Monday, April 20, 2020


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्कालीन शेतीचे नियोजन
    COVID-19 च्या उद्रेक व प्रसार कालावधीत रब्बी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. बाजारपेठेतील हालचालींसह उत्पादनाची काढणी व हाताळणी करणे अपरिहार्य आहे कारण शेतीची कामे वेळेवर झाली पाहिजेत. तसेच किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच सामाजिक स्वच्छता व सुरक्षितेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे. या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात स्वच्छ धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे, फेस मास्क परिधान करणे, संरक्षक कपडे आणि उपकरणे व यंत्रसामग्री स्वच्छ करणे या बाबींचा समावेश होतो. शेतावर काम करणाऱ्या लोकांसोबतच सर्वांनी covid-19 चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे महत्वाचे आहे.
गहू –
1)  उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करुन घ्यावी.
2)  कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून शक्य तितक्या कमी मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करुन घ्यावी.
3)  कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करुन सेल्फास वापरुन गोदामात साठवणूक करावी.
4)  काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करुन शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे.
5)      ब-याच भागात गहू पिकाची काढणी जवळपास पूर्ण होत आली असून त्यासाठी मोठे गहू कापणीयंत्र  राज्यामध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर यंत्रांची  दुरुस्ती,देखभाल करण्याऱ्या व हाताळणाऱ्या कामगारांनी तसेच शेतकरी/शेतमंजुर व त्याचे कुटुबातील सदस्य Covid-19 चा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे.
ऊस –
1)   सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पिक 4 महिण्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करुन तण विरहित ठेवावे.
2)   उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊस पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
3)   पाणी कमी असल्यास सरी वरंबा पद्धतीमध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे.
4)   सुरु हंगामी लागवड केलेल्या उस पिकाच्या लागणीस 6 ते 8 आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता 100 किलो नत्र (युरिया 217 किलो) प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावा.
ऊन्हाळी भुईमुग –
1)            ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यावर आंतरमशागत करु नये.
2)            ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीस पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
3)            भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे.
4)            उशिरा भुईमुग पेरणी झाली असल्यास झाडांना माती लावावी.
5)            भुईमुग पिकावर टिक्का रोग येऊ नये म्हणुन कार्बेन्डाझीम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6)            पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास 20 मिली 10 लिटर पाण्यात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
7)            शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी 70 ग्रॅम 00:52:34 , 50 ग्रॅम मल्टीमायक्रोन्युट्रीयंट /15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला -
1)      सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
2)      कांदा काढणीस आला असल्यास काढणी करुन शेतात 3 ते 4 दिवस सुकवावा नंतर पात कापुन 3 आठवडे सावलीत सुकवावा तद्नंतर प्रतवारी करुन साठवणूक करावी.
3)      लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा.
4)      गवार पिकाची तोडणी वेळोवेळी करावी
5)      भेंडी पिकावरील रस शोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट 30 ई.सी. 15 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
6)      भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे त्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
7)      वेल वर्गीय पिकामध्ये रस शोषून घेणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट 30 ई.सी. किंवा इमिड्क्लोरिड 17.8 % एस एल 5 मिली व डायथेन एम-45 (25 ग्रॅम) ची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यातून हातपंपाने करावी.
8)      भेंडी,भोपळा,वांगी इत्यादी भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच भाजीपाला पिकावरील कोळींच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 30% ई.सी., 5 मिली किंवा डायकोफाल 18.5% ई.सी., 20मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
डाळींब -
1)      डाळींबाचा आंबे बहार घेतला असल्यास ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करावे. खत व्यवस्थापनासाठी फर्टीगेशन तंत्राचा वापर करावा.
2)      ब्लोअरच्या सहाय्याने कीटक /रोग नाशकाची फवारणी करावी.
3)      बागेत दोन ओळीत गवत वाढले असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी किंवा रोटावेटरच्या सहाय्याने तण काढावे.
4)      उन्हापासून फळांचे संरक्षण होण्यासाठी फळांना कागदी पिशव्या अथवा जुन्या कापडी पिशव्या च्व आच्छादन करावे.
5)      तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी झाडांची नैसर्गिकरित्या पानगळ होईपर्यंत ताण द्यावा त्यामुळे काड्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच उच्च तापमानामुळे डोळ्यांजवळ असणारे जिवाणू मरुन जातील व पुढिल बहारामध्ये रोगाचे प्रमाण कमी होईल.
6)      बहार छाटणी करतेवेळी शेंड्याकडील 10 ते 15 से.मी. लांबीचा भाग छाटून काढावा तसेच शिफारशीत खतांची मात्रा देऊन नियमित पाणीपुरवठा करावा.
7)      सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 135 किलो कार्बोफुराऍन 3 जी प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे.
द्राक्ष –
1)  फळाच्या काढणीस अडथळा आल्या कारणाने आपले नूकसान टाळण्याकरीता सध्याचा झाडावरील द्राक्षमाल बेदाण्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी उपाययोजना करावी.
2)  पुर्ण काढणी झाली असल्यास व पुढील 10 दिवसांनी खरड छाटणी करण्याचे नियोजन असेल तर तत्पुर्वी जमीन व पाण्याची अन्नद्रव्य व खतांच्या नियोजनासाठी तपासणी करुन घ्यावी.
3)    द्राक्ष घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
4)    काढणी केल्यांनतर घड जास्तवेळ शेतात/बागेत ठेवू नयेत.
5)    घड वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरुन पेटया बंद कराव्यात.
6)    पेटया थंड तापमाणास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेचच 0 ते 2 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात (कोल्डस्टोरेज) दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.
7)    द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.
8)    थॉम्पसन सिडलेस,तास-ए-गणेश, सोनाक, माणिक चमण इ. जाती बेदाण्यासाठी उत्तम आहेत.
केळी -
1)  केळीच्या बुंद्याजवळ वाढणारी पिल्ले नियमित कापावीत. तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापुन बाग स्वच्छ ठेवावी.
2)  ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करुन बाग वापस्यावर राहील याची काळजी घ्यावी.
3)  केळीचा घड निसवल्यावर केळफूल कापावीत.
4)  केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळ्लेल्या पानांची पेंडी करुन केळीचा घड व घडाचा दांडा झाकावा.
5)  केळीचा घड पुर्ण निसवल्यावर त्यावर 0.5 % पोटॅशियम हायड्रोजन फास्फेट +1% युरिया + स्टिकर अथवा 10 पीपीएम 2-4-डी द्रावणाची फवारणी केल्याने केळी घडाच्या आकारमानात व गुणवत्तेत वाढ होईल.
6)  वजनाने मोठ्या असलेल्या घडास बांबूच्या सहाय्याने टेकू द्यावा.
7)  खोडवा पीक घेण्यासाठी मुख्य बागेची 70-75 टक्के निसवन झाल्यावर खोडवा धरावा. त्यासाठी केळी घडाच्या विरुद्ध बाजूचे एकसारख्या उंचीचे तलवारीच्या पात्यासारखी पाने असणारे पिल्ले राखावीत.
8)    केळीला गोलाई येवून लागल्यावर, इजा न करता सकाळी व सायंकाळी काढवीत.
9)    घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळया कराव्यात.
10) फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण अधिक 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
11) द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर क्रेटमध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व 85 टक्के आद्रतेत शीतगृहात तीन आठवडयापर्यंत साठविता येतात.
12) केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर तयार करता येते.
आंबा –
1)  नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना वा-यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा.
2)  मोठ्या झाडांना फळधारणेनंतर जमिनीचा प्रकार, झाडाचे वय, पाण्याची उपलब्धता इ.विचारात घेऊन योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
3)  बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ नये म्हणून फळझाडांच्या खाली वाळलेली पाने, तूर काड्या, उसाचे वाळलेले पाचट इ.चे आच्छादन करावे.
4)    पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी.
5)    फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.
6)    थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.
7)    द्रावणात काढून द्रावण सुकल्यावर फळे वायूविजन असलेल्या सीएमबी पेटयामध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून, 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात.
8)    कच्चा आंब्यापासून लोणेच, आमचूर व पन्हे तयार करता येते.
9)    पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर (पल्स) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.
चिक्कू :-
1)      काढणीस तयार झालेली फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढवीत.
2)      फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
3)      फळे थंड झाल्यावर क्रेटमध्ये किंवा 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.
4)      पिशव्या बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.
5)      पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कु पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिक्कुपासून पावडर तयार करता येते.

कागदी लिंबू :-
1)  काळी माशीच्या नियंत्रणासाठी 15 ग्रॅम असिफेट 75 % पाण्यात मिसळाणारी पावडर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2)    फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी  किंवा सायंकाळी काढावीत.
3)    काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
4)    फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बाबीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5)    द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा क्रेटमध्ये भरावीत.
6)    या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येईल.
7)    कागदी लिंबापासून लोणचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.
मोसंबी :-
1)    फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
2)    फळे पिरगाळून काढू नयेत.
3)    फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळया जागेत पसरुन ठेवावीत.
4)    कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5)    द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर फळे क्रेटमध्ये भरावीत.
6)    क्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.
7)    मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड, रस, सिरप व कार्बेानेटेड शीत पेय तयार करता येतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे शेतमाल कापणी, काढणी, साठवणूक काढणी पश्चात व विपणन नियोजन :
1.    धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
2.    बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असले तर अशा धान्य पिकांची काढणी वेगळी करुन साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सुर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
3.    राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गहू,मोहरी,मका यासारख्या पिकांच्या काढणी /कापणीची कामे सुरु आहेत. सदर कामांसाठी कम्बाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टर किवां इंजिन ऑपरेटेड हार्वेस्टर यासारख्या यंत्रांचा वापर करण्यात येतो. तसेच ज्या ठिकाणी अशा स्वरुपाची यंत्रे उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी मजुरांचे सहाय्याने कापणी करून थ्रेशर द्वारे मळणी करण्यात येते सदर यंत्रांच्या गावांतर्गत/ तालुक्यांतर्गत/ जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी वैयक्तीक व सामाजिक सुरक्षेच्या सर्व उपाय योजना करणे आवश्यक आहे.
4.    शेतमालाची काढणी करण्यासाठी शक्य असल्यास यंत्रांचा वापर करण्यात यावा.तसेच यंत्र हाताळण्यासाठी आवश्यक कामगार उपस्थितीत राहतील असे पहावे.
5.    काढणी यंत्रांचा वापर केल्यास सदर यंत्रे, शेतमाल साठवून ठेवायच्या गोण्या व इतर साहित्य   वापरण्यापूर्वी निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर झाल्यानंतरहि निर्जंतुक करून ठेवावे.
6.    मका व भूईमूग पिकाची काढणी करताना सामायिक यंत्र असल्या कारणाने काढणी यंत्राची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून मगच काढणी करावी.
7.    श्वसनमार्गाचा संसर्ग, एरोसोल आणि धूळ कणांपासून बचाव करण्यासाठी काढणी, मळणी, सुकवणी, मालाची प्रतवारी करताना व पॅकेजिंग करताना सर्व शेतकरी/ कामगारांनी चेहऱ्याला मास्क लावणे आवश्यक आहे.
8.    शेतात / घरात कापणी केलेले धान्य, ज्वारी/बाजरी, डाळींच्या साठवण करण्या अगोदर योग्य वाळवून  घ्या आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील हंगामात ज्या ज्यूट पिशव्याचा वापर केला आहे त्या  पुन्हा वापर करू नका . ५ टक्के  कडुनिंब द्रावणात साठवणुकीच्या पिशव्या निर्जंतुक करून घ्याव्यात.
9.    शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळेपर्यंत साठवणूक करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात ज्यूट पिशव्यांची उपलब्धता व त्याचबरोबर शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, शीतगृह व वेअर हाउसची सोय असावी.
10. शेतमालाची काढणी केल्यानंतर शेतमालाची हाताळणी, वाहतूक करताना तसेच प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत भाग घेताना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता व एकमेकांमध्ये ४-५ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
11. बियाणे उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी बियाणांचा पुरवठा बियाणे कंपनीला करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
12. टोमॅटो, कारली, हिरव्या पालेभाज्या, काकडी,कोबी आदी भाज्यांचे थेट विपणन/पुरवठा करताना वरील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
13. तृणधान्य पिकापासून वेगवेगळे पदार्थ जसे पीठ,रवा, नाचणी सत्व, कुरडया, पापड, चकली, बिस्कीटे इ. तयारी करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
14. कडधान्य पिकापासून डाळी, पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
15. तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार तेल काढून वेष्टण करुन पुरवठा करावा.
16. कांदा काढणीसाठी आला असल्यास काढणी करुन 3 ते दिवस सुकवावा नंतर पात कापून 2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी करुन कांदा चाळीमध्ये हवेशीर साठवावा.
17. लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुडया बांधुन हवेशीर निवा­याला बांधून ठेवाव्यात.
18. कोरोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणी नुसार कमीत कमी हाताळणी करुन, वेष्टण करुन पुरवठा करण्यात यावा.
19. फळांची काढणी योग्य परीपक्वतेला करुन योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.
20. काही फळांचे बाजार पेठेच्या आवश्यकते नुसार लगदा, रस, सिरप, स्क्वॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यामध्ये साठवून पुरवठा करावा.
21. काही फळांपासून लोणची, कॅण्डी, वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन व्यवस्थित साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
22. आंबा पिकापासून आमचूर, लोणचे,मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
23. द्राक्षांपासून बेदाणा तयार करुन शीत कक्षामध्ये साठवावीत.
24. बटाटा व केळी सारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करुन वाळवून साठवावीत.
25. काही फळभाज्यांचे तुकडे करुन वाळवावीत, भुकटी करावी व साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
26. भाजीपाला तसेच मेथी, कडीपत्ता, पालक, कोथंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.
27. लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.
28. आवळा, शतावरी, गवती चहा, अश्वागंधा, हिरडा, बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करुन साठवावी.
29. हळद काढणीला आली असल्यास शिजवून, वाळवून, पॉलीश करुन साठवून ठेवावीत.
30. करोनाच्या परिस्थितीमुळे शहरामध्ये फळे व भाजीपाल्यांचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्या परिस्थितीमध्ये शेतक­यांनी एकत्र येवून सोशल माध्यमांचा जसे व्हॉटस्अॅप, फेसबुक इत्यादीचा वापर करुन लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे व भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकांपर्यंत पोहचावीत.
31. फळे व भाजीपाल्यांपासून व्यापारी दृष्टया बनविण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ खालीलप्रमाणे -
अ.क्र.
फळांचे नाव
व्यापारीदृष्टया महत्वाचे पदार्थ
1
आंबा
कच्चा आंब्यापासून निरनिराळया प्रकाराचे लोणाचे, आंब्याच्या फोडी खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी, आमकुट, पन्हे, स्क्वॅश, सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासून आंबा पोळी (पापड) बर्फी, जॅम, नेक्टर, आंबापाक, टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हबाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.
2
केळी
सुकेळी, भुकटी, वेफर्स, केळीचा पल्स, गोड वेपर्स इ.
3
लिंबु
लोणाची, स्क्वॅश, सरबत, लिंबुपाक, कॉर्डियल
4
अंजीर
सुके अंजीर, जॅम, अंजीर फळांचे हवाबंद डबे (कॅनिंग),अंजीर फळे पाकवीणे (कॅन्डी)
5
आवळा
चवनप्राश, मोरावळा, लोणची, आवळा सुपारी, कॅन्डी, सरबत, पल्स, आवळा चहा.
6
चिंच
कार्बोनेटेड पेय, जेली, चिंचोका काढूण वाळवलेला गर, चिंचेचा पल्स
7
डाळिंब
जेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, आनारदाना, चुर्ण, फ्रोजपदाणे, डाळींबाच्या सालींची वाळवलेली भुकटी
8
पेरु
सरबत, पेरुगर, जेली, चॉकलेट (टॉफी) पेरु वडी
9
चिकू
कच्चा चिकूपासून लोणचे, मध्यमे पिकविलेल्या चिकुपासून मुरांबा आणि कॅन्डी, पिकलेल्या चिकु फळांपासून सरबत, स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकु भुकटी, मिल्क शेक
10
जांभुळ
सरबत, रस, स्क्वॅश, जॅम,बियांची भुकटी
11
पपई
कच्चा पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम, सरबत पेपेन.
12
बोर
बोर खजुर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मुरब्बा, सरबत, जॅम सिरप
13
संत्रा
सरबत, मार्मालेड, जेली, जॅम, सिरप, संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्राच्या सालीपासून वाळवलेली भुकटी
14
द्राक्ष
किसमीस, मनुका, रस, सरबत, सिरप
15
स्ट्रॉबेरी
जॅम डोली सरबत सिरप
16
मोसंबी
रस, सरबत, सिरप
17
सिताफळ
पल्प काढून कमी तापमानाला साठवणे,आईस्क्रीम,मिल्कशेक
18
टोमॅटो
केचप, सॉस, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट
19
मिरर्च (लाल)
वाळवलेली मिरची, लालमिरची पावडर,सॉस, लोणचे,चटणी
20
मिरर्च (हिरवी)
पावडर,लोणाचे सॉस चटणी
21
कोथंबीर
वाळवेली कोथंबीर, भुकटी
22
पालक
वाळवलेली पालक, भुकर्टीं
23
मेथी
वाळवलेली मेथी
24
बटाटा
वेगवेगळे वेफर्स, पावडर, वाळवलेले बटाटा फोडी
25
वांगे
वाळवेल्या बारीक फोडी
26
कांदा
पेस्ट,पावडर, वाळलेल्या चकल्या
27
आले
पेस्ट, सुंठ, पावडर, लोणचे
28
कोबीवफलॉवर
वाळवलेले तुकडे/चकल्या
29
कढीपत्ता
वाळलेला काढीपत्ता, पावडर
30
गाजर
हलवा, वाळलेले बारीक तुकडे
31
वटाणा
गोठवलेला वटाणा, वाळलेला वटाणा
32
कारली
लोणची, भुकटी, रस
33
भोपळा
पावडर, रस, हलवा

कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी तसेच प्रसार रोखण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात :-
v  खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यक व उपलब्ध बियाण्यांचा, सूक्ष्ममूलद्रव्ये,जैविक खते,सेंद्रीय खते यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध कृषि सेवा केंद्र, बियाणे व खते पुरवठा करणाऱ्या संस्था,बियाणे प्रमाणीकरण संस्था, वाहतूक करणाऱ्या यंत्रणा, संबधित अधिकारी व कर्मचारी यांना परवानगी पत्र /पास जिल्हाधिकारी /जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत देण्यात यावे.
v  कृषि क्षेत्रात विविध पातळीवर काम करणाऱ्या कामगार वर्गास, शेतकऱ्यांना,तंत्रज्ञ, मदतनीस, वाहन चालक यांचे कोविड-१९ पासून संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घडिपत्रिका, पत्रके, माहिती पुस्तिका याद्वारे प्रतिबंधात्मक उपायोजना व काळजी कशी घ्यावी यांची मोठयाप्रमाणवर जनजागृती करण्यात यावी.
v  खते,बियाणे व इतर कृषि साहित्य यांची वाहतूक इतर राज्यातून आपल्या राज्यात/जिल्ह्यात होत असेल तर संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी त्या साहित्याची पडताळणी करावी.
v  पिक कापणी प्रयोगासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी ,कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी,शेतकरी  यांना सदर कामासाठी परवानगी पत्र/पास देण्यात यावेत. पिक कापणी प्रयोगाची सर्व माहिती भरण्यासाठी मोबाईल अँप वापरणे बंधनकारक आहे.
v  अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे,शेतमालाच्या नुकसानाची माहिती शासनास सादर करणे अनिवार्य राहील.
v  शेतमाल काढणीनंतर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेत मालाची आवक-जावक करताना संबधित शेतकऱ्यांना, वाहन चालकांना, कामगारांना पास देण्यात यावा तसेच कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपनाचे नियोजन -
            सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किरणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठारे निर्बध लागु करावे लागत आहेत.याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.
1.    शेत मालाची काढणी व विक्री नियोजन :-
सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे नियोजन हे गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करुन आवश्यकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.
2.    शेतकरी उत्पादक संघ/गटामार्फत विक्री :-
केंद्राच्या धतींवर राज्य शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/गटामार्फत शेतमालाची विक्री ई नाम द्वारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाटसअॅप इ. साधनांचा वार करावा यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकीय संस्था, सामाजिक संस्था याचा समावेश करण्यात यावा. सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रसार आणि जागृतीसाठी आकशवाणी, एफ.एम, दुरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.
   ज्या उत्पादनासाठी (उदा.पीठ, दाळी, तेल इ) शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरुन जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/ गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.
3.    शेतमाल वाहतुकीचे नियोजन :-
शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणा­या वाहनांस पुर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीद्वारे नियोजीत केले जावू शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणा­या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येवू शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी  प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही मोठया प्रमाणात गर्दी नियंत्रणात येवू शकते. सदर नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.
4.    निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन :-
आगामी खरीप हंगामाच्या पुर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पुर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीद्वारे नियोजीत केली जावू शकते. यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.

5.    पीक कर्जाची उपलब्धता :-
आगामी खरीप हंगामात शेतक­यांना शेती पुर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खुप मोठया प्रमाणात आवश्यकता असणार आहे. या व्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबतीत योग्य व्यवस्थापन करणेही महत्वाचे आहे. जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर मालाची योग्य साठवणूक करता येईल.त्याचप्रमाणे शेतक­यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जावू शकते, याबाबत शेतक­यांमध्ये जागृकता वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.

पाळीव जनावरे (गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी)
1)      जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता राखावी.
2)      बाहेरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवूनच गोठ्यात जावे.
3)      गोठ्यात चुना भुरभुरावा.
4)      जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी हवे तेव्हा मिळेल याची सोय करावी.
5)      चा-याचा तुटवडा भासू नये, यासाठी शेतातील दुय्यम पदार्थ जसे गव्हाचे काड, हरभरा,तुर इ.चा भुसा साठवून ठेवावा. तसेच मुरघास तयार करुन ठेवावा.
6)      दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसुन घास यासारखी पोषक वैरण द्यावी.
7)      जंताच्या व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशु वैद्यकाच्या सहाय्याने जंतनाशक जनावरांना पाजावे/ लसी टोचून घ्याव्यात.
8)      पशु वैद्यकाच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना स्ट्रॅंगाईल (गोलकृमी) या जंताच्या निर्मुलनासाठी एप्रिल महिन्यामध्ये फेनबेन्डाझोल हे जंतनाशक द्यावे.
9)      उन्हाळ्याच्या सुरवातीस एप्रिल महिन्यामध्ये मेंढ्यांना देवी या रोगाची प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

 टेबल (केवळ खाण्यासाठी) द्राक्षापासून मनुके (बेदाणे) बनविणे–
      कोरोना विषाणू संसर्गाच्या सध्याच्या परिस्थितीत देशांतर्गत बाजारातील कृषीमाल पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला आहे. भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव होण्यापूर्वीच द्राक्ष निर्यात थांबवण्यात आली होती. नाशिक हे टेबल द्राक्ष उत्पादनासाठी ओळखले जाते, तर सांगली व सोलापूर जिल्हा मनुका तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मनुका बनविण्याच्या सोयी सुविधा आवश्यक आहेत. प्रामुख्याने देशांतर्गत किवा निर्यातक्षम बाजारात टेबल द्राक्ष पुरवण्यासाठी द्राक्ष पिकविल्या  जाणाऱ्या प्रदेशात मनुका शेडची सुविधा नसते. सद्यस्थितीत खालील पद्धतीचा अवलंब करून टेबल (केवळ खाण्यासाठी) द्राक्षापासून मनुके (बेदाणे) तयार करता येऊ शकतात.
(संदर्भ- आयसीएआर –राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यांचे कडून प्राप्त सल्ला)
१.   वेलीवर द्राक्ष सुकविणे –
·      द्राक्ष घड असलेली वेल(काडी) आधारासाठी म्हणून वापरात असलेल्या तारांसह बांधावी.
·      द्राक्ष घड असलेली वेल जेथून फुटलेली आहे तेथून २ ते ३ डोळे ठेवून वेल कट करावी.
·      १.५  टक्के तीव्रतेचे इथाएल ओलीएट आणि २.५ टक्के तीव्रतेचे पोटँशियम कार्बोनेटचे द्रावण तयार करावे.याकरिता  १ लिटर पाण्यामध्ये १५ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रम पोटँशियम कार्बोनेट मिसळावे. या द्रावणाचा सामू १०-११ चे दरम्यान असावा.
·      द्राक्ष घडावर तयार द्रावणाची फवारणी करावी.
·       १ लिटर पाण्यामध्ये ११ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रम पोटँशियम कार्बोनेट मिसळून  द्रावण तयार करावे.पहिल्या फवारणीनंतर ३ ते ४ दिवसांनी या द्रावणाची  द्राक्ष घडावर फवारणी करावी.
·      साधारणतः १२ ते १५  दिवसात मनुके (बेदाणे) तयार होतील.
·      जेव्हा मनुक्यांमध्ये १४ – १६ टक्के एवढी आद्रता असेल,तेव्हा वेल (काडी) तारांपासून वेगळी करावी.
·      वेलीपासून मनुके वेगळे करावे.
·      साफसफाई आणि ग्रेडिंग नंतर १० अंश सेल्सिअस तापमानात मनुके साठवावेत.
फवारणीकरिता रसायनांची आवश्यकता - जर द्राक्ष वेलींची लागवड १०*६ फूट अंतरावर असेल आणि एका झाडावर (वेलीवर) ४० ते ५० घड ठेवलेले असतील तर-
प्रथम फवारणी  : आवश्यक द्रावण : एका एकरसाठी १५० लिटर (जेव्हा फवारणीसाठी गन वापरली जाते.)
१५० लिटर द्रावण बनविण्यासाठी  २.२५ लिटर  इथाएल ओलीएट आणि ३.७५ किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता असेल.
दुसरी फवारणी : आवश्यक द्रावण : एका एकरसाठी १५० लिटर(जेव्हा फवारणीसाठी गन वापरली जाते.)
१५० लिटर द्रावण बनविण्यासाठी १.६५ लिटर  इथाएल ओलीएट आणि २.७० किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता असेल.
२.      पीक काढणीनंतर घड सुकणे :
·      कापणीनंतर क्रेटमध्ये  द्राक्षांचे घड गोळा करा.
·      १.५ टक्के तीव्रतेचे इथाएल ओलीएट आणि २.५ टक्के तीव्रतेचे पोटँशियम कार्बोनेटचे द्रावण तयार करावे. याकरिता १ लिटर पाण्यामध्ये १५ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट मिसळावे. या द्रावणाचा सामू १०-११ चे दरम्यान असावा.
·      या द्रावणात द्राक्षांचे घड ३ मिनिटे बुडवा.
·      ७०-८० किलो द्रक्षांसाठी १० लिटर द्रावण आवश्यक आहे. या द्रावणात द्राक्षांचे घड बुडवल्यानंतर,द्रावणाची तीव्रता आणि प्रभाव कमी होतो.
·      द्रावणात बुडवलेले द्राक्षांचे घड काढून जमिनीवर पसरवलेल्या पोलीथिनवर एकाच थरात ठेवा.
·      द्राक्ष बागेतील २ ओळीच्या मधील जागेचा उपयोग सुकवण्याच्या उद्देशाने केला जाऊ शकतो.
·      द्राक्ष घडातील प्रत्येक मण्याला सुकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे घड दररोज हलवा.
·      द्राक्ष घड सुकवण्याच्या काळात तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी या प्रमाणे दोनदा द्रावणाची फवारणी करा.
·      जेव्हा मनुक्याची आद्रतेचे प्रमाण १५ -१६ टक्के पर्यंत कमी होते तेव्हा वाळलेली द्राक्षे गोळा करा.
·      वाळलेल्या देठापासून मनुका वेगळा करा.
·      स्वच्छता आणि ग्रेडिंग नंतर मनुका १० अंश सेल्सिअस तापमानात साठवावेत.
रसायनांची आवश्यकता :
एक टन द्राक्ष सुकविण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचा तपशील खालीलप्रमाणे –
द्राक्षे बुडविण्यासाठी  : १ टन द्राक्षे बुडविण्यासाठी १२५ लिटर द्रावण आवश्यक आहे. याकरिता १.९० लिटर इथाएल ओलीएट आणि ३.१ किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.
प्रथम फवारणी : जर फवारणीसाठी गन वापरली गेली असेल तर एकूण २५ लिटर द्रावण आवश्यक आहे. यासाठी ३०० मिली इथाएल ओलीएट आणि ४५० ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.
दुसरी फवारणी : जर फवारणीसाठी गन वापरली गेली असेल तर एकूण २५ लिटर द्रावण आवश्यक आहे. यासाठी २०० मिली इथाएल ओलीएट आणि ३२५ ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.


।-।-।-।-।-।-।-।-।


अन्न व्यवसाय सुरु ठेवतांना
करावयाच्या उपाययोजना  
नांदेड दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात अन्न पदार्थ उत्पादकांना त्यांचा व्यवसाय सुरु ठेवताना मर्यादित कामगारांचे आरोग्य सुरक्षित अंतर किमान एक मीटर, मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरचा आवश्य वापर करावा. तसेच कलम 144 चा देखील भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून नुकतेच नांदेड जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकासंदर्भात लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना व अन्न आस्थापना सुरु ठेवण्याबाबत निर्देश प्रापत झ्ज्ञाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना केवळ ग्राहकांना पार्सल वितरीत करण्याची मुभा देण्यात आली आहे. किरकोळ किराणा दुकान, घाऊक किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्री केंद्रे, दुध डेअरी, दुध केंद्रे हे व्यवसाय सुरु राहतील. परंतू कामगारांचे आरोग्य, सुरक्षित अंतर किमान एक मीटर, मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.  
शितगृहे, कन्फेक्शनरी, फरसान, मिठाई दुकाने केवळ विक्रीसाठी चालू राहतील. तेथे ग्राहकांना बसुन खाद्य पदार्थ खाण्याची व्यवस्था नसावी, परंतू पार्सल देता येवू शकेल. वरील नमूद सर्व अन्न आस्थापना / औषधी आस्थापनातील उपलब्ध असलेला कर्मचारी वर्ग हा कोरोना मुक्त असल्याची खात्री करावी. प्रत्येक कामगारास मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कामावर रुजू करुन घेऊ नये. ज्या-ज्या अन्न / औषधी आस्थापनामध्ये ग्राहकांना आत प्रवेश असले त्या सर्व ग्राहकांना त्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय आस्थापनेत प्रवेश देवू नये. त्या सर्व ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे.
सर्व प्रकारच्या आवश्यक सेवेमधील खाद्य पदार्थांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
ज्या आस्थापना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी कोव्हीड 19 विरुद्ध आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाचे ठिकाणी आरोग्य विभागाने ठरवून दिलेले सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, याची जिल्ह्यातील अन्न उत्पादक आस्थापना, विक्री आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
00000


जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे
नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाही
घरी 591 जण क्वारंटाईमध्ये  
            नांदेड दि. 20 :- जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 664 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 218 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 37 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 73 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 591 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 10 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 383 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 368 नमुने निगेटीव्ह आले असून 10 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 76 हजार 917 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
000000

किनवटमध्ये डीसीएचसी, सीसीसी या दोन
रुग्णालय व तपासणी केंद्राची स्थापना   
तपासणीसाठीचा घश्याच्या स्त्रवाचा नमुना घेता येणार
-         सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
नांदेड दि. 20 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) व शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले असून कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेल्या रुग्णास येथे प्रविष्ठ करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घश्याच्या स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
          जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. याचाच एक भाग म्हणून  कोरोना नियंत्रणासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात  प्रशासनाच्यावतीने  तयारी करण्यात आली आहे.  उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सर्व वैद्यकीय साधनसामुग्री वऔषधांसह सुसज्ज पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर ( डीसीएचसी ) उभारण्यात आले आहे. तहसिलदार नरेंद्र देशमुख हे या केंद्राचे नोडल ऑफिसर अत्यावश्यक सेवा  म्हणून काम पाहणार असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे वैद्यकीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. एखाद्या नागरिकास ताप, सर्दी, खोकला किंवा श्वासोच्छवासास अडथळा येणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोनासदृश्य रुग्ण म्हणून येथे भरती करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून   चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
          
किनवट येथील नवीन तहसिल इमारतीत शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून तालुका आरोग्य अधिकारी, मेडिकल नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टर व ईतर कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. या केंद्रात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परदेशातून तथा रेड झोन असलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस कोणतीही कोरोनासदृश्य लक्षणे नसतील तरीही त्यांना या केंद्रात भरती करण्यात येणार आहे. चौदा दिवस ते येथेच कोरोंटाईन असतील. या कालावधीत दैनंदिन तपासणीअंती काही लक्षणे आढळल्यास त्यांना डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) मध्ये भरती करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सतर्क राहून अशा व्यक्तिंना घरातच दडून न राहता सदरील केंद्रांत भरती करण्यास प्रवृत्त करावे. आपण जरी ग्रीन झोनमध्ये असलो तरी 'लॉकडाऊन' च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
000000


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना
नांदेड जिल्‍हयात फौजदारी प्रक्रिया दंड संहीतेचे कलम 144 पर्यंत मुदतवाढ
दि. 20 एप्रिल, 2020 ते दि.03 मे 2020 पर्यंत सुधारित आदेश  

नांदेड, दि. 20 :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
            जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हणाले की, कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या आणि सुरु नसलेल्या सुविधांचा आदेश काढलेला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. यामध्ये सकाळी 7-00 ते 11-00 या वेळेत भाजीपाला व सकाळी 11-00 ते दुपारी 1-00 याकालावधीत बेकरी, स्वीट होम सुरु राहतील, परंतु, यामध्ये पार्सल सुविधा उपलब्ध राहील. तसेच जे अधिकारी मुख्यालयी राहणार नाहीत, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. खाजगी दवाखान्यातील ओपीडी सुरु ठेवावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
            जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की, नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, व लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर पडू नये, विनाकारण बाहेर पडल्यानंतर व गर्दी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे श्री. मगर यांनी सांगितले.
आदेश दिनांक 15 एप्रिल 2020 अन्‍वये दि.14 एप्रिल, 2020 रोजी रात्री 24.00 वा. पासून ते दि.30 एप्रिल, 2020 रोजी मध्‍यरात्री 24.00 वा. पर्यंत जिल्‍हयात संपूर्ण ग्रामीण, नागरीव औद्योगिक क्षेत्रात या कार्यालयाने यापूर्वी काढलेले प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले होते.
राज्‍य शासनाकडून प्राप्त आदेश दिनांक 17 एप्रिल, 2020 अन्‍वये त्‍यांचे दिनांक 25 मार्च, 2020 व दिनांक 15 एप्रिल, 2020 ची अधिसुचना अधिक्रमीत करुन दिनांक 20 एप्रिल, 2020 ते दिनांक 03 मे, 2020 पर्यंत अंमलात असणारे  आदेश  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
त्‍याअर्थी, मी डॉ. विपीन इटनकर,भा.प्र.से. जिल्‍हादंडाधिकारी नांदेड,फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्‍वये जिल्‍हयात मनाई आदेश दिनांक 20एप्रिल, 2020 रोजी 00.00 वा. पासुन ते दिनांक 03मे, 2020 रोजी मध्‍यरात्री 24.00 वा. पर्यंत ग्रामीण, नागरीव औद्योगिक क्षेत्रात खालील प्रमाणे जमावबंदी आदेश, पुढील नियमावली आणि उपाययोजना लागु करीत आहे.
सदर लॉकडाऊन कालावधीतपुढील सेवा/कामे
दि. 3 मे 2020 पर्यंत संपूर्ण नांदेड जिल्‍हयात प्रतिबंधित राहतील
परिच्‍छेद 5 (ix) मध्ये गणना केलेल्या उद्दीष्टांकरिता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने करण्‍यात येणा-या प्रवासी वाहतूकिव्‍यतिरिक्‍त  सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक. रेल्‍वेमधुन सुरक्षेच्या कारणास्‍तव होणारा प्रवास वगळता इतर प्रवासी वाहतुक बंद राहील. सार्वजनिक वाहतूकी करिता होणारी बस वाहतूक बंद राहील. वैद्यकिय कारणास्‍तव होणारी हालचाल किंवा या आदेशात पुढे नमुद करण्‍यात आलेले मार्गदर्शक सूचनांन्‍वये परवानगी देण्‍यात आलेल्‍या कारणांस्‍तव होणा-या हालचाल वगळता इतर सर्व व्‍यक्‍तींची जिल्‍हयांतर्गत व राज्‍यांतर्गत होणारी हालचाली बंद राहतील. सर्व शैक्षणिक वप्रशिक्षण देणा-या संस्था बंद राहतील. या आदेशात पुढे नमुद करण्‍यात आलेले मार्गदर्शक सूचनांन्‍वये परवानगी देण्‍यात आलेले प्रकल्‍प वगळता उर्वरित सर्व  औद्योगिक आणि वाणिज्‍य प्रकल्‍प बंद राहतील. या आदेशान्‍वये /मार्गदर्शक सूचनांन्‍वये परवानगी देण्‍यात आलेल्‍या आस्‍थापनांचा अपवाद वगळता इतर सर्वआतिथ्य सेवा बंद राहतील.  टॅक्‍सी (अॅटो रिक्‍शा व सायकल रिक्‍शा यांचे समावेशासह) तसेच कॅब सेवा पुरविणा-या वाहतूक सेवा बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, मॉल्‍स,खरेदी संकुले, व्‍यायामशाळा, क्रिडा संकुले, जलतरण तलाव,मनोरंजन पार्क,प्रेक्षागृहे, बार,सभागृह, यासारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील . सर्व सामाजिक/राजकिय/क्रिडा/मनोरंजन /शैक्षणिक /सांस्‍कृतिक /धार्मि?क इत्‍यादी विषयक इतर सर्व प्रकारचे जमावावर बंद राहील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्‍थळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा ठिकाणी धार्मिक एकत्रिकरणालाकडक निर्बंधअसतील . अंत्यसंस्काराच्या बाबतीतवीसपेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल.
सर्व आरोग्‍य सेवा या चालू राहतील ( आयुष योजनेच्‍या समावेशासह)
दवाखाने, सुश्रुषा गृहे,चिकित्‍सालय, टेलिमेडिसिन सुविधा, दवाखाने, औषधालये, औषध निर्माण केंद्र सर्व प्रकारची औषधी दुकानासह जनऔषधीआणि वैद्यकिय उपकरणाची दुकाने. वैद्यकिय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र. कोविड 19 च्‍या सबंधाने संशोधन करणा-या औषधनिर्माण केंद्रे आणि वैद्यकिय संशोधनप्रयोगशाळा/संस्‍था. पशुवैद्यकिय दवाखाने, रुग्‍णालये,चिकित्‍सालयपॅथॉलॉजी लॅब तत्‍संबंधाने होणारा पुरवठा व विक्री केंद्र तसेच त्‍यावरील लस आणि औषधी पुरवठा केंद्र. कोव्हिड 19 चे प्रतिबंध सबंधाने कार्य करणा-या मान्‍यता प्राप्‍त खाजगी संस्‍था, होम केअर सेवा पुरविणा-या संस्‍था, रोगनिदान संस्‍था,आणि या संबंधाने दवाखान्‍याना पुरवठा करणा-या अशा प्रकारच्‍या सर्व संस्‍था. औषध निर्माण करणारे प्रकल्‍प, वैद्यकिय उपकरणांची निर्मिती करणारे व्‍यवसाय, वैद्यकिय ऑक्सिजन पुरवठा केंद्र आणि या सर्वाना लागणारे पॅकिंग साहित्‍य, कच्‍चा माल व इतर साहित्‍य निर्माण करणारे केंद्र. रुग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे कामे. रुग्‍णवाहीकेसह सर्व वैद्यकिय व पशुवैद्यकिय कर्मचारी, शास्‍त्रज्ञ,परिचारिका,पॅरामेडिकल कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच वैद्यकिय सेवेशी निगडीत सहकारी कर्मचारी यांचे हालचालीसाठी.
कृषि आणि कृषिविषयक कामे
सर्व कृषी आणि बागायती उपक्रम पूर्णपणे कार्यरत राहतील,जसे की- शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्‍यात येणारी शेती विषयक विविध कामे. कृषिविषयक वस्‍तु/सेवांचा खरेदी विक्री करणा-या संस्‍था, ज्‍यामध्‍ये किमान आधारभुत किमत संस्‍थांचा समावेश असेल (ज्‍यामधे तूर,कापूस व हरभरा यांचा समावेश असेल). कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारेसंचलित किंवा शासनाने अधिसूचित केलेल्‍याबाजार ,राज्य सरकारमार्फत  संचलित ऑनलाईन मार्केट, एफपीओ सहकारी संस्‍थाद्वारे तसेच शेतकरी व शेतक-यांचासमूह यांचेकडून खरेदी करणारे केंद्रे व गावपातळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्रे . कृषी करिता लागणारी यंत्रांची दुकाने, त्‍यासाठीआवश्‍यकसुटे भाग यांचा पुरवठा करणारी व दुरुस्‍ती करणारे दुकाने चालू राहतील. शेती यंत्रणेशी संबंधित किरायाणे घ्‍यावयाची साधनांचा पुरवठा करणारी केंद्र. कीटकनाशके, बियाणे,खत इ. चे निर्मिती करणारे व वितरण तसेच किरकोळ विक्री करणारी केंद्र. एकत्रित कापणी करिता लागणारी यंत्रे आणि इतर शेती बागायती अवजारे जसे कापणी व पेरणी संबंधित यंत्रांची  राज्‍या-राज्‍यातील तसेच राज्‍यांतर्गत हालचालीना मुभा राहील.
मत्स्यव्यवसायसंबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
मत्‍स्यव्‍यवसायासंबंधीत प्रक्रीया असणारे व्‍यवसाय (सागरी तसेच अंतर्देशीय ) तसेच मत्‍स्य व्‍यवसायावर अवलंबित असलेले खाद्य प्रकल्‍प,त्‍यांची कापणी/छाणनी त्‍यावरील प्रक्रिया करणारे केंद्र, शीतगृहे, व या सर्वांची विक्री. अंडी उबविणारी केंद्र, मत्‍स्‍य खाद्य वनस्‍पती,व्यावसायीक मस्त्यालये. या सर्व व्‍यवसायासाठी लागणारे मासे / कोळंबी, मत्स्यबीज / खाद्य आणि कामगार यांची हालचाल.
वृक्षारोपण संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
चहा, कॉफी व रबर यांचे रोपण व उत्‍पादन यासंबंधी व्‍यवसाय. सदर व्‍यवसाय हे कमाल 50 टक्‍के कामगारांवर चालू ठेवाता येतील . चहा, कॉफी, रबर,बांबू, नारळ, काजू व मसाला पदार्थ या व्‍यवसायासंबंधाने पदार्थाचे पॅकेजिंग, त्‍यावरील प्रक्रिया, त्‍यांची विक्री व मार्केटिंग हे सुध्‍दा कमाल 50 टक्‍के कामगारांवर चालू ठेवता येतील .
पशुसंवर्धन संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
दुग्‍ध प्रक्रिया प्रकल्‍पांकडून होणारे दुध संकलन, प्रक्रिया, वितरण आणि विक्री तसेच दुग्‍ध व्‍यवसायाशी सबंधित दुग्‍धजन्‍य पदार्थाच्‍या वाहतूक व पुरवठा करणारे व त्‍यावर आधारीत असणारे व्‍यवसाय. पशुसंवर्धन शेती, ज्‍यामध्‍ये पोल्‍ट्री फार्म व अंडी उबवण केंद्र,पशुधन पालन यांचा समावेश असेल. गुरे ढोरे यांचे खाद्य निर्माण करणारे केंद्र, त्‍यासाठी लागणा-या वनस्‍पती, कच्‍चा माल, जसे मका व सोया यांची पुरवठा करणारी यंत्रणा. गोशाळेसह जनावरांकरिताची असलेली निवारा गृहे.

वनसंबंधी गतिविधी
किरकोळ वन उत्‍पादनाशी संबंधीत कामे (संकलन, प्रक्रिया, वाहतुक व विक्री) ज्‍यामध्‍ये पेसा अंतर्गत, पेसा व्‍यतिरीक्‍त व संरक्षित वन क्षेत्रात होणारे तेंदुपत्‍ता संकलनाचे काम व तेदुपत्‍ताची  विक्री केंद्रापर्यंत, गोदामापर्यंत वाहतूकीची कामे, वन क्षेत्रातील वाळलेली/पडलेली लाकुड यापासुन उत्‍पादन होणारी संभाव्‍य आग (वणवा) टाळण्‍यासाठी उक्‍त लाकडाचे संकलन, वाहतूक आणि विक्री .
आर्थिक क्षेत्र संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
सर्व संरक्षण संबंधित सेवा ज्या खाजगी संस्थामार्फत पुरविल्या जातात. तसेच Non-Banking      Financial Companyu(NBFC), SEBI मार्फत मान्‍यता प्राप्‍त Capital and Debt Market सेवा. बॅंकांच्‍या शाखा, एटीएम, बॅंकेकरिता कार्यरत तंत्रज्ञ, बॅंकांचे प्रतिनिधी, एटीएम संबंधित कंपन्‍या लाभाधारकांचे खात्‍यात रक्‍कम जमा करण्‍याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बॅंकेच्‍या शाखा  या नियमितपणे चालू राहतील.  जिल्‍हा प्रशासनाने बॅंकाना पुरेशा प्रमाणात सुरक्षा पुरवावी जेणेकरुन बॅंकेमध्‍ये सामाजिक अंतर, कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍यास बॅंकेस सहाय्य होईल. सेबी आणि सेबी द्वारे सूचित केलेल्‍याभांडवल आणि कर्ज बाजार सेवा. IRDAI आणि विमा कंपन्‍या , सहकारी पत संस्था .
सामाजिक क्षेत्र संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
बालसंगोपन गृहे, दिव्‍यांगाची देखभाल करणारी गृहे, जेष्‍ठ नागरिक, निराधार, परित्‍यक्‍त्या यांचा सांभाळ/देखभाल करणारी ठिकाणे, निरीक्षण गृहे,किशोरवयीन मुलांकरिताची सुधारगृहे, वयोवृध्‍द, विधवा, स्‍वातंत्र सैनिक, तसेच निवृत्‍तीवतेन आणि भविष्य निर्वाह संस्थेकडूनपुरविण्‍यात येणा-या भविष्य निर्वाह निधीची सेवा सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतनाचेवितरणकरणा-या संस्‍था.अंगणवाडी अंतर्गत विविध उपक्रम- लाभार्थीं यांना 15 दिवसातुन एक वेळ द्वारपोच अन्नपदार्थ व पोषणद्रव्य यांचे वितरण करावे परंतू लहान मुले, स्त्रिया आणि स्‍थनदामाता असे लाभार्थी हे अंगणवाडीमध्‍ये हजर राहणार नाहीत.
ऑनलाइन शिक्षण व दुरस्‍थ शिक्षणाकरिता प्रोत्साहन देणे
सर्व शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील. तथापि या शैक्षणिक आस्थापनांनी आपलेशैक्षणिक उद्दीष्‍ट ऑनलाइन शिक्षणाद्वारे पुर्णत्‍वास न्‍यावे. जास्‍तीत जास्‍त दूरदर्शन तसेच इतर शैक्षणिक वाहिन्‍यांचा शिक्षणाकरिता वापर करावा.
मनरेगा अंतर्गत कामांना परवानगी देण्‍यात यावी.
सामाजिक अंतर तसेच तोंडावर मास्‍क लावणे याच्‍या कडक अंमलबजावणीसह मनरेगा अंतर्गत कामांना परवानगी देण्‍यात यावी. मनरेगाअंतर्गत होणा-या कामांमध्‍ये जलसिंचन तसेच जलसंधारणाचे कामांना प्राधान्‍य असावे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या इतर योजनांतर्गत जलसिंचन तसेच जलसंधारणाचे कामांनाही परवानगी आहे. सदर कामांची मनरेगा कामांशी सांगड घालून त्‍याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
सार्वजनिक सुविधा संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
पेट्रोलपंप, घरगूती गॅस तेल कंपन्‍या, त्‍यांचे भांडार इत्‍यादी सबंधित वाहतूक व त्‍यासबंधित कार्यवाही ज्‍यामध्‍ये पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी इ. चा समावेश असेल. केद्र व राज्‍य स्‍तरावर होणारे उर्जा निर्मिती, त्‍यांचे वहन आणि वितरण. टपाल सेवा, ज्‍यामध्‍ये पोस्‍ट ऑफीसचाही समावेश असेल. नगनपालिका/नगरपंचायत तसेच महानगरपालिका या संस्‍थाअंतर्गत होणारा पाणीपुरवठा, स्‍वच्‍छता,कचरा व्यवस्थापन इत्‍यादी कामे. दूरसंचार तसेच इंटरनेट सेवा पुरविणा-या संस्‍था. नैसर्गिक आपत्‍ती अंतर्गत येणारी सर्व कामे/करावयाच्‍या उपाययोजना विशेषत्‍वाने दुष्‍काळ/पाणीटंचाई ज्‍यामध्‍ये टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तसचे वाहनांद्वारे होणारा चारा पुरवठा.
माल व मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना परवानगी असेल
सर्व प्रकारच्‍यावस्तूंच्‍या वाहतुकीला परवानगी दिली जाईल. रेल्‍वे -  यामध्‍ये मालवाहतूक तसेच पार्सल रेल्‍वे यांचा समावेश असेल. मालवाहतूक, तसेच बचाव कार्य व पुर्नवसन या कामांसाठी होणारी हवाई वाहतूक बंदरे आणि अंतरदेशीय कंटेनर डेपो यांचा माल वाहतूकीकरिता, कस्‍टम क्लिअरींग करिता होणारा वापर भूबंदरे यांचा जीवनावश्‍यक वस्‍तू ज्‍यामध्‍ये पेट्रोल एलपीजी तसेच वैद्यकिय सेवांचा / मालाचा समावेश असेल या साठी होणारा वापर. सर्व ट्रक व माल वाहतूक करणारी वाहने ज्‍यामध्‍ये दोन वाहक आणि एक मदतनीस यांचे हालचालीस परवानगी आहे. परंतु वाहकाजवळ वैध परवाना व आवश्‍यक कागदपत्रे बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच माल भरण्यासाठी जाणारे व माल उतरवून येणारे रिकामे  वाहने यांचे वाहतूकीस परवानगी असेल. महामार्गवरील ट्रक ची दुरुस्ती करणारे दुकाने आणि धाबे यांना राज्‍यशासनाने/केंद्रशासनाने ठरवून दिलेल्‍या मर्यादित व्‍यक्ती व विहीत अंतराचे पालन करणेबंधनकारक राहील. रेल्‍वे, हवाईतळ इत्‍यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी/कर्मचारी व कंत्राटी मजूर  यांचे हालचालीस अधिकृत ओळखपत्रा आधारे परवानगी असेल.
जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठ्यास खालीलप्रमाणे परवानगी आहे.
जीवनावश्‍यक वस्‍तुंची निर्मिती करणारे प्रकल्‍प त्‍यावर चालणारे घाऊक तसेच किरकोळ दुकाने तसेच ई-कॉमर्सद्वारे कार्यरत कंपन्‍या या चालू राहतील व त्‍यांना वेळेच बंधन लागू राहणार नाही. किराणा दुकान, राशन दुकान, स्‍वच्‍छता विषयक वस्‍तुंचा पुरवठा करणारी दुकाने,फळे, भाजीपाला, डेअरी, दुध केंद्र, पोल्‍ट्री, मांस, मच्‍छी दुकाने, वैरण, चारा यासाठीचे दुकाने चालू राहण्‍यास परवानगी असेल परंतु त्‍या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील. नागरिकांची घराबाहेर हालचाल होउु नये या?करिता वरिल प्रमाणे दुकानदारांनी द्वारपोच सेवा पुरविण्‍यावर जास्‍तीत जास्‍त भर, प्रोत्‍साहन द्यावे.
खालील व्‍यावसायीक तसेच खाजगी आस्‍थापना कार्यरत राहणेस परवानगी देण्‍यात येते.
प्रसारमाध्‍यमासह इलेक्‍ट्रॉनिक मिडिया ज्‍यामध्‍ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असेल.
( तथापि वृत्‍तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार नाही ). माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा त्‍यामध्‍ये 50 टक्‍के कर्मचा-यांचे संख्‍येने कार्यरत असावेत. माहिती संकलन तसेच कॉल सेंटर कमीत कमी कर्मचारी यांचा वापर करुन चालू ठेवता येतील. ग्रामपंचायत स्‍तरावरील शासनमान्‍य ग्राहक सेवा केंद्र चालू ठेवता येतील. ई-कॉमर्स कंपनीच्‍या कामासाठी वापरण्‍यात येणारी वाहने आवश्‍यक त्‍या परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्‍यामध्‍ये अन्‍न, औषधे, वैद्यकिय उपकरणे आणि विद्युत आणि इलेक्‍ट्रॉनिक  उपकरणे या सारख्‍या सर्वप्रकारचे वस्‍तू आणि मालाचा पुरवठा. कुरियर सेवा , शीतगृहे, गोदाम सेवा, हवाईतळ, रेल्‍वेस्‍टेशन, कंटेनर डेपो, कार्यालये, तसेच कॉम्‍प्‍लेक्‍स यांकरिता खाजगी सुरक्षा पुरविणा-या संस्‍था . लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले पर्यटकांना तसेच वैद्यकिय आणि आपतकालीन कर्मचारी यांना समावून घेतलेले हॉटेल्‍स, निवासस्‍थाने,लॉजेस हॉटेल, मोटेल. क्‍वारंटाईन किंवा निगराणीची सुविधा असलेले केंद्रे/ आस्‍थापना . पार्सल सुविधा/घरपोच सेवा देणारी रेस्‍टॉरेंट्स. घरपोच सुविधा पुरविणा-या व्‍यक्‍तीने चेह-यारील मास्‍क वापरणे तसेच वारंवार हात सॅनिटायझरने स्‍वच्‍छ करणे क्रमाप्राप्‍त आहे.  अशा प्रकारच्‍या आस्‍थापनांनी नियमितपणे त्‍यांचे  स्‍वयंपाकगृहातील कर्मचारीवृंद, तसेच घरपोच सुविधा पुरविणा-या व्‍यक्‍तींची आरोग्‍य तपासणीच्‍या अधिन. घाऊक विक्री व वितरण संबंधी सोयी व सुविधा. कन्‍फेशनरी, फरसाण, मिठाई दुकाने (  उक्‍त ठिकाणी खाण्‍याची बैठक व्‍यवस्‍था  नसावी) . विद्युत वितरण संचरण आणि निर्मिती कंपनीसाठी  आवश्यक विद्युत ट्रान्सफॉर्मर, उपकरणे दुरुस्‍ती दुकाने व वर्कशॉप्‍स इत्‍यादी.
उद्योग/औद्योगिक आस्‍थापना (शासकिय तसेच खाजगी) यांना
खालील नमूद प्रमाणे कार्यरत राहणेस परवानगी राहील.
ग्रामीण क्षेत्रात कार्यरत इंडस्‍ट्रीज जसेच म.न.पा. क्षेत्राचे बाहेरील उद्योग व कारखाने . विशेष आर्थिक क्षेत्रा कार्यरत असणा-या  आणि निर्यातीवर अवलंबून असणा-या औद्योगिक वसाहती,तसेच औद्योगिक टाउनशिपमधीलऔद्योगिक संस्था. या औद्योगिक आस्‍थापनांनी आपले औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्‍या इमारतीमध्‍ये काम करणा-या कामगारांची राहण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तसेच सर्व आवश्‍यक दक्षता घेण्‍यात याव्‍यात. कामगारांची वाहतूकीकरिता स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करुन सामाजिक अंतराची दक्षता घेण्‍याच्‍या अधिन. औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकिय उपकरणे यासह जीवनावश्‍यक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, त्‍यांचे उत्‍पादनास लागणारा कच्‍चा माल पुरविणारे कारखाने . सर्व कृषी, फलोत्‍पादन संबंधीत प्रक्रिया , पॅकींग व  वाहतुक, असे उत्‍पादन केंद्र जे अविरत चलू राहणे आवश्‍यक आहेत. माहिती व तंत्रज्ञान संबंधित हार्डवेअरचे उत्‍पादन करणारे प्रकल्‍प. कोळसा उत्‍पादन, खाणकाम, खनिज उत्‍पादने, त्‍यांची वाहतूक, तसेच खाणकामाकरिता आवश्‍यक असणारे स्‍फोटके यांचा पुरवठा , पॅकींगकरिता /सीलबंद करणेकरिता आवश्‍यक सामग्रीचे उत्‍पादन करणारे प्रकल्‍प, तेल व गॅस उत्‍पादन शुध्‍दीकरण प्रकल्‍प, ग्रामीण भागातील वीटभट्टी म.न.पा. क्षेत्राबाहेरील, गव्‍हाचे पीठ, कडधान्‍य, डाळी, खाद्यतेल यांचे उत्‍पादन/निर्मितीशी निगडीत असणारे मध्‍यम व लघु प्रकल्‍प .
बांधकाम संबंधित कामे
ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांची कामे, जलसिंचन/जलसंधारण प्रकल्‍प, इमारती व सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्‍प, लघु व मध्‍यम उद्योग या ठिकाणी होणारे बांधकाम  म.न.पा. क्षेत्राबाहेरील (ज्‍यामध्‍ये पाणीपुरवठा व स्‍वच्‍छताविषयक बाबी,पॉवर ट्रांसमिशन लाईन यांची उभारणी आणि टेलिकॉम ऑप्टिकल फायबर केबल यांची उभारणी . नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्पांचे बांधकाम. नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत पुर्व परवानगी दिलेली व पुर्वी चालू असलेली बांधकाम प्रकल्‍प महानगरपालिका हद्दी बाहेरुन मजूर न आणण्‍याच्‍या अटीवर चालू ठेवता येतील. मान्‍सूनपूर्व सर्व तातडीची कामे.
खालील परिस्थितीमध्‍ये नागरिकांचे हालचालीस परवानगी देण्‍यात येते.
अशी खाजगी वाहने जी आपत्‍कालीन सेवेसाठी वापरली जातील ज्‍यामध्‍ये वैद्यकिय तसेच पशुवैद्यकिय सेवा तसेच जीवनावश्‍यक वस्‍तुंची खरेदी करीता वापरली जाणारी वाहने यांचा समावेश  असेल. अशा परिस्थितीत चारचाकी गाडी असेल तर चालकासमवेत त्‍यांच्‍या वाहनात एक सह प्रवासी मागील आसनावर बसविण्‍यास परवानगी असेल. दुचाकी वाहनावर फक्‍त चालकास परवानगी असेल. अशा सर्व व्‍यक्‍ती ज्‍यांना राज्‍य शासनाचे निर्देशान्‍वये कामावर हजर राहणे बंधनकारक असेल व त्‍यांना कामाचे ठिकाणी ये-जा करावयाची असेल असे कर्मचारी यास अपवाद असतील.
केंद्र शासनाची कार्यालये त्‍यांची स्‍वायत्‍त कार्यालये/अधिनस्‍त कार्यालये
खालील प्रमाणे चालू राहतील
संरक्षण,केंद्रीय सशस्त्र बल, आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण, आपत्‍तीव्‍यवस्‍थापन,भाकित करणा-या संस्‍था, राष्‍ट्रीय सूचना केंद्र,भारतीय खाद्य महामंडळ, एनसीसी, नेहरु युवा केंद्र हे केंद्रशासनाचे निर्देशानूसार कमित कमी कर्मचारी संख्‍या उपस्थितीवर चालू ठेवता येतील.
राज्‍य सरकार/केंदशासित प्रदेश यांची कार्यालये त्‍यांचे अधिनस्‍थ
तसेच स्‍वायत्‍त कार्यालये खालील प्रमाणे कार्यरत राहतील
पोलीस, होमगार्ड्स,नागरी सुरक्षा, अग्निशमन आणि इतर आपत्‍कालीन सेवा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, कारागृहे, आणि महानगरपालीका सेवा या कोणत्‍याही निर्बंधाविना चालू राहतील. सर्व विभागातीलविभागप्रमुखांनी त्‍यांचे विभागातील 10 टक्के कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करावी. तथापि सार्वजनिक सेवा पुरविणे सुनिश्चित केले जाईल आणि त्यासाठी आवश्यक कर्मचारी तैनात केले जातील व आवश्‍यकतेनुसार व सामाजिक अंतराचा नियम पाळून उपस्थित राहतील. तथापि सदर कर्मचारी यांची वाहतूकीची व्‍यवस्‍था करणे आवश्‍यक आहे त्‍या करिता आवश्‍यक तेवढे कर्मचारी नेमावेत. जिल्‍हा प्रशासन, कोषागारे (ज्‍यामध्‍ये महालेखाकार यांची क्षेत्रीय कार्यालये) ही निर्बंधित कर्मचा-यावर चालू राहतील.  तथापि सदर कर्मचारी यांची वाहतूकीची व्‍यवस्‍था करणे आवश्‍यक आहे त्‍या करिता आवश्‍यक तेवढे कर्मचारी नेमावेत. वन कार्यालये - प्राणिसंग्रहालय चालू ठेवणे व देखरेखीकरिता आवश्‍यक कर्मचारीरोपवाटिका, वन्यजीव, जंगलात अग्निशामक काम पाहणारे, गस्त घालणारे, वृक्षारोपण इ. कामे आणि त्यांची आवश्यक वाहतूक हालचाल.
ज्‍याव्यक्तीचे अलगीकरण/विलगीकरणासाठी अनिवार्य केलेल्‍या व्‍यक्तिंसाठी
खालील प्रमाणे बाबी आवश्‍यक असतील
वैद्यकिय अधिका-यांनी ज्‍या व्‍यक्तिंना ठरवून दिलेल्‍या कालावधीसाठी अलगीकरण/ विलगीकरणाखाली राहणे बंधनकार राहील. ज्‍या व्‍यक्‍ती अलगीकरण/विलगीकरणा संबं?धी नियमांचे उल्लंघन करतील ती व्‍यक्ती भारतीय दंड संहिते 1860 चे कलम 188 अन्‍वये कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. अशा व्‍यक्‍ती ज्‍या दि.15 फेब्रुवारीनंतर नांदेड जिल्‍हयात परदेशातून, परराज्‍यातून, परजिल्‍हयातून आलेल्‍या आहेत व ज्‍यांनी विलगीकरण कालावधी पुर्ण केला आहे व ज्‍यांचे अहवाल निगेटिव्‍ह आलेले आहेत अशाना सोडले जावे परंतु सदर व्‍यक्‍तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्‍यक आहे.
नागरिकांनी घरातच राहावे केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे गरजेचे असेल तरसामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत.सदर आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यानी वरील नियमांची अमलबजावणीकाटेकोरपणे, नियमाला धरून व मानवी दृष्टीकोणातुन करावी.
सदरील आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती,संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल.
ज्या आस्थापना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेल्या आहेतत्यांनी covid-19 विरुद्ध आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाचेठिकाणी आरोग्य विभागाने ठरवुन दिलेले सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणा-यां विरुध्‍द कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.
0000  

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...