Friday, November 21, 2025

वृत्त क्रमांक 1227

जिल्हाधिकांऱ्याच्या संकल्पनेतून मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात साकारणार 1 लाख जलतारा 

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये आज जलतारा कामाचा शुभारंभ                                                                                                                                                                                                                                  नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतुन नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील  16 तालुक्यात याबाबतची जनजागृती करण्या्साठी ग्रामपातळीपर्यंत सर्वांना मागील आठवडयात प्रशिक्षीत करण्यात आलेले आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून आज 21 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील  संपूर्ण 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी जलतारा कामाचा शुभारंभ करण्याात आला आहे. 

जिल्ह्यातील 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये  आज अधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा कामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भोकर तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये तर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या हस्ते लोहा व कंधार तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये,  विभागीय वन अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते माहुर, किनवट व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत मधे तर उपजिल्हाधिकारी रोहयो संजिव मोरे यांच्या हस्ते हदगांव व अर्धापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा् अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते देगलुर व बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड यांनी भोकर व मुदखेड तालुकयातील ग्रामपंचायतीत, उपसंचालक कृषी विभाग वानखेडे यांनी नायगांव व मुखेड तालुकयातील ग्रामपंचायतीमध्ये तर जिल्हा रेशिम विकास अधिकारी नरवाडे यांनी उमरी व धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जलतारा कामाचा शुभारंभ केला. 

जलतारा हा शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन चिभडल्या जाते अशा ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करून त्यात मोठे व मध्यम दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहीर, बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. त्यामुळे अशी जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी केल्यास कामाचे कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल व नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल.“Catch the Rain – Where it Falls, When it Falls”  या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे व जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा  प्रशासनाच्यावतीने करण्यातत आलेले आहे. 

00000





Thursday, November 20, 2025

वृत्त क्रमांक 1226

तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

नांदेड, दि. 20 नोव्हेंबर : दिनांक 20 नोव्हेंबर, 2025 रोजी “Transgender Day of Remembrance” हा दिवस जगभरात तृतीयपंथीय व्यक्तीवरील हिंसाचाराविरुध्द जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पाळला जातो. त्या अनुषंगाने राज्यात यादिवशी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रम आयोजीत करुन तृतीयपंथीयांवरील होणाऱ्या अन्याय, हिंसा व भेदभावाविरुध्द समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यात येत  आहे.

त्यानुसार समाजा कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या अध्यक्षतेखाली आज तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींकरीता मोमबती लावुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर दोन मिनिट मौन बाळगुन त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करण्यात आली. नंतर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी तृतीयपंथीयांना समाजामध्ये काम करत असताना हिंसामुक्त समाजासाठी जनजागृती, लिंग संवेदनशीलता, तृतीयपंथीय अधिकार या विषयांवर व शासनाच्या विविध योजनाद्वारे मदत व संरक्षणाबाबत मर्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संतोष चव्हाण, सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती माधवी राठोड,  वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एस.एम.कदम, सर्व कर्मचारी तथा तृतीयपंथी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था कमल फाउंडेशन नांदेड व सीवायडीए पुणे यांचा सहभाग होता. तसेच तृतीयपंथीयांचे गुरुमाय फरीदा, नरसी नायगांव तसेच अर्चना नांदेड व अमरदिप बोधने, शुभांगी, लक्ष्मी, राणी देवकर, शहानुर बकस इत्यादी उपस्थिेत होते.

00000



 वृत्त क्रमांक 1225

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

नांदेड दि. २० नोव्हेंबर : - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत  जिल्ह्यामध्ये 'पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी यांनी सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

पुरुष नसबंदी पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट्य:

 * कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढवणे.

 * पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (Vasectomy) एक सुरक्षित, सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे, याबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे.

 * पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करून लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना बळ देणे.

*पंधरवड्याचे स्वरूप (२५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५):

पंधरवड्याची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाईल:

 * संपर्क व दळणवळण (Contact and Communication) टप्पा: २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५

   * या दरम्यान जिल्ह्यापासून ते ग्रामपातळीपर्यंत आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, एएनएम, आशा, व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया आणि कुटुंब नियोजनाच्या साधनांविषयी व्यापक जनजागृती व माहिती प्रसार करण्यात येईल.

   * जिल्हा व तालुका स्तरावर व्हीडीओ/ऑडीओ कॉन्फरन्स आयोजित करून कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल.

   * स्वयंसेवी संस्था,  युवा केंद्र, तरुण मंडळे यांच्या मदतीने जनजागृती सभेचे आयोजन केले जाईल.

 * सेवा प्रदायगी (Service Delivery) टप्पा: २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२५

   * या कालावधीत आरोग्य संस्थांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध असतील. नोंदणी केलेल्या लाभार्थींना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती व योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

   * पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असेल.

   * नसबंदी केलेल्या पुरुषांना शासनाच्या नियमानुसार लाभार्थी प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल.

   * पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्यानंतर लाभार्थींना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत तपासणीची सेवा देखील उपलब्ध असेल.

डॉ. संगीता देशमुख म्हणाल्या, "कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांची नसून, पुरुषांनीही या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. पुरुष नसबंदी एक सोपी व सुरक्षित पद्धत असून, या मोहिमेचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लहान कुटुंबाचा आदर्श स्वीकारावा."

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वय राखून, या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा  शासकीय संस्थेची,कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००



Wednesday, November 19, 2025

 वृत्त क्रमांक 1224

मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड दि. 19 नोव्हेंबर : जिल्ह्यात नगरपरिषदा व  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर 2025 व बुधवार 3 डिसेंबर 2025 मतमोजणीच्या दिवशी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.

नगरपरिषद व  नगरपंचायत मतदार संघात मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे. 

मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बिलोली येथे जनावराचा बाजार तर कुंडलवाडी, उमरी, लोहा येथे आठवडी बाजार तर मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर 2025 रोजी हिमायतनगर याठिकाणचे  आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेश निर्गमित केले आहे.

00000  

 वृत्त क्रमांक 1223

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास

तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन
                                                                                                                                                                                                                                                                                                                
नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : ऊस तोडणी मजूर व मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. संबंधित तक्रार निवारण अधिकारी यांनी तक्रारीचे निराकरण न केल्यास, कार्यालयाच्या ई-मेल rjdsnanded@rediffmail. com वर तक्रार करावी किंवा 02462-254156 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.
                                                                                                                                                                                                                                                                                                                
राज्यात 2025-26 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसात गाळपा होईल एवढी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा यासाठी अनुचित मार्गाचा अवलंब करुन नये. ऊस पिक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत काही तक्रारी असल्यास कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
                                                                                                                                                                                                तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक
                                                                                                                                                                                                                                                                                                            
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. यु-1, लक्ष्मीनगर ता. अर्धापूर साठी आर.टी.हरकळ-8378990760, सुभाष शुगर प्रा.ली. हडसनी ता. हदगाव के.बी. वानखेडे-9423436621, एम.व्ही.के.ॲग्रो फुडस प्रॉडक्टस लि. वाघलवाडा, उमरी ता. नांदेड एम.जी.गाडेगांवकर-9850641709, कुंटूरकर शुगर अँन्ड अँग्रो प्रा.ली. कुंटूर ता. नायगाव साठी एस. देशमुख- 9423508437, ट्वेन्टीवन शुगर लि. यु-3 शिवणी, ता. लोहा साठी एस.ए. पंतगे- 7030908528, शिवाजी सर्व्हीस स्टेशन, मांजरी, बाऱ्हाळी ता. मुखेडसाठी एस.जी.माळेगावे-9359164988 याप्रमाणे तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक आहेत .शेतकऱ्यांनी ऊस तोडणीबाबत काही तक्रारी असल्यास यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक 1222

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत ;

नवीन LOI देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई


नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात असल्याची अधिकृत माहिती महामंडळाने यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सप्टेंबर 2025 अखेर ‘होल्ड’ व ‘ब्लॉक’ केलेली प्रकरणे वगळता व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्या संदर्भात महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही एजंट व ट्रॅक्टर एजन्सींनी संगनमत करून एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक प्रकरणे महामंडळाकडे दाखल केली होती. यातील काही व्याज परताव्याचे पैसे एजंटांने स्वतःच्या खात्यात घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीची दखल घेऊन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना त्वरित कारवाई साठी पत्र पाठविले. पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी तातडीने कारवाई करत तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे संबंधितावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नाशिक व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले असून, तपास सुरू असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशा प्रकारचे गैरव्यवहार घडले आहेत का, याची स्वतंत्र तपासणी सुरू आहे.

नाशिक व अहिल्यानगरसारख्या घटना अन्य ठिकाणी घडू नयेत म्हणून महामंडळाने Account Validation प्रणाली लागू केली आहे. एजंटमार्फत दाखल केलेली अशी प्रकरणे महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात ‘Block’ केली आहेत. ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे Block आहेत त्यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या प्रणालीवर उपलब्ध आहेत.

यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता इतरत्र, एकाच मोबाईल क्रमांक किंवा लॉगिनवरून एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी सुधारणा महामंडळाने प्रस्तावित केली आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रियेतील तांत्रिक सुधारणा पूर्ण करून शक्य तितक्या लवकर नवीन LOI देण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1221

तंबाखू मुक्त युवा अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न                                                                                                                                                                                                                                                              नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणातर्गंत या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत आहे. ही एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण देशामध्ये तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 राबविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पोस्टर्स, पोम्लेटचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम बस स्थानक प्रमुख यासीन खान यांच्या उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, समुपदेशक प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड तसेच जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक येथील लिपिक सुरेश फुलारी, गुलाब रब्बानी व इतर कर्मचारी उपस्थित होते.  
00000


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...