Monday, July 18, 2022

 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 45 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, किनवट  1, कंधार 1 असे एकूण 8 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 27 एवढी झाली असून यातील 1 लाख 284 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 51 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 1, अश्विनी हॉस्पिटल 2 असे एकुण 5  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 26, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 23, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 51 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 6
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 625
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 27
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 284
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 36.40 मि.मी. पाऊस

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात सोमवार  18 जुलै  रोजी सकाळी  8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  36.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 627.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

 जिल्ह्यात सोमवारी 18 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत  24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-34.50 (615.20), बिलोली-41.30 (669), मुखेड- 47 (577), कंधार-25.50 (621.40), लोहा-26.10 (579.30), हदगाव-34.70 (574.80), भोकर-47.80 (723.90), देगलूर-44.20 (547.60), किनवट-36.30 (643.70), मुदखेड- 47.20 (804.30), हिमायतनगर-27 (812.10), माहूर- 35.80 (534.50), धर्माबाद- 29.30 (648.70), उमरी- 44.70(772.60), अर्धापूर- 22.60 (601.90), नायगाव-33.40 (578) मिलीमीटर आहे.

0000

Saturday, July 16, 2022

 राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका

असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान खात्याकडून बऱ्याच भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात एनडीआरएफची पथके दक्ष ठेवण्यात आलेले आहेत. ही सर्व परिस्थिती विचार घेऊन जनजीवन व वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागेल. अशा स्थितीत निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडणे आव्हानात्मक आहे. याबाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकल्याणात आल्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.

 

राज्यातील निवडणूकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या 32 हजार 743  पैकी निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या 7 हजार 620 इतक्या सहकारी संस्था आहेत. यात 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळलेल्या आहेत. यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांपैकी नामनिर्देशन सुरू असणाऱ्या सहकारी संस्था 5 हजार 636 एवढ्या आहेत. नामनिर्देश सुरू न झालेल्या सहकारी संस्था 1 हजार 984 इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.

 

राज्यातील सध्याची पूरपरिस्थिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार जनजीवन सुरूळीत होण्यास कालावधी लागेल. अशा स्थितीत जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये आपला हक्क बजावता यावा, सहभाग घेता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार सदर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च / मा. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.  ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे राज्याचे सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागाने 15 जुलै 2022 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

 

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची

निवडणूक पुढे ढकलली

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना म. लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यासाठी 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया 15 जुलै पासून ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वरील शासन आदेशान्वये पुढे ढकल्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिली.    

00000

 नांदेड जिल्ह्यात 13 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 134 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आला आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद 1, कंधार 1, मुदखेड 1 तर अँटीजेन तपासणी द्वारे कंधार तालुक्याअंतर्गत 1 असे एकुण 13 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत.

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 4 एवढी झाली असून यातील 1 लाख 268 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

 

नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 24, अश्विनी हॉस्पिटल 2 असे एकुण 44 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 10 हजार 761

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 90 हजार 410
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 4
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 268
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.34 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 1.60 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात शनिवार 16 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 1.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 589.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

 

जिल्ह्यात शनिवार 16 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 3.80 (580.50) बिलोली-00 (623.40), मुखेड- 0.10 (529.40), कंधार-00 (594.40), लोहा-00 (550.90), हदगाव-1.80 (539.50), भोकर- 9 (673.90), देगलूर-1.30 (500.80), किनवट-0.70 (606.50), मुदखेड- 6 (755.50), हिमायतनगर-00 (784.80), माहूर- 0.30 (496.20), धर्माबाद-0.40 (616.20), उमरी- 2.10 (724.50), अर्धापूर- 4.30 (579), नायगाव- 00 (542.50) मिलीमीटर आहे.

0000

Friday, July 15, 2022

 नांदेड जिल्ह्यात 11 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 152 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, उस्मानाबाद  1, धर्माबाद 1, हिंगोली 1 , देगलूर 1, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1, बिलोली 1 असे एकूण 11 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 989 एवढी झाली असून यातील 1 लाख 261 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 36 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 2 असे एकुण 4  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अश्विनी हॉस्पिटली 3 असे एकुण 36 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 10 हजार 489
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 156
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 2 हजार 989
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 261
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.36 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-36
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.80 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात शुक्रवार 15 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.80मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 588.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.20 (576.70), बिलोली-21 (623.40), मुखेड- 3.70 (529.30), कंधार-2.70 (594.40), लोहा-1.60 (550.90), हदगाव-3.70 (537.70), भोकर- 3.80 (664.90), देगलूर-5.70 (499.50), किनवट-12.40 (605.80), मुदखेड- 2.90 (749.50), हिमायतनगर-4.60 (784.80), माहूर- 13.30 (495.90), धर्माबाद- 24.70 (615.80), उमरी- 21.50 (722.40), अर्धापूर- 6.20 (574.70), नायगाव- 7.10 (542.50) मिलीमीटर आहे.
0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...