Saturday, August 18, 2018


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 4.90 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यात शनिवार 18 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 78.33 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 581.35 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 60.84 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 18 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 8.13 (659.37), मुदखेड- 4.67 (742.02), अर्धापूर- 11.00 (625.00), भोकर- 6.00 (772.25), उमरी- 3.00 (586.99), कंधार- 4.77 (552.83), लोहा- 4.33 (532.16), किनवट- 5.43 (675.27), माहूर- 3.75 (888.25), हदगाव- 3.57 (719.32), हिमायतनगर- 5.67 (731.01), देगलूर- 10.17 (231.17), बिलोली- 2.40 (387.00), धर्माबाद- 2.33 (435.99), नायगाव- निरंक (406.60), मुखेड- 3.71 (356.39). आज अखेर पावसाची सरासरी 581.35 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9301.62) मिलीमीटर आहे.  
00000

Friday, August 17, 2018


महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
            नांदेड,  दि. 18 :- महात्मा  गांधी  तंटामुक्त  गाव  मोहिमेअंतर्गत  मोहिमेला  वस्तुनिष्ठ  प्रसिध्दी  देऊन ही  योजना  जनसामान्यांपर्यंत  प्रभावीपणे  पोहोचविणाऱ्या  पत्रकारांसाठी  शासनाने  जिल्हा,  विभाग  व  राज्य  स्तरावर  पुरस्कार  देण्याची  योजना  जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी  आपल्या  प्रवेशिका  सोमवार 27 ऑगस्ट 2018 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त  गाव  मोहीम  पत्रकार  पुरस्कार  जिल्हास्तरीय  समितीच्यावतीने  करण्यात  आले  आहे.   
            जिल्हास्तरीय  प्रथम  पुरस्कार  रुपये  25 हजार, द्वितीय पुरस्कार रुपये 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये 10 हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मुल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे / नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तभंलेखक, मुक्तपत्रकार  पात्र  असतील.  पारितोषिकांसाठी  मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या  अ, ब, क  वर्गवारीतील  वृत्तपत्रे / नियतकालिके  यामधून  प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच  या  पारितोषिकांसाठी  विचार  करण्यात  येईल.
         एका वर्तमानपत्राच्या  प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल.  जिल्ह्यातून  प्रथम  क्रमांक  मिळविलेल्या  पत्रकारांचे  विभागीय  स्तरावरील  पुरस्कारासाठी  आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन  होईल. 
नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, विसावानगर, नांदेड-431602 (दूरध्वनी क्र. 02462-250137)  यांचेकडे  सोमवार 27 ऑगस्ट 2018 पर्यंत  पाठवाव्यात.
0000000

Thursday, August 16, 2018


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 71.87 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात शुक्रवार 17 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 71.87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 1149.84 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 576.46 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 60.33 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 17 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 113.50 (651.24), मुदखेड- 79.67 (737.35), अर्धापूर- 102.33 (614.00), भोकर- 66.50 (766.25), उमरी- 37.33 (583.99), कंधार- 64.50 (548.66), लोहा- 52.17 (527.83), किनवट- 133.29 (669.84), माहूर- 188.00 (884.50), हदगाव- 90.57 (715.75), हिमायतनगर- 86.00 (725.34), देगलूर- 22.17 (221.00), बिलोली- 34.80 (384.60), धर्माबाद- 18.67 (433.66), नायगाव- 28.20 (406.60), मुखेड- 32.14 (352.68). आज अखेर पावसाची सरासरी 576.46 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9223.29) मिलीमीटर आहे.  
00000



भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी
यांच्या निधनाबद्दल देशभर सात दिवसांचा दुखवटा
नांदेड, दि. 16 :- भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यामुळे दि. 16 ते 22 ऑगस्ट, 2018 या संपूर्ण कालावधीत देशभर शासकीय दुखवटा राहील. या कालावधीत कोणतेही कार्यालयीन मनोरंजनाचे (Official Entertainment) कार्यक्रम होणार नाहीत. या कालावधीत संपूर्ण भारतात ज्या ठिकाणी दररोज राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या ठिकाणी वरील कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तात्काळ सूचना द्याव्यात, असे शासनाने कळविले आहे. दिनांक 16 ते 22 ऑगस्ट 2018 पर्यंत अशा ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील याची दक्षता घ्यावी. त्यानंतर 23 ऑगस्ट 2018 पासून पुर्ववत राष्ट्रध्वज चढवावा तसेच 16 ते 22 ऑगस्ट 2018 या कालावधीत कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
0000000


पीपल्स कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
केंद्राचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड, दि. 14 :- जिल्हा प्रशासन व पीपल्स कॉलेज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या वर्ष 2018-19 साठी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्यंकटेश काब्दे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मदाय उपायुक्त सौ. प्रणिता श्रीनिवार यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव श्यामल पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपनाथ पत्की, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक, संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव  उपस्थित होते.  
राज्य शासनाने घोषित केलेल्या महाभरती व पोलीस भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पीपल्स कॉलेज येथे शैक्षणीक वर्षे 2018-19 च्या मार्गदर्शन वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. हे वर्ग विनामुल्य घेण्यात येणार आहेत. या वर्गात लेखी, शारीरिक चाचणी व मुलाखतीची तयारी करुन घेण्यात येणार आहे. गरजूनी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संचालक प्रा. कल्पना जाधव यांनी केले आहे. जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत तयारी करुन घेतल्या जात असून संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000



धर्माबाद येथे बिएलओ बैठक संपन्न
नांदेड दि. 16 :- धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बिएलओची आढावा बैठक तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहाण यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मतदार यादी शुध्दीकरण, निवडणूक डिजीटल ओळखपत्र वाटप, बिएलओ यांनी करावयाचे काम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी शुध्दीकरणबाबत दिलेल्या सुचनेनुसार बिएलओ यांनी चांगल्या पध्दतीने कामे करावेत, असे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहाण यांनी सांगितले. बिएलओ यांनी निरंतर करावयाचे काम बाबत नायब तहसिलदार निवडणूक सुनिल माचेवाड यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत बिएलओ सी. एन. देवके, एस. एम. डीबेवाड, एस. पी. उषापोड, जी. एल कौडेवार , एस. व्ही. चिलकेवार, पी. एस. गोपतवाड, एस. बी. जंगलेकर, क्रांती बुध्देवार, बी. के. तोटावाड, जि. पी. येडलेवाड, एस. जी ऐनवाड, शिवकुमार पाटील, एस. एन तनमुदले, डी. एन शिलारे, लिपीक मिलींद टोणपे, निवडणूक ऑपरेटर मोहन भंडरवाड आदि उपस्थित होते.
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...