Saturday, January 24, 2026

विशेष वृत्त क्र. 114 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वाराचे घेतले दर्शन 

​नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४)  जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. ​पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले.

0000


विशेष वृत्त क्र. 113 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक 

​नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले.​

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. गुरुद्वारा परिसरात प्रवेश करताच त्यांनी 'बोले सो निहाल'च्या जयघोषात पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि.भाप्रसे) यांची उपस्थिती होती.

0000


वृत्त क्र. 112 

अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी झिरवाळ यांचा दौरा  

नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.               

रविवार 25 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथून विमानाने सायं 5 वा. नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 5.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

सोमवार 26 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वाजता श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड  येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 


वृत्त क्र. 111 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम 

नांदेड, दि. 24 जानेवारी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे रविवार, दि. 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार, दि. 25 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 2 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ, नांदेड येथे सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने त्यांचे आगमन होईल. दुपारी 2.05 वाजता वाहनाने श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथून प्रयाण. दुपारी 2.15 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथे आगमन. दुपारी 2.15 ते 3.00 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथे धार्मिक कार्यक्रमासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब जी नांदेड येथून वाहनाने प्रयाण. दुपारी 3.10 वाजता मोदी मैदान, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 ते 4.30 वाजता श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदान नांदेड येथे उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता वाहनाने मोदी मैदान नांदेड येथून प्रयाण. दुपारी 4.40 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 4.45 वाजता श्री गुरु गोबिंद सिंघ विमानतळ नांदेड येथून सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.

00000


वृत्त क्र. 110 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.  

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी पुणे येथून विमानाने सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने वाशिमकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व मुक्काम.

सोमवार 26 जानेवारी, 2026 रोजी सायं 5 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 6.25 वाजता विमानतळ नांदेड येथून पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000


विशेष वृत्त क्र. 109 

हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड, दि. 24 जानेवारी :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. 

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share  उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 


वृत्त क्र. 108 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत 

नांदेड दि.२४ (जिमाका) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. आगमन प्रसंगी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. 

मुख्यमंत्री श्री.मान हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

*****


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...