Monday, July 17, 2017

स्‍टोन क्रेशरधारकाकडून 15 लाख रुपयाची वसुली ;
नांदेड तहसिल कार्यालयाची कार्यवाही
नांदेड, दि. 17 :- प्रलंबीत वसुलीबाबत संबंधी स्‍टोन क्रेशरधारकावर गुन्‍हा नोंद करण्‍याची कार्यवाही सुरु असताना स्‍टोन क्रेशरधारकांनी नांदेड तहसिलदार यांना संपर्क करुन  प्रलंबीत वसुलीबाबत शंभर रुपये बॉड पेपरवर बंधपत्र दिले. त्यानंतर प्रत्येकी 3 लाख 6 हजार रुपयाचा धनादेश दिला. त्यामुळे प्रलंबीत वसुलीपैकी तहसिल कार्यालया15 लाख रुपये वसुकरण्यात आल्याची माहिती तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.    
या थकबाकी संदर्भात स्‍टोन क्रेशरधारकांनी दिलेले बंधपत्रानुसार कार्यवाही करण्‍यात येत आहे. तसेच नांदेड तालुक्‍यात अनाधिकृत रेतीसाठयाबाबत या प्रकारची कार्यवाही करण्‍यात येत आहे. ही कार्यवाही जिल्‍हाधिकारी नांदेड व उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली आहे.  
नांदेड तहसिल कार्यालयाअंतर्गत 16 स्‍टोन क्रेशर पैकी 6 स्‍टोन क्रेशरचे नुतनीकरण झाले आहे. त्यापैकी दोन क्रेशर कायमस्‍वरुपी बंद तर आठ स्‍टोन क्रेशरधारकाकडे प्रलंबीत वसुली आहे. हे स्‍टोन क्रेशर सन 2013 पासुन बंद आहे. सन 2016 मध्ये स्‍टोन क्रेशर धारक यांचेकडील प्रलंबीत वसुलीबाबत महाराष्‍ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 48 (7) व 48 (8) नुसार कार्यवाही करण्याबाबत मोहीम राबवून स्‍टोन क्रेशर सिल केले होते. जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे आदेशानुसार या प्रकरणात नांदेडचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी बाभुळगाव व गुंडेगाव परीसरातील स्‍टोन क्रेशरची पाहणी केली. तेंव्हा स्‍टोन क्रेशरधारकांनी तहसिल कार्यालयाने केलेले सिल तोडून स्‍टोन क्रेशर सुरु केले असल्‍याचे निदर्शनास आले. स्‍टोन क्रेशरधारक श्री. कांचनगिरे जे.आर.टी.स्‍टोन क्रेशर गट क्र.230 मौ.तुप्‍पा थकीत वसुली- रुपये 11,65,634. सौ सुनिता घोगरे, माउली स्‍टोन क्रेशर गट नं. 163 बाभुळगाव थकीत वसुली- रुपये 12,36,000. अ रहीम अ लतीफ फ्रेन्‍डस स्‍टोन क्रेशर गट न 350 कांकाडी थकीत वसुली- रुपये 16,13,333. तिरुपती तुकाराम मस्‍के  गिरीराज स्‍टोन क्रेशर गट न. 194 बाभुळगाव  वसुली रुपये 26,60,667. अ. रशीद अ. गणी उज्‍वल स्‍टोन क्रेशर बाभुळगाव गट क्र 98 मौ बाभुळगाव थकीत वसुली रुपये 2,06,000 यांचेवर थकीत वसुली आहे. त्‍यांनी सिल तोडून स्‍टोन क्रेशर सुरु केल्‍यामुळे संबधीताविरुध्‍द गुन्‍हा नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी वसरणी व तुप्‍पा यांना आदेशीत करण्‍यात आले होते, असेही तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...