Tuesday, August 28, 2018


ऑटोरिक्षा नोंदणीनंतर
परवाना प्राप्त करुन घ्यावा
नांदेड दि. 28 :- जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षा नोंदणी केल्यानंतर ऑटोरिक्षा परवाना घेतला नसल्यामुळे वायुवेग पथकाद्वारे वाहन जप्त करणे सुरु आहे. ऑटोरिक्षा नोंदणी नंतर परवाना प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा जप्त करुन वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000


दहावी, बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीस मुदतवाढ
नांदेड दि. 28 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा- फेब्रुवारी / मार्च 2019 साठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यास सोमवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे विहित शुल्क, मूळ कागदपत्रे, संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज 11 सप्टेंबर पर्यंत जमा करावे. कनिष्ठ महाविद्यालयाने सर्व कादगपत्रासहीत यादी विभागीय मंडळाकडे 15 सप्टेंबर 2018 रोजी जमा करावी. ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in इयत्ता 12 वी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाही, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.
00000


पत्रकार परिषद निमंत्रण                                                     
दि. 28 ऑगस्ट 2018

प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्‍ही.
नांदेड जिल्‍हा

          विषय - पत्रकार परिषदेचे निमंत्रण...
संदर्भ - जिल्हाधिकारी तथा जिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांचे पत्र क्र.
   2018/साशा-3/निवडणूक/मयापु/ CR-23 दि. 28.8.2018
 महोदय ,
            उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मतदार यादीबाबत दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीतजास्त मतदारांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मा. श्री. अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी नांदेड हे शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात सायं. 4.30 वा. पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.    
            कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी वार्तांकनासाठी  उपस्थित रहावे, ही विनंती.  
वार व दिनांक     -  शनिवार, दि. 1 सप्टेंबर, 2018    
स्थळ                 -  जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्ष  
वेळ                  -  सायं. 4.30 वा.      

                                                                                                                    आपला विश्वासू
                  स्वा /-
      जिल्‍हा माहिती अधिकारी,
                नांदेड


कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  

नांदेड दि. 28 :- कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी  कृषि विभागामार्फत राबविण्यात आलेली मोहिम अशीच पुढे सुरु ठेवून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे, कृषि विकास अधिकारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र येथील शास्त्रज्ञ, जिल्हा समन्वयक क्रॉपसॅप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एमएआयडीसी प्रतिनिधी, जिनिंगमिल्सचे प्रमुख, बियाणे व किटक नाशके उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, कापुस उत्पादक प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत सध्याच्या पिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लवकर लागवड केलेल्या कापुस क्षेत्रावर जुलै 2018 मध्ये जास्त प्रमाणात दिसुन आलेला प्रादुर्भाव कृषि विभाग, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र यांचे मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना व मार्गदर्शनामुळे सद्यस्थितीत कमी झालेला असुन सदरील प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी Mass Trapping व एकात्मिक किड व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते नमुद करण्यात आले.
सोयाबीन व मुग पिकावर सद्या किडींचा प्रादुर्भाव आढळुन येत असुन कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी सोयाबीन वरील खोड माशीसाठी ट्रायझोफॉस व डायक्लोरोव्हासची व करपारोगासाठी कार्बेन्डाझाईम + मंकॉझेब किंवा टेबेकॉनझोले + सल्फर ची  फवारणी करणे तसेच मुगावरील भुरी रोगासाठी गंधकाचा वापर करण्याच्या शिफारशी सांगितल्या.  
000000


शेडनेट व हरीतगृह उभारणी सेवा पुरवठादारांनी नोंदणी करावी
नांदेड दि. 28 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्ह्यात हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे नोंदणी करावी.
प्रस्ताव सेवा पुरवठादार नोंदणीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण, दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी सेवा पुरवठादार हा जीएसटी नोंदणीकृत असावा. शॉपॲक्ट प्रमाणपत्रधारक असणे बंधनकारक आहे. सेवा पुरवठादारास हरितगृह / शेडनेट हाऊस उभारणीचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. तसेच मागील 3 वर्षाची उलाढाल प्रतिवर्षी कमीतकमी  एक कोटी रुपये असावी. त्या पुष्टयर्थ सेवा पुरवठादारास मागील लगत तीन वर्षाचा सनदी लेखापालाने प्रमाणित केलेला आर्थिक ताळेबंद सादर करावा लागेल व वर्षवार यापूर्वी उभारणी केलेल्या हरितगृह / शेडनेट हाऊस लाभार्थ्यांच्या याद्या सादर करणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सुचनेत नमुद असलेल्या मॉडेलनिहाय डिझाईनप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरुन हरितगृह / शेडनेटगृह उभारणी करण्याबाबतचे विहीत नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-13) सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. तसेच हरितगृह / शेडनेट हाऊसच्या सांगाड्याची पाच वर्षाची वॉरन्टी द्यावी लागेल (सेवा पुरवठादाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). जी आय पाईपच्याबाबत IS 1161:2014 या मानांकनाच्या जी आय पाईपचे अधिकृत वितरक किंवा अधिकृत विक्रेता असल्याबाबतचे पुरावा व प्रमाणपत्र सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. शेडनेट (टेपनेट / मोनोनेट), इन्सेक्ट नेट, पॉली फिल्म इत्यादी साहित्य बिआयएस मानांकाप्रमाणे पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र (प्रपत्र - 13) द्यावे लागेल. त्यासाठी उत्पादकाचे अधिकृत वितरक / विक्रेता असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नेट/फिल्म याबाबत 1 वर्षाची गॅरंटी (बदलून देणे) व 2 वर्षाची वॉरंटी द्यावी लागेल. (सेवा पुरवठाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). 7) पॉली फिल्मच्याबाबत आयातीत पॉली फिल्म वापरणार असल्यास अधिकृत आयातदार किंवा अधिकृत आयातदाराचे वितरक किंवा विक्रेता असल्याबाबत संबंधीत आयातदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पॉली फिल्मच्याबाबत उत्पादकाने प्रमाणित केलेले तांत्रिक माहितीचे विविरण पत्र (Technical data sheet), पॉली फिल्मचा दर्जा व गुणधर्माबाबतचे प्रमाणपत्र तसेच सिपेट या संस्थेचा 6 महिन्यांपेक्षा जुना नसलेला तांत्रिक तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक राहील. सेवा पुरवठादाराची नोंदणी ही साहित्य पुरवठ्यासह संपूर्ण हरीतगृह/शेडनेटगृह उभारण्यासाठी करावयाची असून केवळ साहित्य पुरवठ्यासाठी नाही.
आदी अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
000000

Monday, August 27, 2018


कापुस, सोयाबीन पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात कापुस, सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
कापूस रस शोषण किडीसाठी फलोनीकॅमीड 50 डब्ल्यू जी 2 ग्रॅम आणि गुलाबी बोंडअळीसाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे.
सोयाबीनवरील तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.41 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात सोमवार 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 278.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 727.14 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 76.10 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 26.88 (818.39), मुदखेड- 15.67 (923.03), अर्धापूर- 16.00 (788.33), भोकर- 16.50 (944.75), उमरी- 12.67 (785.99), कंधार- 24.00 (719.66), लोहा- 20.17 (677.17), किनवट- 7.71 (771.55), माहूर- 9.50 (964.96), हदगाव- 23.57 (868.15), हिमायतनगर- 18.67 (911.38), देगलूर- 18.00 (342.00), बिलोली- 14.80 (524.20), धर्माबाद- 14.67 (579.00), नायगाव- 15.40 (540.80), मुखेड- 24.29 (474.82). आज अखेर पावसाची सरासरी 727.14 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11634.18) मिलीमीटर आहे.  
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...