Wednesday, March 21, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
शुक्रवार, शनिवारी आयोजन
नांदेड दि. 21:- उज्ज्वल नांदेड या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवार 23 मार्च व शनिवार 24 मार्च 18 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   
 शुक्रवार 23 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते 1 यावेळेत औरंगाबाद येथील प्रा.अनिल कोलते हे सामान्य विज्ञान याविषयावर व  दुपारी 2 ते 5 यावेळेत प्रा. विठ्ठल पुंगळे हे भूगोल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवार 24 मार्च 2018 रोजी अकोला येथील अॅड अनंत खेळकर हे 'डिप्रेशन टू डेस्टीनेशन' हा प्रेरणादायी व हास्य कार्यक्रम सकाळी 10 ते 11.30 यावेळेत करतील. त्यानंतर पुणे येथील प्रा. सचिन ढवळे हे गणित व बुध्दिमत्ता कल चाचणी या विषयावर सकाळी 11.30 ते सांय 5 यावेळेत मार्गदर्शन करतील.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संबंधितांनी या मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
0000


शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा
31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार 
            नांदेड दि. 21:- जिल्‍ह्यातील स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये शनिवार 31 मार्च 2018 रोजी शासकीय व्‍यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेशीत केले आहे.
            महाराष्‍ट्र राज्‍य कोषागार अधिनियम 1968 अन्‍वये जिल्‍हाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या नांदेड शहरातील व तालुका मुख्‍यालयातील सर्व शाखा कार्यालये शुक्रवार 31 मार्च 2018 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत शासकीय व्‍यवहारांसाठी सुरु राहतील.   
000000


आरटीओ कार्यालयात  
मंगळवारी वाहनांचा लिलाव
नांदेड, दि. 21 :- दीर्घ कालावधीपासून अटकावून असलेली वाहने वाहनधारकांना नोटीस देवूनही सोडवून घेतली नसल्याने या वाहनांचा जाहीर लिलाव मंगळवार 27 मार्च 2018 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे दुपारी 1 वा. करण्यात येणार आहे. या लिलावासंदर्भात अटी व शर्ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत मोटार वाहन कायदा उल्लंघन करताना आढळून आलेली तसेच वाहनाचा कर भरणा न केलेली वाहने अटकावून ठेवण्यात येतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000

Tuesday, March 20, 2018


दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा  मार्गदर्शन शिबिर

उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवार दि. 23 मार्च व शनिवार 24 मार्च 18 रोजी डॉ.श्ंकरराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड या ठिकाणी दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 शुक्रवार दि. 23 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात प्रा.अनिल कोलते,औरंगाबाद हे सामान्य विज्ञान या विषयावर व  दु.2 ते 5 या वेळेत प्रा.विठठल पुंगळे,औरंगाबाद हे भूगोल या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवार दि.24 मार्च रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत अँड अनंत खेळकर,अकोला हे विद्यार्थ्यांसाठी ' डिप्रेशन टू डेस्टीनेशन ' हा प्रेरणादायी व हास्य कार्यक्रम सादर करतील त्यानंतर स.11.30 ते सांय 5 या वेळेत प्रा.सचिन ढवळे,पुणे हे गणित व बुध्दिमत्ता कल चाचणी या विषयावर मार्गदर्शन करतील.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

सदर मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.


बेपत्ता महिलेचा शोधा
        नांदेड, दि. 20 :- पटेल कॉलनी नांदेड येथील सौ. जयश्री गणेश मठपती (वय 30) ही रविवार 18 मार्च 2018 पासून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग-गोरा, बांधा सडपातळ, अंगात काळी क्रिम रंगाची पंजाबी, उंची 5 फुट, भाषा मराठी, हिंदी येते. या वर्णनाची महिला बेपत्ता असून कोणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी केले आहे.
000000

Monday, March 19, 2018


शासकीय तंत्रनिकेतन येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
युवा क्षमतेचा योग्य वापर करुन
देशाचा नावलौकिक वाढावावा
- सहसंचालक महेश शिवनकर
       
नांदेड, दि. 19 :- तज्ज्ञ अभियंता देशाची ताकद असून नवीन अडचणीवर मात करण्यासाठी तज्ज्ञ अभियंता उपाय शोधू शकतात. आपल्या युवा क्षमतेचा योग्य वापर करुन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन  औरंगाबाद येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक महेश शिवनकर यांनी केले.
"युवोत्सव 2018" ह वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवनकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच पठाण यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.  
             
यावेळी प्राचार्य श्री पोपळे यांनी अध्यक्षीय भाषणात स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला वाव मिळतो, असे सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेतून उत्तीर्ण होऊन जाणारा सर्वोत्तम विद्यार्थी निवडण्याचा नवीन उपक्रम यावर्षीपासून सुरु करत असल्याचे सांगून यावर्षासाठी स्थापत्य तृतीय वर्षाची विद्यार्थीनी कु. नम्रता गरड हिची निवड करण्यात आल्याचे सांगितले.
कोषागार अधिकारी श्री पाचंगे यांनी देशाला चांगल्या अभियंत्यांची गरज असून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच पठाण यांनी स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला अविष्कारांना वाव मिळू शकतो. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी यातून पुढे येतात असे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रा. सकळकळे, प्रा. सी. व्ही लहाडे, डी. एम. लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, प्रा. श्री. व्ही. बी. उष्केवार, डॉ. एस. एस. चौधरी, प्रा. एस. एम. कंधारे, प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. व्ही. यु. दातीर, डॉ. व्ही. एम. यादव, डॉ. ए. ए. जोशी, डॉ. एस. व्ही. बेट्टीगिरी, विद्यार्थी संसद सचिव विठ्ठल नरवटे, जिमखाना उपाध्यक्ष ए. बी. दमकोंडवार, जिमखाना सचिव प्रदीप सेवलीकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आर. के. देवशी, चंदना टेकाळे, सुरज आठवले, विना देशमुख यांनी केले. तर "युवोत्सव 2018"चे स्नेहसंमेलन प्रभारी अधिकारी डॉ. ए. डब्ल्यू पावडे यांनी स्नेहसंमेलन यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...