Wednesday, February 1, 2023

वृत्त क्रमांक 51

 ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीकपेरा

नोंदवण्‍यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मान्‍सून उशिरापर्यंत लांबल्‍यामुळे रब्‍बी हंगामाची उशिराने पीक पेरणी झाली. तसेच जिल्‍हा पातळीवरुन रब्‍बी हंगामात ई-पीक पेरा नोंदविण्‍यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्‍यात आली होती. ही मागणी मान्‍य करून शासनाने मोबाईल अॅपद्वारे पीकपेरा नोंदणी करण्यास बुधवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुर्वी रब्‍बी हंगाम 2022-23 मध्‍ये ई-पीक पाहणी नोंद करण्‍याची मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती.

 

ज्‍या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पेरा नोंद केली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्‍या‍कडील स्‍मार्टफोनद्वारे ई-पीक पाहणी नोंद करावी. यासाठी गावातील तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी अशा स्‍वंयसेवकांचे सहकार्य घ्‍यावे.

 

पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्‍या योजनांचा लाभ सुलभतेने मिळणेस्‍तव,पीक कर्ज,पीक विमा नुकसान भरपाई ,नैसर्गिक आपत्‍ती काळात सुयोग्‍य शासकिय मदत मिळण्‍यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे.त्‍यामुळे अॅप द्वारे ई-पीक पाहणी नोंद करणे शिल्‍लक असलेल्‍या उर्वरीत सर्व शेतक-यांनी मोबाईल अॅपमध्‍ये अचूक पीक पेरा नोंद करावी असे आवाहन जिल्‍हा प्रशासनामार्फत करण्‍यात येत आहे.

0000

वृत्त क्रमांक 50

 क्षेत्रिय कार्यालय निहाय मंडप तपासणी पथक गठीत 

   

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण / उत्‍सव / समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड हद्दीमधील मंडप / पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पथके गठित करण्‍यात आलेले आहे. या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

 

पथक क्र. 1 क्षेत्रीय कार्यालय क्र. 1, कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 (तरोडा सांगवी) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत तपासणी पथक सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्‍हाण- 9595333181, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड ए. एस. काकडे- 02462-221100, 9923131121, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364, 9552082544, प्र. कार्यालय अधीक्षक श्री. नितीन, श्री. संतोष जिंतुरकर 8888801958, प्र. वसुली पर्यवेक्षक साहेबराव ढगे 8888801975, प्र. वसुली पर्यवेक्षक विठ्ठल तिडके 8888801951, लिपीक राजरत्‍न जोंधळे 8208069193, स्‍वच्‍छता निरीक्षक आनंदा गायकवाड 9011027194, विश्‍वनाथ बी.कल्‍याणकर 9011000969,  श्रीमती प्रियंका यंगडे 8308847692 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 2 क्षेत्रीय कार्यालय क्र.2 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.2 (अशोकनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.  क्षेत्रीय अधिकारी मीर्झा फरहतउल्‍ला बेग 9011000950, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364, 9552082544, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड ए. एस. काकडे 02462-221100, 9923131121, प्र.कार्यालय अधिक्षक राजेश जाधव (पाटील) 8888801953, प्र. कर निरीक्षक वसंत कल्‍याणकर 8888801943, रणजित पाटील 9011001005, परशुराम गाडे 8888801918, लिपीक विजय कुलकर्णी 7620879326, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक गणेश मुदीराज 8308847695, विजय वाघमारे 8669037443, शेख नईम शे.गफुर 9822202081, सतिश मुक्‍कपल्‍ले 7774977737 याप्रमाणे आहेत.



पथक क्र. 3 क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 (शिवाजीनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. प्र. सहा.आयुक्‍त रमेश चवरे 9011000994, पो.नि.पो.स्‍टे. शिवाजीनगर नांदेड नितीन काशिकर 02462-256520 / 9527988931, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे 02462-261364 / 9552082544, प्र.कार्यालय अधीक्षक राजेश कऱ्हाळे 9011000989, प्र.वसुली पर्यवेक्षक पुरुषोत्‍तम कमतगीकर 9970472524, मेघराज जोंधळे 8888801927,राहुलसिंह चौधरी 7558333322,.रामदास हांडे 9730344793, स्‍वच्‍छता निरीक्षक बालाजी देसाई 9970262853, राजेंद्र गंदमवार 9011000979, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक किशन तारु 8308847691 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 4 क्षेत्रीय कार्यालय क्र.4 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.4 (वजिराबाद) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव 9011000939, पो.नि.पो.स्‍टे. वजिराबाद नांदेड जगदीश भंडरवार 02462-236500 / 9923696860, पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड भगवान धबडगे 02462-236510 / 9552520363, प्र.कार्यालय अधिक्षक गौतम कवडे 9011000981, वसुली पर्यवेक्षक रमेश वाघमारे 8888801985, हरमींदर सिंघ सुखमनी 8830911273, अजहरअली जुल्‍फेकार अली 8888801988, लिपीक महेंद्र नागरे 7020154389, पुंडलीक मोरे 9822360258, स्‍वच्‍छता निरीक्षक संजय जगतकर 8380046629, एम.ए.समी 9011000978, रुपेश सरोदे 9823666374, मोहन लांडगे 9370373846 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र.5 क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 (इतवारा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे 8888801961, पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड भगवान धबडगे 02462-236510/ 9552520363,अशोक घोरबांड पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823333377, प्र.कार्यालय अधीक्षक गोपाळ तोटावाड 9921986989, प्र. कर निरीक्षक अब्‍दुल हबीब अ.रशीद 8888801998, असीफ खान शेर खान प्र. कर निरीक्षक 8888847119, लिपीक गणेश कोंडावार 8087315765, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक दयानंद गोपाल कवले 9011000975, सय्यद जाफर स.नबी 8380046631, स्‍वच्‍छता स्‍वच्‍छता निरीक्षक अतिख अन्‍सारी 9011000973, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक विजेंद्र जोंधळे 8668351324 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र. 6 क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.6 (सिडको-वाघाळा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन 9011000940, पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा) अशोक घोरबांड 02462-226373 / 9823333377, प्र.कार्यालय अधिक्षक विलास गजभारे 9890327546, कर निरीक्षक सुदास थोरात 9561320880, कर निरीक्षक सुधीरसिंह बैस 7775956400, राहुल सोनसळे 8888801920, स्‍वच्‍छता निरीक्षक किशन वाघमारे 8888801992, स्‍वच्‍छता निरीक्षक अर्जुन बागडी 8888588067 अशी आहेत.

 

नागरीकांनी सार्वजनिक सण/उत्‍सव/समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणा-या मंडप/ पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास उपरोक्‍त विवरणपत्रामधील नमूद तपासणी पथक सदस्‍याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000 

Monday, January 30, 2023

वृत्त क्रमांक 49

 उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात

स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष 


 

निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी  उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. येथील हैद्राबाद स्टेट बँक, पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला आज 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.

 

पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य  सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती.

 

उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित, रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले.

 

काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

“मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.”

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

“उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू”

-   जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

0000  






वृत्त क्रमांक 48

 जयंती, राष्ट्रीय दिनाबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 30  :- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. जपुति-2022/प्र.क्र.120/कार्या.29 दि. 18 जानेवारी 2023 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाने याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 47

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 20 जानेवारी 2023 सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 19 फेब्रुवारी 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Friday, January 27, 2023

वृत्त क्रमांक 46

 तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

▪️आहारातील तृणधान्यातून सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमार्फत विशेष मोहिम
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड (जिमाका) दि. 27 :- इथल्या मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यांपासून आपण ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राजगीरा ही तृणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले आरोग्य उत्तम ठेवले. अलिकडच्या काही वर्षात आपला आहार शरीराला न मानवणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी यांच्या वरेमाप वापरावर केंद्रीत केल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या मूळ सत्वाकडे तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्विकतेचा संदेश गावोगावी पोहचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचतगटाच्या माध्यमातून व्यापक स्वरुप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद व माविमच्यावतीने जिल्हा परिषद आवारात तृणधान्याचे महत्त्व व्यापक व्हावे यासाठी ज्वारी, नाचणीच्या ताज्या भाकरी व ठेचा, हुरडा स्टॉलच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लहान व अर्धापूर येथील बचतगटाच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात नियोजीत ठिकाणी नाचणी व ज्वारीच्या चुलीवरील भाकरी, चटणी, ठेचा, हुरडा याची अपूर्व प्रातिनिधीक स्वरुपात मेजवानी दिली.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा महोत्सव घेण्यात येऊन फास्टफूडकडे सरकत जाणाऱ्या आपल्या आहाराला आरोग्यवर्धक पोषक आशा स्लोफूड अर्थात तृणधान्याकडे वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
000000






वृत्त क्रमांक 45

 जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने

28 ते 30 जानेवारी पर्यंत बंद 

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीचे मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत 28 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

 

नांदेड जिल्ह्याती किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे शनिवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचा उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...