वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र
चाचणीबाबत
आरटीओचे आवाहन
नांदेड, दि. 10 :- परिवहन वाहनांचे ब्रेक
तपासणी व योग्यता प्रमाणपत्र
तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील
ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे
आवश्यक आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर
पासून इतर कोणत्याही खाजगी
जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर
घेण्यास मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये प्रतिबंधित
करण्यात आले आहे. परिवहन कार्यालयाच्या
कार्यक्षेत्रातील सर्व वाहतूकदारांनी त्यांची वाहने तपासणीसाठी कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगांव, नंदुरबार, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड,
अमरावती, नागपूर (ग्रामीण), अकोला, यवतमाळ, धुळे, लातुर, वर्धा, रत्नागिरी, व अंबाजोगाई यापैकी कोणत्याही शहरात
तपासणीसाठी न्यायावीत.
मा. उच्च
न्यायालय, मुंबई येथे ज्या कार्यालयांमध्ये ब्रेक टेस्ट ट्रक उपलबध
नाहीत त्या कार्यालयांना मुदत
वाढीबाबत सुनावणी मंगळवार 14
नोव्हेंबर 2017 रोजी
होणार आहे. ज्या कार्यालयात
ब्रेक टेस्ट ट्रक उपलब्ध
नाहीत त्या कार्यालयांनी ज्या
कार्यालयांमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक
उपलब्ध आहेत त्या कार्यालयांमध्ये वाहने तपासणीसाठी न्यावीत. ही कार्यपध्दती पुढील आदेश होईपर्यंत
चालू राहिल.
परिवहन विभागाच्या
41 कार्यालयांच्या ताब्यातील शासकीय जागांवर
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत
ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्याचे
कामकाज कार्यवाही पुढील
प्रमाणे आहे. आजमितीस त्यापैकी 18
ठिकाणी असे ट्रॅक्स उपलब्ध
आहेत. उर्वरित 21 ठिकाणी अशी
चाचणी नजिकच्या कार्यालयातील शासकीय
जमिनीवर बांधण्यात आलेल्या
ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेण्यात
येईल. ही कार्यपध्दती सध्या
गोंदिया, अकलुज, सातारा, ठाणे, नागपूर (शहर), सांगली, मुंबई (पश्चिम), मुंबई (मध्य), मुंबई (पूर्व) व बोरीवली या कार्यालयांना
लागू नाही. अशी
माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000
No comments:
Post a Comment