Tuesday, January 22, 2019


दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 22 :- “उज्ज्वल नांदेड” या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  23 व 24 जानेवारी रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिरात इतिहास विषयावर राज्यकर सहायक आयुक्त समाधान महाजन हे मार्गदर्शन सकाळी 10 ते सायं 5 यावेळात करणार आहेत. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील अभिनव गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ‍शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...