Wednesday, November 19, 2025

 वृत्त क्रमांक 1224

मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड दि. 19 नोव्हेंबर : जिल्ह्यात नगरपरिषदा व  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर 2025 व बुधवार 3 डिसेंबर 2025 मतमोजणीच्या दिवशी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.

नगरपरिषद व  नगरपंचायत मतदार संघात मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालकमहाराष्‍ट्र राज्‍यपुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे. 

मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बिलोली येथे जनावराचा बाजार तर कुंडलवाडी, उमरी, लोहा येथे आठवडी बाजार तर मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर 2025 रोजी हिमायतनगर याठिकाणचे  आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेश निर्गमित केले आहे.

00000  

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...