पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Tuesday, August 26, 2025
वृत्त क्रमांक 902
वृत्त क्रमांक 901
नांदेड- मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस' ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
नांदेड रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण
नांदेड, दि. 26 ऑगस्ट : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ' वंदे भारत एक्सप्रेस' ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचे अंतर 9 ते 9.30 तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे 8 वरून 20 पर्यंत वाढवण्यात आले आहे.
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
नांदेड येथे आनंद व उत्साहाचे वातावरण
नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, पत्रकार, नागरिक आदीची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते.
खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा आज नांदेड रेल्वे स्थानकावरुन शुभारंभ झाला. ही रेल्वे गाडी म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे. या गाडीचा वेळ अजून कमी केला तर सात तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेडचे विमानतळही लवकरच सुरु होईल, यामुळे नांदेडच्या विकासात व दळणवळणात खूप मोठा बदल होईल. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमुळे जिल्ह्याच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. नांदेड- मुंबई प्रमाणेच नांदेड नागपूरला जोडता आले पाहिजे यामुळे व्यापार व उद्योग वाढीस गती मिळेल. नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग झाल्यास नांदेड पुण्याला जोडले जाईल व नांदेड येथील विद्यार्थ्यांची सोय होऊन नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमुल्य भेट असून सर्व सोयीसुविधा या गाडीत आहेत. प्रवाशांनी या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून बिदर व लातूर येथे रेल्वे लवकरच सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.
वेगवान, सुरक्षित, आरामदायी व सोयीस्कर प्रवास-
मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून जाणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.
फायदे
* मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस
* नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी
* गाडीचे डबे 8 वरून वाढवून 20 करण्यात आले असून, प्रवासी आसन क्षमता 530 वरून 1440 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार
* महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा
* हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना उत्कृष्ट व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो
* वारंवार प्रवास करणारे प्रवासी, भाविक, कर्मचारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त
* पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होतो.
वेळापत्रक नांदेड - मुंबई सीएसएमटी - नांदेड वंदे भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक २०७०५ - हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (बुधवार वगळता)
सकाळी ५.०० प्रस्थान, स. ५.४० वा. परभणी, स. ७.२० वा. जालना, स. ८.१३ वा. छत्रपती संभाजीनगर, स. ०९.५८ वा, मनमाड, स. ११.०० वा. नाशिक रोड, दु. ०१.२० वा. कल्याण, दु. ०१.४० वा. ठाणे, दु. ०२.०८ वा. दादर, दु. ०२.२५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन,
गाडी क्रमांक २०७०६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड (गुरुवार वगळता)
दुपारी १.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रस्थान, दु. ०१.१७ वा. दादर, दु. ०१.४० वा. ठाणे, दु ०२.०४ वा. कल्याण, दु. ०४.१८ वा. नाशिक रोड, दु. ०५.१८ वा. मनमाड, सायंकाळी ६.४८ वा. छत्रपती संभाजीनगर, रात्री ०७, ४३ वा. जालना, रात्री ९.३३ वा. परभणी, रात्री १०.५० वा. नांदेड येथे आगमन.
000000
Monday, August 25, 2025
वृत्त क्रमांक 900
२५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट
हवामान विभागाचा इशारा
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
या गोष्टी करा :
१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
०००००
वृत्त क्रमांक 899
गवंडी व बेलदार शिष्टमंडळाच्या मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करा
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न
नांदेड दि. 25 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात गवंडी व बेलदार या जातीच्या समकक्षतेबाबत त्या समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या मांडल्या. सदर मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या जाती संदर्भात बैठक सुनावणी व कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश काबंळे, कंधार उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, बिलोली उपविभागीय अधिकारी के.के. डोंम्बे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, अध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, संबंधित विभागाचे अधिकारी, बेलदार समाजाचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष व सदस्यांची उपस्थिती होती.
गवंडी व बेलदार हे दोन्ही समाज समकक्ष आहेत का ? या सर्व बाबींची पडताळणी करुन उपविभागीय अधिकारी यांनी तसा अहवाल मागासवर्ग आयोगास सादर करावा, असे निर्देश आयोगाचे सदस्यांनी दिले. यावेळी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी ओबीसी, एसबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसीबीसी, ईडब्लुएस, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितणाबाबत आढावा घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीया सुरू असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र पडताळणीमुळे त्यांना अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी जात पडताळणी समितीने घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बेलदार व गवंडी समाजाच्या शिष्टमंडळानी आयोगाचे सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्याकडे मांडल्या.
00000
Sunday, August 24, 2025
वृत्त क्रमांक 898
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू - पालकमंत्री अतुल सावे
· पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे
· संवेदनशील पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीचे धनादेश वाटप
· हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद गावांना भेट देवून केली पाहणी
· नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार
नांदेड दि. 24 ऑगस्ट :- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली. यावेळी हसनाळ येथे पालकमंत्री यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत धनादेशाद्वारे देण्यात आली.
तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून वैयक्तिकरित्या
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत
संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.
मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता.
पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा
आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला. यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.
00000
वृत्त क्रमांक 898
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू - पालकमंत्री अतुल सावे
·
पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे
·
संवेदनशील पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक
मदतीचे धनादेश वाटप
·
हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद गावांना भेट देवून केली पाहणी
·
नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार
नांदेड दि. 24 ऑगस्ट :- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली. यावेळी हसनाळ येथे पालकमंत्री यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत धनादेशाद्वारे देण्यात आली.
तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून
वैयक्तिकरित्या
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी
50 हजार रुपयांची
मदत
संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.
मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता.
पालकमंत्री अतुल सावे यांनी
घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा
आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे
यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला.
यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.
अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी
राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना
कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा
आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची
उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात
झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.
00000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)