Monday, April 27, 2026

वृत्त क्रमांक 

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

नांदेड दि. 27 एप्रिल :-  लातूर, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुल, दुसरा मजला उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, लातूर येथे व्यक्तीश: किंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com व ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. लातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेड, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

***

No comments:

Post a Comment

#Census2027 #जनगणना2027 Census India 2027