त वेतनधारकांना
सातवा वेतन आयोगानुसार वेतन प्रदान
नांदेड दि. 1 :- राज्य शासनाच्या सेवेतून 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांना जानेवारी 2019 चे निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगानुसार तत्परतेने वेळेत आज 1 तारखेला प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात जिल्ह्यात 21 हजार पैकी 18 हजार निवृत्तीवेतनधारकांना सातवा वेतन आयोगानुसार हे वेतन देण्यात आले आहे. एक जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत निवृत्ती वेतनातील फरकाची रक्कम समान 5 हप्त्यात प्रतिवर्षी जूनमध्ये रोखीने देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 24 जानेवारी 2019 अन्वये जिल्हा कोषागार कार्यालयाने सात दिवसात 18 हजार निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्याचे काम पूर्ण केले. निवृत्तीवेतन विभागात महिला कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करुन 1 तारखेला वेतनाची अदायगी नेहमी प्रमाणे केली आहे. यासाठी अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, श्री. राजे, उपकोषागार अधिकारी श्री संगवे, देशमुख, दिपक गवलवाड, सारिका सुंकेवार, योगीता मामडी, आरती बोचकरी, तृप्ती माने, किर्ती अंबरकर, माया सुर्यवंशी, गवारे, काटोडे, वसमी यांनी परिश्रम घेतले.
00000


जिल्हा रुग्णालयात ईपिलेप्सी
फेफरे / फिट्स आजाराचे मोफत शिबीर
नांदेड दि. 1 :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ईपिलेप्सी फाऊडेशन मुंबईच्या सयुंक्त विद्यमाने रविवार 10 फेब्रुवारी रोजी श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत भव्य ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स) या आजाराबाबत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णांची न्युरोलॉंजिस्टतर्फे मोफत इसीजी चाचणी, फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन व रक्त तपासणी तसेच रुग्णांसाठी मोफत औषधी देण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी व इतर ईपिलेप्सी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ए. पी. वाघमारे यांनी केले आहे.
00000

  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...