Monday, April 20, 2020

किनवटमध्ये डीसीएचसी, सीसीसी या दोन
रुग्णालय व तपासणी केंद्राची स्थापना   
तपासणीसाठीचा घश्याच्या स्त्रवाचा नमुना घेता येणार
-         सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
नांदेड दि. 20 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) व शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले असून कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेल्या रुग्णास येथे प्रविष्ठ करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घश्याच्या स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहेअशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
          जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. याचाच एक भाग म्हणून  कोरोना नियंत्रणासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात  प्रशासनाच्यावतीने  तयारी करण्यात आली आहे.  उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सर्व वैद्यकीय साधनसामुग्री वऔषधांसह सुसज्ज पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर ( डीसीएचसी ) उभारण्यात आले आहे. तहसिलदार नरेंद्र देशमुख हे या केंद्राचे नोडल ऑफिसर अत्यावश्यक सेवा  म्हणून काम पाहणार असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे वैद्यकीय अधिकारीनोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. एखाद्या नागरिकास तापसर्दीखोकला किंवा श्वासोच्छवासास अडथळा येणेदम लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोनासदृश्य रुग्ण म्हणून येथे भरती करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून   चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
          
किनवट येथील नवीन तहसिल इमारतीत शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून तालुका आरोग्य अधिकारीमेडिकल नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टर व ईतर कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. या केंद्रात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परदेशातून तथा रेड झोन असलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस कोणतीही कोरोनासदृश्य लक्षणे नसतील तरीही त्यांना या केंद्रात भरती करण्यात येणार आहे. चौदा दिवस ते येथेच कोरोंटाईन असतील. या कालावधीत दैनंदिन तपासणीअंती काही लक्षणे आढळल्यास त्यांना डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) मध्ये भरती करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सतर्क राहून अशा व्यक्तिंना घरातच दडून न राहता सदरील केंद्रांत भरती करण्यास प्रवृत्त करावे. आपण जरी ग्रीन झोनमध्ये असलो तरी 'लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेअसे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  चला घडवूया विकसित महाराष्ट्र ! विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन ...