Friday, November 10, 2017

हरभरा, गहु बियाणाचा
ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम  
नांदेड, दि. 10 :- रब्बी 2017 हंगामात नांदेड जिल्हयासाठी कृषि आयुक्तालय तसेच महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने हरभरा व गहु या पिकाच्या प्रमाणीत बियाणे ग्राम बिजोत्पादनाद्वारे अनुदानित तत्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेतील बियाणे महाबीजचे विक्रेता व उपविक्रेता यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. आल्लमवार यांनी केले आहे.
            नांदेड जिल्हयासाठी हरभरा पिकामध्ये 1 हजार 185 क्विंटल व गहु पिकामध्ये 858 क्विंटल लक्षांक दिलेले असुन योजनेचे इतर ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत. गावाची आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड जिल्हा स्तरावर कृषि विभागाचे संबंधित अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक महाबीज यांनी संयुक्तपणे समन्वयाने करावयाची आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा, आधारकार्ड  यांचे झेरॉक्स प्रतिसह स्वसाक्षांकीत व भ्रमणध्वनी क्रमांक यांचेसह शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रवर्ग निहाय प्राप्त निधीनुसार सर्वसाधारण प्रवर्ग 35 टक्के, अनुसूचित जाती  35 टक्के आणि अनुसूचित जमाती 30 टक्के या प्रमाणे प्रवर्ग निहाय शेतकऱ्यांची लाभार्थी निवड यादी तयार करण्यात येईल. निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत कडधान्य (हरभरा) व गळीतधान्य (भुईमुग) बियाणेसाठी 60 टक्के व तृणधान्य (गहू) बियाणेसाठी 50 टक्के अनुदानीत दराने स्त्रोत बियाणे पुरवठा करावयाचा आहे. म्हणजेच एका एकरसाठी 20 किलो हरभरा किंवा 40 किलो गहु पुरवठा अनुदानावर करावयाचा आहे. जर त्या शेतकऱ्याचे क्षेत्र 40 आर पेक्षा कमी असेल तर त्याला हा लाभ देता येणार नाही.
कडधान्य-हरभरा-स्त्रोत बियाणे किमतीच्या जास्तीत जास्त 60 टक्के किंवा 4 हजार 800 रुपये प्रति क्विं. याप्रमाणे जे कमी असेल ते  तृणधान्य-गहू-स्त्रोत बियाणे किमतीच्या जास्तीतजास्त 50 टक्के किंवा 1 हजार 600 रुपये किंवा प्रति क्विं. या प्रमाणे जे कमी असेल ते. निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि खात्यामार्फत बियाणे खरेदी करण्याचे परमीट दयावयाचे आहे. बियाणे परमीटचा पुरवठा महाबीज यांचेकडून करण्यात येईल. या योजनेतील बियाणे महाबीजचे विक्रेता व उपविक्रेता यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन केले आहे.
हरभरा व गहु बियाण्याचे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमाकरीता विक्री दर, अनुदान हंगाम रब्बी 2017
पिक व जात
पॅकिंग साईज किलो
विक्री दर रुपये क्विं.
अनुदान प्रति क्विंटल
लाभार्थी शेतकऱ्यांसाठी
अनुदान विक्री किंमत प्रति क्विं.
अनुदान विक्री किंमत प्रति पिशवी
हरभरा विजय, आयसीसीव्ही-37
20
9,000/-
4,800/-
4,200/-
840/-
गहू लोक-1 जिडब्ल्यु-496
40
3,200/-
1,600/-
1,600/-
640/-
फुले नेत्रावती, एचआय-1544, एमअसीएस-6478, युएस-428
20
3,500/-
1,600/-
1,900/-
380/-

000000
बेपत्ता मुलीचा शोध  
            नांदेड, दि. 10 :- सिड्स कंपनी औद्योगिक वसाहत नांदेड येथील मदनसींह ठाकुर यांची मुलगी कु. मंजु वय 16 वर्षे ही जानेवारी 2017 पासून बेपत्ता आहे. या मुलीचा रंग गोरा, उंची 5 फुट, अंगात निळ्या रंगाचे टीशर्ट, काळ्या रंगाची जीन्स पँट व पाठीवरची स्कूल बॅग आहे. सोबत आधार कार्ड नंबर 979392131887 व मोबाईल नंबर 9502287422 हा आहे. ही मुलगी संबंधितांना आढळल्यास नांदेड शिवाजीनगर पोलीस स्टेशन दुरध्वनी 02462-256520 व सहा. पोलीस निरीक्षक एस. बी. लहाने मो. 9923258716 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सा. पोलीस निरीक्षक एस. बी. लहाने यांनी केले आहे.    

000000
वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र
चाचणीबाबत आरटीओचे आवाहन
नांदेड, दि. 10 :- परिवहन वाहनांचे ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर पासून इतर कोणत्याही खाजगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यास मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये प्रतिबंधित करण्यात आले आहे.  परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहतूकदारांनी त्यांची वाहने तपासणीसाठी कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगांव, नंदुरबार, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर (ग्रामीण), अकोला, यवतमाळ, धुळे, लातुर, वर्धा, रत्नागिरी, व अंबाजोगाई  यापैकी कोणत्याही शहरात तपासणीसाठी न्यायावीत.
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे ज्या कार्यालयांमध्ये ब्रेक टेस्ट ट्रक उपलबध नाहीत त्या कार्यालयांना मुदत वाढीबाबत सुनावणी मंगळवार 14 नोव्हेंबर 2017 रोजी होणार आहे. ज्या कार्यालयात ब्रेक टेस्ट ट्रक उपलब्ध नाहीत त्या कार्यालयांनी ज्या कार्यालयांमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध आहेत त्या कार्यालयांमध्ये वाहने तपासणीसाठी न्यावीत. ही कार्यपध्दती पुढील आदेश होईपर्यंत चालू राहिल.
परिवहन विभागाच्या 41 कार्यालयांच्या ताब्यातील शासकीय जागांवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्याचे कामकाज कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. आजमितीस त्यापैकी 18 ठिकाणी असे ट्रॅक्स उपलब्ध आहेत. उर्वरित 21 ठिकाणी अशी चाचणी नजिकच्या कार्यालयातील शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेण्यात येईल. ही कार्यपध्दती सध्या गोंदिया, अकलुज, सातारा, ठाणे, नागपूर (शहर), सांगली, मुंबई (पश्चिम), मुंबई (मध्य), मुंबई (पूर्व) व बोरीवली या कार्यालयांना लागू नाही. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000

Thursday, November 9, 2017

वाळू लिलावासाठी ई-निविदा,
ई-ऑक्शनचे प्रशिक्षण
नांदेड, दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सन 2017-18 साठी नांदेड जिल्ह्यातील 104 वाळु गटांचे लिलाव प्रक्रिया ई-निविदा व ई-ऑक्शनद्वारे घेण्यात येणार आहे. या वाळुघाट लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी सोमवार 13 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपस्थित रहावे. या वाळुघाटांचे लिलावात सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ई-निविदा व ई-ऑक्शन https://co.maharashtra.nextprocure.in या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. त्यानुसार इच्छुक कंत्राटदार, कंपनी, व्यक्ती यांना ई-निविदा व ई-ऑक्शन प्रशिक्षण आयोजित केले आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


अल्पसंख्याक उमेदवारांसाठी
पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
नांदेड, दि. 9 :- "पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत" राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून यासंदर्भात निवड चाचणीसाठी मंगळवार 21 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. पोलीस कवायत मैदान नांदेड येथे शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्डच्या छायांकित प्रती व पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा पुरावा. उमेदवार अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या समाजातील असावा. उमेदवार हा 18 ते 28 या वयोगटातील असावा. उमेदवारांची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी., छाती पुरुष 79 सेमी. फुगगवून 84 से.मी. असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
प्रशिक्षणाचे स्वरुप : निवडलेल्या उमेदवारांना एकुण दोन महिने (50 दिवस) प्रशिक्षण दिले जाईल. या दरम्यान दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 रुपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थीस गणवेश साहित्यासाठी गणवेश बुट, मोजे बनियन आदीसाठी 1 हजार रुपये एवढी एकरकमी अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

Wednesday, November 8, 2017

जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी बैठक संपन्न
नांदेड, दि. 8 :- जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीच्या अनुषंगाने आज पुर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, सहाय्यक आयुक्त भगवान वीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी व विविध विभागांच्या योजनांसाठी सन 2017-2018 या आर्थिक वर्षात करण्यात आलेली तरतूद, त्याचा विनीयोग यांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बाबनिहाय आढावा घेतला. मंजूर नियतव्यय आणि खर्चाचे तसेच पुनर्विनियोजन याबाबत उपस्थित विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी नियतव्यय मंजूर असलेल्या बाबींबाबत संबंधीत विभागांनी तांत्रिक मंजूरी आणि प्रशासकीय मंजुरीनुसार उपलब्ध निधीचा वेळेत विनियोग करावा, असे निर्देश दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यन्वयन यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. सहायक नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांनी बैठकीचे संयोजन केले.  
000000


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...