Monday, February 4, 2019


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे 5 6 फेब्रुवारीला आयोजन

नांदेड दि. 4 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  मंगळवार 5बुधवार 6 फेब्रुवारी रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात सकाळी 10 ते 5 यावेळात पुणे येथील प्रा. सचिन ढवळे  हे  गणित / सी-सॅट  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. विद्यार्थ्यांनी या दोन दिवसीय मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित रहावे, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...