जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने
28 ते 30 जानेवारी पर्यंत बंद
नांदेड (जिमाका) दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीचे मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत 28 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
नांदेड जिल्ह्याती किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे शनिवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचा उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment