Wednesday, February 6, 2019


जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्जसहाय्य
योजनेंतर्गत पात्र अर्जदारांची सोडत
नांदेड, दि. 6 :- जलयुक्त शिवार अभियान तसेच जल व मृदसंधारणाचे कामे करण्यासाठी जलसमृद्धी  (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत उर्वरित पात्र अर्जदारांमधून शुक्रवार 8 फेब्रुवारी 2019 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह नांदेड येथे सकाळी 11 वा. अर्थमुव्हर्स यंत्रसामुग्री वाटपासंदर्भात सोडत काढण्यात येणार आहे.
अर्जदारांनी सोडतीच्या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण फडणीस यांनी केले आहे. याअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या यादीतील 43 पात्र लाभार्थ्यांना कर्जवाटपासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 20 जानेवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 6 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज आगमन झाले. यावेळी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   
मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचेसमवेत राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचेही आगमन झाले. 
तसेच आमदार राम पाटील रातोळीकर, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता गुरप्रीत कौर सोडी, भाजपचे संतूक हंबर्डे, संजय कोडगे यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हिंगोली दौऱ्यावरुन हेलिकॉप्टरने आज दुपारी 4.35 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन झाले व त्यानंतर त्यांचे विमानाने मुंबईकडे प्रयाण झाले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, धनंजय पाटील, तहसिलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती.


000000

( छायाचित्रे – विजय होकर्णे, नांदेड )

Tuesday, February 5, 2019

राज्य कृषी मूल्य आयोगाचे
अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा
नांदेड दि. 5 :- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पाशा पटेल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
  बुधवार 6 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 10.30 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. हिंगोली येथून सोईनुसार लातूरकडे प्रयाण करतील.   
00000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड दि. 5 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार 6 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 6 फेब्रुवारी 2019 रोजी हिंगोली येथून हेलिकॉप्टरने दुपारी 3.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


Monday, February 4, 2019


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे 5 व 6 फेब्रुवारीला आयोजन

नांदेड दि. 4 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  मंगळवार 5 व बुधवार 6 फेब्रुवारी रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात सकाळी 10 ते 5 यावेळात पुणे येथील प्रा. सचिन ढवळे  हे  गणित / सी-सॅट  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. विद्यार्थ्यांनी या दोन दिवसीय मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित रहावे, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000
रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ संपन्न
स्वयंशिस्तीने वाहन चालवून अपघात टाळा
-         पोलीस अधीक्षक संजय जाधव
नांदेड दि. 4 :- स्वत:च्या काळजी बरोबर नियमांचे पालन करुन स्वयंशिस्तीने वाहन चालवून अपघात टाळा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी  केले.  
नांदेड प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधीक्षक श्री. जाधव यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.  
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली व राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यात हे अभियान राबविलेे जात आहे. या अभियानात "सडक सुरक्षा-जीवन रक्षा" हे ब्रीद वाक्य घोषीत करण्यात आले आहे.
यावेळी नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, इतवारा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच उपआयुक्त रावण सोनसळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर, अनंत भोसले, शहर वाहुक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरिक्षक श्री. चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 पोलीस अधीक्षक श्री. जाधव म्हणाले, वाहन चालवतांना मद्यपान, मोबाईल,  हेल्मेट, सीटबेल्डचा वापर, पार्कींग यासारखे नियम तोडून वाहन चालवू नका. आपण जगलो तर हिरो अन्यथा फोटोतला हिरो बनाल यासाठी वाहन चालवितांना वाहनाबरोबरच स्वत:ची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. वाहनधारकांची गती व विचार वाढले असून यातून एका युद्धा एवढे दरवर्षी अपघातात मृत्यू होत आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे सांगून आपल्यासह इतरांचे आयुष्य सुखकर होईल हा विचार मनात ठेवून वाहन चालवा. आईच्या उपचारासाठी रुग्णवाहिकेत आलेला स्वत:चा प्रसंग स्पष्ट करुन गरजू लोकांना रस्ता मोकळा करुन देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
प्रस्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राऊत यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश व विभागाची भूमिका सांगितली. या सप्ताहातील विविध उपक्रम कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच जिल्हयात मागील दोन वर्षात झालेले अपघात व रस्ता सुरक्षा ही एक सर्वाची जबाबदारी असून त्यामध्ये सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात रोखण्यास मदत होईल, असे सांगितले.
मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासने यांनी सुरक्षित वाहतुकीची माहिती दिली. यावेळी पथनाटयाद्वारे रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन याविषयी जनजागृती केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा लिफलेट, वाहतुक नियमावली पुस्तिका, शालेय विद्यार्थ्याच्या वाहतुकीची नियमावली, ई-माहितीपर तयार करण्यात आलेल्या साहित्याचे व नांदेड वाहतूक शाखा यांनी तयार केलेल्या रस्ता सुरक्षाबाबत बॅनरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार व शिक्षक श्री पवळे यांनी केले तर आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी मानले. कार्यक्रमास विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, पत्रकार, ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक-मालक, प्रादेशिक परिवहन व शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.  
000000

Saturday, February 2, 2019


रस्ता सुरक्षा अभियानाचा आज शुभारंभ
4 ते 18 फेब्रुवारी कालावधीत अभियान  
नांदेड दि. 3 :- परिवहन विभाग व पोलीस विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 4 ते 18 फेब्रुवारी कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सोमवार 4 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय एमआयडीसी सिडको नांदेड येथे सकाळी 11.30 वा. होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.  
दैनंदिन जीवनात होत असलेल्या अपघातामुळे दररोज मोठी जीवित व वित्तहानी होत आहे. वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. “सडक सुरक्षा-जीवन रक्षा” रस्ता सुरक्षा अभियान-2019 उद्घाटन समारंभास वाहनधारक, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.  
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...