विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर देऊ भर - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
Sunday, December 25, 2022
Saturday, December 24, 2022
माळेगाव यात्रेत सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर प्रदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या ‘8 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या विषयावर आधारित भव्य बहु-माध्यम प्रदर्शानास आज पासून शानदार सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी गटविकास अधिकारी शैलेश वावळे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील चिखलीकर, माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगुंडे, स्वच्छ भारत अभियानाचे मिलींद व्यवहारे, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, इंद्रवदनसिंह झाला, सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सव व केंद्र सरकारचे ‘आठ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या बहुमाध्यम प्रदर्शनातून आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची सर्व माहिती तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्षे कामगिरीची माहिती अत्यंत कमी वेळात आत्मसात होते, असे सांगून या अभियास संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोद्वारे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्वाच्या घटना-घडामोडी सोबतच 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा व केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवाची माहिती बहूमाध्यम स्वरुपात माडण्यात आली आहे.
2 हजार 500 चौरस फुटावर आयोजित या आकर्षक सजावट बहूमाध्यम प्रदर्शात आझादी क्वेश्ट (भारत के हिरो) आनलाईन खेळ, डिजिटल स्क्रीन, एलईडी वाल्स, विविध स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानीचे कटाउट्स, सेल्फी बुथ आणि स्वाक्षरी वालच्या माध्यमातून अंत्यत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. या पाच दिवशीय प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. शाहीर रमेश गिरी यांच्या कलापथकाद्वारे देशभक्तीपर गितांतून मनोरंजन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे. माळेगाव यात्रेस भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारद्वारे करण्यात आले आहे.
00000
आदिवासींच्या अनुदानावरील विविध योजनांसाठी
30 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड (जिमाका) दि. 24 :- केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत मंजूर योजनाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून पुढील तपशिलातील नमूद योजनाचे अर्ज नि:शुल्क मागविण्यात येत आहेत. या योजनांचे अर्ज किनवट प्रकल्पातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील सेवायोजन कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक 02469-222015 वर संपर्क साधावा. योजनेचे परिपुर्ण अर्ज दिनांक 30 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
गट- अ मध्ये आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर तुषार / ठिबक संच खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर टिनपत्रे खरेदी करण्यासाठी, आदिम जमातीच्या कोलाम लार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर टिनपत्रे खरेदी करण्यासाठी, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर तारकुंपन खरेदी करण्यासाठी, आदिवासी युवक-युवतींना वैयक्तिक रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी 85 टक्के अनुदानावर संगणक व प्रिंटर संच खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य करणे.
गट- ब मध्ये आदिवासी युवक-युवतींना गट क पदे स्पर्धात्मक पूर्वतयारी निवासी प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक-युवतींना डीएड / बीएड टीईटी परिक्षेचे निवासी प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक-युवतींना रुग्णसहायक-सहायीका अभ्यासक्रम निवासी प्रशिक्षण देणे. गट-क मध्ये शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्याकरीता एकुण 6 योजनेस मंजुरात आहेत. याकरीता या प्रकल्पाअंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापकांनी अर्ज सादर करावेत.
या योजनेकरीता शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र / अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच प्रशिक्षण योजनेकरीता स्वयंसेवी / सेवाभावी संस्थानी गट-ब व गट-क चे प्रशिक्षणाचे योजनेकरीता या कार्यालय स्तरावर विहित नमुन्यात प्रस्ताव / अर्ज सादर करावेत. याकरीता या कार्यालयाचे सेवायोजन शाखेशी संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
0000
Friday, December 23, 2022
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बालदिवस व नांदेड महोत्सवाचे रविवारी उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे सकाळी 10 वा. होणार आहे. ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याचबरोबर माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे यांची उपस्थिती राहणार आहे.
वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवात रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वा. या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर, नांदेड येथे चर्चासत्र. सायं. 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत मार्शल आर्टस्, रात्री 8.30 वा. गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.
सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 11 वा. महात्मा फुले पुतळ्यापासून ते गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. दुपारी 12.15 ते 2.30 या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड येथे निबंध, वक्तृत्व स्पर्धा व कविता वाचन. सायं. 5.30 ते 6.30 पर्यंत गोदावरी नदीकाठी (नगीनाघाट) येथे मार्शल आर्टस तर रात्री 8.30 वा. गुरूग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसरात शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.
0000
लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 23 :- ग्रामीण व दुर्गम भागासह सर्व लोकांची शासनाशी संबंधित असलेली सर्व कामे पारदर्शक पद्धतीने व निर्देशीत केलेल्या कालावधीत निकाली निघाली पाहिजेत. यासाठी लोकाभिमूख प्रशासन महत्वाचे असते. प्रशासकीय पातळीवर याला अधिक गती मिळावी व कर्तव्य तत्परता वाढावी यादृष्टिने 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख असते. याला चालना मिळावी व जिल्ह्यात ज्या-ज्या विभागामार्फत अधिक पारदर्शक व लोकाभिमूख कामे पार पडली आहेत अशा कामांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. चांगले उपक्रम हे सदैव राबविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
सुशासन सप्ताह व 25 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सुशासन दिनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, भोकर तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रेखा काळम यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत सचित्र सादरीकरण केले.
000000
आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या
ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यत मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 23 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...



.jpg)
