Thursday, December 3, 2020

 

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या

महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिलासाठी विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांनी मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,कैलास नगर वर्कशॉप रोड,नांदेड यांच्या मार्फत कोव्हीड 19 च्या शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.  या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीकरीता ग्रंथालय विभागामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. या कार्यालयाच्या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिलांना स्वतंत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे सुरु आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...