Monday, February 4, 2019

रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ संपन्न
स्वयंशिस्तीने वाहन चालवून अपघात टाळा
-         पोलीस अधीक्षक संजय जाधव
नांदेड दि. 4 :- स्वत:च्या काळजी बरोबर नियमांचे पालन करुन स्वयंशिस्तीने वाहन चालवून अपघात टाळा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी  केले.  
नांदेड प्रादेशिक परिवहन विभाग शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधीक्षक श्री. जाधव यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.  
केंद्रीय रस्ते वाहतू महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यात हे अभियान राबविलेे जात आहे. या अभियानात "सडक सुरक्षा-जीवन रक्षा" हे ब्रीद वाक्य घोषीत करण्यात आले आहे.
यावेळी नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, इतवारा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच उपआयुक्त रावण सोनसळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर, अनंत भोसले, शहर वाहुक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरिक्षक श्री. चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 पोलीस अधीक्षक श्री. जाधव म्हणाले, वाहन चालवतांना मद्यपान, मोबाईल,  हेल्मेट, सीटबेल्डचा वापर, पार्कींग यासारखे नियम तोडून वाहन चालवू नका. आपण जगलो तर हिरो अन्यथा फोटोतला हिरो बनाल यासाठी वाहन चालवितांना वाहनाबरोबरच स्वत:ची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. वाहनधारकांची गती व विचार वाढले असून यातून एका युद्धा एवढे दरवर्षी अपघातात मृत्यू होत आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे सांगून आपल्यासह इतरांचे आयुष्य सुखकर होईल हा विचार मनात ठेवून वाहन चालवा. आईच्या उपचारासाठी रुग्णवाहिकेत आलेला स्वत:चा प्रसंग स्पष्ट करुन गरजू लोकांना रस्ता मोकळा करुन देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
प्रस्ताविकाउपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राऊत यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश विभागाची भूमिका सांगितली. या सप्ताहातील विविध उपक्रम कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच जिल्हयामागी दोन वर्षात झालेले अपघात रस्ता सुरक्षा ही एक सर्वाची जबाबदारी असू त्यामध्ये सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात रोखण्यास मदत होईल, असे सांगितले.
मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासने यांनी सुरक्षित वाहतुकीची माहिती दिली. यावेळी पथनाटयाद्वारे रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन याविषयी जनजागृती केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा लिफलेट, वाहतुक नियमावली पुस्तिका, शालेय विद्यार्थ्याच्या वाहतुकीची नियमावली, -माहितीपर तयार करण्यात आलेल्या साहित्याचे नांदेड वाहतूक शाखा यांनी तयार केलेल्या रस्ता सुरक्षाबाबत बॅनरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार व शिक्षक श्री पवळे यांनी केले तर आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी मानले. कार्यक्रमाविविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, पत्रकार, ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक-मालक, प्रादेशिक परिवहन व शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.  
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...