Thursday, December 3, 2020

 

49 कोरोना बाधितांची भर तर

52 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- गुरुवार 3 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 49 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 52 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 997 अहवालापैकी 991 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 490 एवढी झाली असून यातील 19 हजार 394 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 352 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29, देगलूर कोविड रुग्णालय 5, जिल्हा कोविड रुग्णालय नांदेड 1, मुखेड कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 52 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 23, नांदेड ग्रामीण 2, लोहा तालुक्यात 1, किनवट 2 असे एकुण 28 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, नांदेड ग्रामीण 1, मुखेड तालुक्यात 1, लोहा 3, हदगाव 2  असे एकुण 21 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 352 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 32, मुखेड कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 2,  हदगाव कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 69, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 138, खाजगी रुग्णालय 29 आहेत. 

गुरुवार 3 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 180, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 54 हजार 506

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 30 हजार 36

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 490

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 394

एकूण मृत्यू संख्या- 550

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-451

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-352

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

 

 

 

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या

महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिलासाठी विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांनी मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,कैलास नगर वर्कशॉप रोड,नांदेड यांच्या मार्फत कोव्हीड 19 च्या शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.  या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीकरीता ग्रंथालय विभागामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. या कार्यालयाच्या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिलांना स्वतंत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे सुरु आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतचे 12 डिसेंबरला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप, व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारतसंचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी 12 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

नांदेड तहसिल कार्यालयात

जप्त बोटीचा लिलाव 9 डिसेंबरला 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- गोदावरी नदी परिसरातील पथकामार्फत धाडी टाकून जप्त केलेल्या 2 (दोन) बोट, (सक्शन पंप), लोखंडी पाईप 20 नग व लोखंडी टाक्या 22 नग आहेत.  या जप्त केलेल्या बोट व सक्शन पंप, लोखंडी पाईप, लोखंडी टाक्या यांचा जाहीर लिलाव बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय नांदेड येथे होणार आहे. संबंधितानी हे सर्व साहित्य आपण पाहून तपासून घेवून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन  नांदेडचे तहसिलदार यांनी केले.  

00000

 

शासकीय अध्यापक महाविद्यालयात संविधान दिवस संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 3 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. संविधान दिनाचे महत्व प्रशिक्षणार्थी गंगाधर बोईवार यांनी ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. 

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, ग्रंथपाल व सेवकवर्ग यांची उपस्थित होते. यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत घडलेल्या बॉबस्फोट व हुतात्मा अधिकारी व सामान्य नागरीक यांना एक मिनीट स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्तविक व आभार प्रा. डॉ. मुरुमकर यांनी मानले.

00000

Wednesday, December 2, 2020

 

30 कोरोना बाधितांची भर तर

38 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- बुधवार 2 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 30 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 38 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 297 अहवालापैकी 1 हजार 249 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 441 एवढी झाली असून यातील 19 हजार 342 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 355 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 73 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, भोकर तालुक्यांतर्गत 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 38 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, कंधार तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 , हिंगोली 1 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, अहमदनगर 1, मुखेड 1, नागपूर 2  असे एकुण 15 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 355 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 37, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 29, मुखेड कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 76, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 30 आहेत.

 

बुधवार 2  डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 183, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 53 हजार 307

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 28 हजार 850

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 441

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 342

एकूण मृत्यू संख्या- 550

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-496

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-355

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.

 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 9 डिसेंबरला

नांदेड (जिमाका) दि. 2:-  नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...