Monday, July 17, 2017

स्‍टोन क्रेशरधारकाकडून 15 लाख रुपयाची वसुली ;
नांदेड तहसिल कार्यालयाची कार्यवाही
नांदेड, दि. 17 :- प्रलंबीत वसुलीबाबत संबंधी स्‍टोन क्रेशरधारकावर गुन्‍हा नोंद करण्‍याची कार्यवाही सुरु असताना स्‍टोन क्रेशरधारकांनी नांदेड तहसिलदार यांना संपर्क करुन  प्रलंबीत वसुलीबाबत शंभर रुपये बॉड पेपरवर बंधपत्र दिले. त्यानंतर प्रत्येकी 3 लाख 6 हजार रुपयाचा धनादेश दिला. त्यामुळे प्रलंबीत वसुलीपैकी तहसिल कार्यालयास 15 लाख रुपये वसुल करण्यात आल्याची माहिती तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.    
या थकबाकी संदर्भात स्‍टोन क्रेशरधारकांनी दिलेले बंधपत्रानुसार कार्यवाही करण्‍यात येत आहे. तसेच नांदेड तालुक्‍यात अनाधिकृत रेतीसाठयाबाबत या प्रकारची कार्यवाही करण्‍यात येत आहे. ही कार्यवाही जिल्‍हाधिकारी नांदेड व उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली आहे.  
नांदेड तहसिल कार्यालयाअंतर्गत 16 स्‍टोन क्रेशर पैकी 6 स्‍टोन क्रेशरचे नुतनीकरण झाले आहे. त्यापैकी दोन क्रेशर कायमस्‍वरुपी बंद तर आठ स्‍टोन क्रेशरधारकाकडे प्रलंबीत वसुली आहे. हे स्‍टोन क्रेशर सन 2013 पासुन बंद आहेत. सन 2016 मध्ये स्‍टोन क्रेशर धारक यांचेकडील प्रलंबीत वसुलीबाबत महाराष्‍ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 48 (7) व 48 (8) नुसार कार्यवाही करण्याबाबत मोहीम राबवून स्‍टोन क्रेशर सिल केले होते. जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे आदेशानुसार या प्रकरणात नांदेडचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी बाभुळगाव व गुंडेगाव परीसरातील स्‍टोन क्रेशरची पाहणी केली. तेंव्हा स्‍टोन क्रेशरधारकांनी तहसिल कार्यालयाने केलेले सिल तोडून स्‍टोन क्रेशर सुरु केले असल्‍याचे निदर्शनास आले. स्‍टोन क्रेशरधारक श्री. कांचनगिरे जे.आर.टी.स्‍टोन क्रेशर गट क्र.230 मौ.तुप्‍पा थकीत वसुली- रुपये 11,65,634. सौ सुनिता घोगरे, माउली स्‍टोन क्रेशर गट नं. 163 बाभुळगाव थकीत वसुली- रुपये 12,36,000. अ रहीम अ लतीफ फ्रेन्‍डस स्‍टोन क्रेशर गट न 350 कांकाडी थकीत वसुली- रुपये 16,13,333. तिरुपती तुकाराम मस्‍के  गिरीराज स्‍टोन क्रेशर गट न. 194 बाभुळगाव  वसुली रुपये 26,60,667. अ. रशीद अ. गणी उज्‍वल स्‍टोन क्रेशर बाभुळगाव गट क्र 98 मौ बाभुळगाव थकीत वसुली रुपये 2,06,000 यांचेवर थकीत वसुली आहे. त्‍यांनी सिल तोडून स्‍टोन क्रेशर सुरु केल्‍यामुळे संबधीताविरुध्‍द गुन्‍हा नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी वसरणी व तुप्‍पा यांना आदेशीत करण्‍यात आले होते, असेही तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000000
महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
          नांदेड, दि. 17 :- महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली.
            यावेळी कायदेविषयक मदत, पिडीत महिलांचे पुनर्वसन व सहाय्य, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा पद्धती निर्मुलनाबाबत जनजागृती, हुंडा प्रतिबंधक कायदा, अत्याचार पिडीत प्रकरणांची चौकशी, महिला कायदा, महिला धोरण, सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी तसेच महिला घटक योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.  
            बैठकीस तहसिलदार श्रीमती ज्योती पवार, समिती सदस्य प्रा. डॉ. निरंजन कौर, डॉ. मुजावर, श्रीमती रेखा तोरणकर, ॲड. छाया कुळकजाईकर, प्रा. पुरणशेट्टीवार, श्रीमती समता तुमनवाड, सुधा देवशेटवार, डॉ. शारदा तुंगार, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धर्मपाल शाहू, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अनिल कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी, माविमचे जिल्हा समन्वयक जया नेमाने आदींची उपस्थिती होती. यावेळी समिती सदस्यांनी महिला विकास योजने विषयी विविध सूचना मांडल्या.
जिल्हा क्षतिसहाय्य, पुनर्वसन मंडळाची बैठक संपन्न
महिला व बाल विकास विभागांतर्गत ॲसीड हल्ला आणि लैंगीक अत्याचारात बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हा क्षतिसहाय्य व पुनर्वसन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  
            बैठकीत प्राप्त प्रकरणांवर योग्य ती कार्यवाहीचे प्रकरणे मंजूर करुन पिडीत महिला व बालकांना अर्थसहाय्य अनुदान मंजूर करण्यात आले. बैठकीस पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, सरकारी वकील ॲड. तोरणेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी, अशासकीय सदस्य प्रा. निरंजन कौर आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी प्राप्त प्रकरणे जिल्हा मंडळाकडे सादर केली. शेवटी जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे यांनी आभार मानले. 
000000


Sunday, July 16, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 30.72 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 24.38 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात सोमवार 17 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 30.72 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 491.49  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 232.97 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 24.38 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सोमवार 17 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 75.63 (372.80), मुदखेड- 45.67 (291.16), अर्धापूर- 37.00 (221.66), भोकर- 31.50 (269.75), उमरी- 50.67 (214.66), कंधार- 39.17 (249.17), लोहा- 25.33 (213.32), किनवट- 9.00 (270.01), माहूर- 13.38 (247.89), हदगाव- 26.57 (268.03), हिमायतनगर- 16.00 (161.14), देगलूर- 17.50  (151.98), बिलोली- 22.40 (203.20), धर्माबाद- 23.67 (214.01), नायगाव-27.00 (182.66), मुखेड- 31.00 (196.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 232.97 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3727.44) मिलीमीटर आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 11.16 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 21.17 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात रविवार 16 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.16 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 178.53  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.25 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21.17 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुलै 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 6.13 (297.17), मुदखेड- 9.33 (245.49), अर्धापूर- 5.00 (184.66), भोकर- 13.75 (238.25), उमरी- 12.33 (163.99), कंधार- 9.00 (210.00), लोहा- 8.50 (187.99), किनवट- 18.29 (261.01), माहूर- 40.50 (234.51), हदगाव- 16.43 (241.46), हिमायतनगर- 13.33 (145.14), देगलूर- 1.17  (134.48), बिलोली- 6.60 (180.80), धर्माबाद- 8.00 (190.34), नायगाव-7.60 (155.66), मुखेड- 2.57 (165.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 202.25 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3235.95 मिलीमीटर आहे.

00000
किनवट नगरपरिषदेत
गुरुवारी सदस्य पदांचे आरक्षण  
  नांदेड, दि. 16 :- किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी राज्य निवडणूक आयोगानी ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणपत्रानुसार गुरुवार 20 जुलै 2017 रोजी नगरपरिषद किनवट येथे सकाळी 11 वा. सोडत पद्धतीने सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. किनवट नगरपरिषद क्षेत्रातील संबंधीत नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष / प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी हदगाव हे राहतील. किनवट नगरपरिषद क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्त्री), अनुसूचित जमाती (स्त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी गुरुवार 20 जुलै रोजी चिठ्या काढून सोडत पद्धतीने सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणारआहे.

00000
व्यवसाय कर्ज प्रस्तावासाठी
जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
नांदेड दि. 16 :- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनाच्या सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
सुधारीत बीज भांडवल योजनेंतर्गत उद्योग व सेवासाठी 25 लाख रुपये कर्ज दिल्या जाते. अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. अर्जदाराचे शिक्षण सातवीच्या पुढे असावे. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत 15 ते 20 टक्के सुधारीत बीज भांडवल मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ही उद्योग व सेवा उद्योगसाठी लागू आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. अर्जदार ग्रामीण भागातील व ग्रामीण कारागीर असावा. अर्जदार शिक्षणीत / निरक्षर असावा. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 65 ते 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत 20 ते 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल मिळेल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
चर्मकार विकास महामंडळ  
जिल्हा कार्यालयास तात्पुरते उद्दीष्ट
नांदेड दि. 16 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. विशेष घटक योजना 22 व बीज भांडवल योजनेसाठी 5 असे उद्दीष्ट ठरवुन दिले आहे, अशी माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...