Friday, May 18, 2018


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
आरक्षण सोडतीचे आज आयोजन  
संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

        नांदेड, दि. 18 :- मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली शनिवार 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार आहे. सर्व संबंधीत व्‍यक्‍तींनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांचे आदेशान्वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकीकरीता जिल्‍हाधिकारी नांदेड यांना जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) म्‍हणून घोषीत केले आहे. त्‍यानुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया घेण्‍याचे प्राधिकरणाचे निर्देश आहेत.
            मुदखेड कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 17 गावे समाविष्‍ट असून धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 56 गावे समाविष्‍ट आहेत. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे दिनांक 5 डिसेंबर 2017 च्‍या आदेशानुसार गावातील गावनिहाय खातेदारांची संख्‍या विचारात घेवून सदर गावाचे एकुण 15 गणांमध्ये (विभाग) विभाजन करून महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील तरतूदीनूसार 15 गणापैकी महिलांसाठी – 2 गण,  इतर मागासवर्गीयांसाठी – 1 गण, विमुक्‍त जाती / भटक्‍या जमाती साठी – 1 गण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी 1 गण असे एकुण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्‍दतीने जाहीर करावे. तसेच गणाचे आरक्षण काढताना संबंधीत बाजार क्षेत्रातील  लोकसभा / राज्‍यसभा सदस्‍य,  विधानसभा / विधानपरिषद सदस्‍य, जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर करण्‍याचे निर्देश आहेत.
        त्यानुषंगाने मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली दिनांक 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार असून उपरोक्‍त सर्व सन्‍माननीय व्‍यक्‍तींना सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्‍याचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
0000000




पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
        नांदेड, दि. 18 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            सोमवार 21 मे 2018 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने सकाळी 10 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन विकास (डीपीडीसी) बैठक. स्थळ- नियोजन भवन, मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 वा. शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण करतील.
000000

Thursday, May 17, 2018


आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचा
बुधवारी भरती मेळावा   
        नांदेड, दि. 18 :- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुणे येथील नामांकित मर्सडीज बेंझ कंपनीत फिटर, डिझेल-मोटार मेकानिक, वेल्डर, सिटमेटल, पेंटर जं., ट्रॅक्टर मे., मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्रांइडर, टीडीएम, इलेक्ट्रीशियन या व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवार भरती बुधवार 23 मे 2018 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील सभागृहात सकाळी 11 वा. होणार आहे.
            पात्र उमेदवारांनी एसएससी, आयटीआय प्रमाणपत्र सोबत आणावे. या संधीचा जास्तीतजास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
0000000


ऑडिटर्स कार्यशाळेचे आयोजन
        नांदेड, दि. 17 :- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, जिल्हा विशेष लेखापरिक्षक (वर्ग 1), सहकारी संस्था नांदेड व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे संचलित सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 20 मे 2018 कालावधीत चार्टड अकौटंट फर्म व प्रमाणित लेखापरिक्षक (सहकारी संस्था) यांचेसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा सभागृह शिवाजीपुतळा नांदेड येथे ऑडिटर्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चार्टड अकौटंट फर्म व प्रमाणित लेखापरिक्षक (सहकारी संस्था) यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1  डी. ए. बायसठाकूर व लातूर सहकारी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. जे. ठोंबरे यांनी केले आहे.
            या कार्यशाळेत लेखापरिक्षकाची लेखापरिक्षण करताना भुमिका, संगणकीय पद्धतीने लेखापरिक्षण व शासन धोरणानुसार लेखापरिक्षण अहवाल रचना कशी असवा, संपत्ती मुल्यांकण पद्धती, भाग नेटवर्थ, संस्था नेटवर्थ आणि कर्ज उभारणी मर्यादा व काढण्याची पद्धती, सहकारी संस्था प्रकार निहाय 1 ते 53 फॉर्म, परिशिष्ट भरण्याची व तपासण्याची पद्धती, संस्था निधी व खर्चाचा रेशिओ, टीडीएस, जीएसटी, विशेष अहवाल सादर करण्याची पदृधती भाग (अ) - प्रशासकीय, भाग (ब) फौजदारी, लेखापरिक्षण करताना घ्यावयाची दक्षता, सहकारी संस्थेचा मार्गदर्शक म्हणून लेखापरिक्षकाची भुमिका, आर्थिक पत्रके विश्लेषण, 97 व्या घटना दुरुस्ती मधील झालेले बदल व लेखापरिक्षण करताना सहकारी संस्थानी झालेल्या बदलाची अंमलबजावणी केली आहे काय याची नोंद घेणे. ताण-तणाव व्यवस्थान व व्यक्तीमत्व विकास अशा विविध विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.        
00000000


बोंडअळीने नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना मदत वाटपात लोहा तालुका ठरला जिल्‍हयात अव्‍वल
लोहा तालुक्‍यातील 9471 शेतकऱ्यांना पावने तीन कोटींची मदत
                 नांदेड, दि. 17 :- लोहा तालुक्‍यातील 36 गावातील कापूस पिकावरील बोंडअळीच्‍या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त 9471 शेतक-यांना पावने तीन कोटी रुपयांची मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यात जमा करण्‍यात आली आहे. शेतक-यांना तातडीने अर्थिक मदत देण्‍यात लोहा तालुका हा नांदेड जिल्‍हयात अव्‍वल ठरला आहे. अशी माहिती तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी दिली आहे.
      जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी  जयराज कारभारी, कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सन 2017 च्‍या खरीप हंगामामध्‍ये कापूस पिकावर बोंडअळीचे प्रादुर्भाव व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍यामुळे कापूस व धान पिकाचे नुकसानीसाठी बाधीत शेतक-यांना शासनाकडून मदत देण्‍यासंदर्भात महसूल व कृषि विभागाच्‍या क्षेत्रिय अधिका-याकडून पंचनामे करण्‍यात आले. त्‍यात लोहा तालुक्‍यातील 36 गावातील 9471 शेतक-यांचे नुकसान झाले. सदर नुकसानग्रस्‍त शेतक-यांना 2,75,69,841 रुपयाची मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यावर जमा करण्‍यासाठी 16 मे रोजी सदर रक्‍कमेचा धनादेश बँकेकडे जमा करण्‍यात आला आहे. सदर रक्‍कमेतून कोणत्‍याही बँकेने कोणत्‍याही प्रकारची वसूली करुनये, आसे निर्देश देण्‍यात आले आहेत.
लोहा तालुक्‍यातील नुकसान ग्रस्‍त गावे व कंसात मदत देण्‍यात आलेल्या शेतक-यांची संख्‍या पुढील प्रमाणे आहे. आडगाव (274), आंबेसांगवी (121), आंडगा (170), आष्‍टूर (668), अंतेश्‍वर (155), बामणी (60), बेरळी (641), बेटसांगवी (348), भाद्रा (169), भारसवाडा (74), भेंडेगाव (213), बोरगाव की (286), बोरगाव आ (292), बोरगाव (को (163), चोंडी (307), चिंचोली प.ऊ (53), चितळी (350), दगडगाव (405), दगडसांगवी (242), दापशेड (288), डेरला (112), देऊळगाव (484), ढाकणी (116), धनज बु (236), धनज खु (160), धानोरा मक्‍ता (975), धानोरा शे (200), धावरी (247), डोलारा (219), डोंगरगाव (94), डोणवाडा (226), घोटका (143), घुगेवाडी (138), गोलेगाव प.क. (309), गोलेगाव प.ऊ (521), गौंडगाव (12),
बोंडअळीच्‍या प्रादुर्भावामुळे नुकसान ग्रस्‍त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत देण्‍यात आल्‍यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्‍यक्‍त करण्‍यात येत असून सदर मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यात जमा करणारा लोहा तालुका नांदेड जिल्‍हयात अव्‍वल ठरला आहे. तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांच्‍या मार्गदर्शनाखाली अव्‍वल कारकुन सुरेखा सुरुंगवाड, लिपीक मेघा लांडगू यांचा सदरील कामात सहभाग आहे.
0000


शिल्पनिदेशकाची तासिका तत्वावर
पदभरतीसाठी 2 जूनला मुलाखती
        नांदेड, दि. 17 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शिल्पकारागीर योजनेंतर्गत तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी शिल्पनिदेशकांचे पद तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर भरण्यात येणार आहे. इच्छूक पात्र उमेदवारांनी 2 जून 2018 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्रांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
            जोडारी, घर्षक, मशिनिष्ट, साचेकार, वेल्ड, कटिंग अँड सुईंग, मेसन, टीडीएम, वायरमन, गणित निदेशक, चित्रकला निदेशक, ड्राफ्टसमन (सिव्हील / मेकॅनिक), यांत्रिक मोटारगाडी (एमएमव्ही), टॅक्टर मेकॅनिक, इलेक्ट्रानिक्स मेकॉ., आर्किटेक्चरल असिस्टंट, कातारी, एम्प्लायबिलिटी स्किल, पत्रेकारागीर. या व्यवसायासाठी उमेदवार हा मेकॉनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील अभियांत्रिकी मधील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी किंवा उत्तीर्ण असावा. त्यानंतरचा एक किंवा दोन वर्षाचा संबंधीत व्यवसायातील अनुभव असावा. आयटीआय प्रमाणपत्र धारकांनी एनसीव्हीटी / एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असावा. तसेच शिल्पनिदेशक एम्प्लायबिलिटी स्किल या पदाकरीता एमबीए / बीबीए  ही पदवी असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक/गटनिदेशक यांना प्रधान्य देण्यात येईल. सध्या तासिक तत्वावरील सैद्धातिकसाठी 72 रुपये व प्रात्यक्षिकासाठी 36 रुपये प्रती तास याप्रमाणे मानधन मिळेल. तसेच मानधनाची रक्कम वाढविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून तासिका तत्वावरील निदेशकांना वाढीव मानधन मिळण्याची शक्यता आहे. असेही संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत
आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 17 :- विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी मत्स्य व्यवसाय सहाकारी संस्था आदिवासी शेतकरी लाभार्थी, महिला, युवक-युवतींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत गुरुवार 31 मे 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.  
            विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी युवक-युवतींना व्हिडीओ एडीटींग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय केंद्र स्थापन करणे, मत्सव्यवसाय आदिवासी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देणे, सभासदांना मत्स्य जाळे पुरवठा करणे, अनुसूचित जातीच्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना जंगलातील वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण व युवकांना ऑटो मोबाईलचे प्रशिक्षण, युवकांना बिल्डींग सुपरवायझरचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम करुन प्लास्टिक अस्तरीकरणासह ठिबक सिंचन संच व भाजीपाला फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य या योजनेचा समावेश आहे.
            लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे माहिती सुविधा केंद्रात परिपुर्ण अर्ज 31 मे 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित नमुन्यातील कोरे अर्ज माहिती सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे संपर्क साधावा.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...