Thursday, May 17, 2018


बोंडअळीने नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना मदत वाटपात लोहा तालुका ठरला जिल्‍हयात अव्‍वल
लोहा तालुक्‍यातील 9471 शेतकऱ्यांना पावने तीन कोटींची मदत
                 नांदेड, दि. 17 :- लोहा तालुक्‍यातील 36 गावातील कापूस पिकावरील बोंडअळीच्‍या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त 9471 शेतक-यांना पावने तीन कोटी रुपयांची मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यात जमा करण्‍यात आली आहे. शेतक-यांना तातडीने अर्थिक मदत देण्‍यात लोहा तालुका हा नांदेड जिल्‍हयात अव्‍वल ठरला आहे. अशी माहिती तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी दिली आहे.
      जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी  जयराज कारभारी, कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सन 2017 च्‍या खरीप हंगामामध्‍ये कापूस पिकावर बोंडअळीचे प्रादुर्भाव व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍यामुळे कापूस व धान पिकाचे नुकसानीसाठी बाधीत शेतक-यांना शासनाकडून मदत देण्‍यासंदर्भात महसूल व कृषि विभागाच्‍या क्षेत्रिय अधिका-याकडून पंचनामे करण्‍यात आले. त्‍यात लोहा तालुक्‍यातील 36 गावातील 9471 शेतक-यांचे नुकसान झाले. सदर नुकसानग्रस्‍त शेतक-यांना 2,75,69,841 रुपयाची मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यावर जमा करण्‍यासाठी 16 मे रोजी सदर रक्‍कमेचा धनादेश बँकेकडे जमा करण्‍यात आला आहे. सदर रक्‍कमेतून कोणत्‍याही बँकेने कोणत्‍याही प्रकारची वसूली करुनये, आसे निर्देश देण्‍यात आले आहेत.
लोहा तालुक्‍यातील नुकसान ग्रस्‍त गावे व कंसात मदत देण्‍यात आलेल्या शेतक-यांची संख्‍या पुढील प्रमाणे आहे. आडगाव (274), आंबेसांगवी (121), आंडगा (170), आष्‍टूर (668), अंतेश्‍वर (155), बामणी (60), बेरळी (641), बेटसांगवी (348), भाद्रा (169), भारसवाडा (74), भेंडेगाव (213), बोरगाव की (286), बोरगाव आ (292), बोरगाव (को (163), चोंडी (307), चिंचोली प.ऊ (53), चितळी (350), दगडगाव (405), दगडसांगवी (242), दापशेड (288), डेरला (112), देऊळगाव (484), ढाकणी (116), धनज बु (236), धनज खु (160), धानोरा मक्‍ता (975), धानोरा शे (200), धावरी (247), डोलारा (219), डोंगरगाव (94), डोणवाडा (226), घोटका (143), घुगेवाडी (138), गोलेगाव प.क. (309), गोलेगाव प.ऊ (521), गौंडगाव (12),
बोंडअळीच्‍या प्रादुर्भावामुळे नुकसान ग्रस्‍त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत देण्‍यात आल्‍यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्‍यक्‍त करण्‍यात येत असून सदर मदत शेतक-यांच्‍या थेट बँक खात्‍यात जमा करणारा लोहा तालुका नांदेड जिल्‍हयात अव्‍वल ठरला आहे. तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांच्‍या मार्गदर्शनाखाली अव्‍वल कारकुन सुरेखा सुरुंगवाड, लिपीक मेघा लांडगू यांचा सदरील कामात सहभाग आहे.
0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...