Thursday, May 17, 2018


विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत
आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 17 :- विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी मत्स्य व्यवसाय सहाकारी संस्था आदिवासी शेतकरी लाभार्थी, महिला, युवक-युवतींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत गुरुवार 31 मे 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.  
            विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी युवक-युवतींना व्हिडीओ एडीटींग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय केंद्र स्थापन करणे, मत्सव्यवसाय आदिवासी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देणे, सभासदांना मत्स्य जाळे पुरवठा करणे, अनुसूचित जातीच्या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना जंगलातील वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण व युवकांना ऑटो मोबाईलचे प्रशिक्षण, युवकांना बिल्डींग सुपरवायझरचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम करुन प्लास्टिक अस्तरीकरणासह ठिबक सिंचन संच व भाजीपाला फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य या योजनेचा समावेश आहे.
            लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे माहिती सुविधा केंद्रात परिपुर्ण अर्ज 31 मे 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित नमुन्यातील कोरे अर्ज माहिती सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे संपर्क साधावा.
000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...