Saturday, September 2, 2017

'आपले जिल्हे - विकासाची केंद्रे' 
लोकराज्य विशेषांक प्रकाशित
नांदेड दि. 3 :-  राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या योजना व निर्णयांचा आढावा घेणारा सप्टेंबर महिन्याचा लोकराज्य 'आपले जिल्हे - विकासाची केंद्रे'  हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक सर्वत्र बूक स्टॉलवर उपलब्ध आहे.
या अंकात प्रत्येक जिल्ह्यात राबविलेल्या ‍जलयुक्त शिवार योजना, आपले सरकार, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड मोहीम, स्मार्ट सिटी योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मेट्रो प्रकल्प, आरोग्य योजना, डिजिटल महाराष्ट्र, विविध महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदींच्या अंमलबजावणीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
काही जिल्हे विकासाचे, नाविन्यपूर्ण योजनांचे आदर्श पॅटर्न म्हणून समोर येत आहेत. पालकमंत्री व प्रशासनामुळे विकासकामे सूत्रबद्धरित्या राबविली जात आहेत.
आपल्या जिल्ह्यात कोणकोणती विकासकामे राबवली याचा सविस्तर वृत्तांत वाचकांना या अंकाच्या माध्यमातून वाचायला मिळेल. 76 पृष्ठांच्या या विशेषांकाची किंमत 10 रूपये आहे.

000000
विकास योजनांची माहिती देण्यासाठी  
"संवाद पर्व" उपक्रम निश्चित स्तुत्य
- पोलीस उपअधीक्षक बनकर
नांदेड, दि. 2 :- शासनाच्या विविध विकास योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती संवादाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" सारखा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी केले.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्याकरीता "संवाद पर्व" हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय व श्री यादव गणेश मंडळ हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल आयोजित "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, प्रा. उमाकांत जोशी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय यादव, छायाचित्रकार विजय होकर्णे, प्रा. डॉ. कैलाश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.  
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांना नौकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन मार्गदर्शन शिबीर घेत असते त्याचा लाभ घ्यावा. युवकांकडून अनेकविध विधायक कामे होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करावा व समाजात चांगले बदल घडावावेत. चारित्र्य संपन्न जीवन जगुन आदर्श निर्माण करावा. गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीबांना आर्थीक मदत व विधायक बाबींवर अधीक भर दिला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेतून स्वत:बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा अशोक बनकर यांनी व्यक्त केली.
श्री. हुसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेची माहिती "संवाद पर्व" च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली जाते. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांकडून एमपीएससी, युपीएससी या परीक्षेसाठी मोफत तयारी करुन घेतली जात आहे. जिल्हा ग्रंथालयात मार्गदर्शनाबरोबरच अभ्यासिकेची चांगली सुविधा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. विधायक कामातून पुढची चांगली पिढी घडविण्यासाठी इच्छुकांना चांगली दिशा देण्यासाठी शासनाचे सर्व प्रयत्न आहेत, असे सांगितले.
"संवाद पर्व" या कार्यक्रमामागील उद्देश विषद करुन श्री. गवळी यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाची माहिती दिली. या मासिकात शासनाच्या विविध योजना, घेतलेले निर्णय, उपक्रम याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त आहे. मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  
यावेळी लोकराज्य मासिकाचे वाचक वसंत मैय्या म्हणाले, लोकराज्य मासिकातून शासनाची महत्वपुर्ण माहिती दिली जाते. कमी किंमतीत घरपोच पोहचणारे लोकराज्य मासिकाचे वार्षीक वर्गणीदार सर्वांनी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. उमाकांत जोशी यांनी, "संवाद पर्व" कार्यक्रमातून युवकांना भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. युवकांनी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टी, क्रियाशिलता, मनाचा मोठेपणा ठेवून पुढे गेले पाहिजे जीवनात यश नक्की मिळेल, असे सांगितले.
            प्रास्ताविकात छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी "संवाद पर्व" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहून योजनेची माहिती देत आहेत, असे सांगितले तर प्रा. डॉ. कैलाश यादव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
           
यावेळी उपस्थित मान्यवरांचा व श्री यादव गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिकांचा "लोकराज्य" अंक, "आपला जिल्हा नांदेड" पुस्तिका व "नांदेड जिल्हा वाटचाल विकासाची तीन वर्षपुर्तीची" ही घडीपत्रिका देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विशाल यादव, भारत यादव, गोकुल यादव, भानुदास यादव, नरसिंग मंडले, गौतम जैन, दीपक यादव, बीरबल यादव, बबलू यादव, सुमीत यादव, विजय बटावाले, स्वराज यादव, बंटी फुलारी, युवक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.  

000000
“संवाद पर्व” अंतर्गत विकास योजनेच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
नांदेड, दि. 2 :- गणेशोत्सव काळात विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने “संवाद पर्व” अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत रविवार 3 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 8.15 वा. महिला व बालविकासाच्या विविध योजनांवर आधारीत नांदेडचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. पी. शाहु यांची मुलाखत आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  
000000

Friday, September 1, 2017

जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग झाल्यास
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नांदेड, दि. 1 :- जायकवाडी धरणाची पाणीपातळी 78 टक्‍के क्षमतेने भरली असुन पाऊस होत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा गोदावरी नदीत सोडण्‍याची शक्‍यता केंव्‍हाही निर्माण होऊ शकते. यामुळे जायकवाडी धरणातुन पाण्‍याचा विसर्ग सोडला असता, धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. म्हणून गोदावरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सर्तकता बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 धरणातुन होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पुर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सुचनाही देण्‍यात आलेल्या आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

000000
राज्य परिवहन महामंडळात
शिकाऊ उमेदवारांच्या 55 पदांसाठी भरती
नांदेड, दि. 1 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागामध्ये सन 2017-18 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाचे शिकाऊ उमेदवार म्हणुन 55 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये यांत्रिक-40, विजतंत्री- 6, शिट मेटल वर्क्स-5,पेंटर- 1, अभियांत्रिक पदवीधर / पदवीका-2, अकाउंन्टसी ॲन्ड ऑडीटींग- 1 या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार 20 सप्टेंबर 2017 पर्यंत विभाग नियंत्रक नांदेड कार्यालयात छापील अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य परिवहन विभाग नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम एमआयएस वेबपोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवीधर, पदवीकाधारक, 12 वी व्यवसायभीमुख विषयात अकौटन्सी ॲन्ड ऑडीटींग घेऊन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारानी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करुन MSRTC  Nanded Division या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.   
उमेदवार संबंधीत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणुन विचार केला जाईल व उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म नोंदणी होतील. अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये व मागासवर्गीयासाठी 250 रुपये आहे.  छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 20 सप्टेंबर पर्यंत शनिवार, सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळतील व स्विकारले जातील. बुधवार 20 सप्टेंबर नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही,  ते रद्द समजले जाणार आहेत. असेही  राज्य परिवहन विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
“संवाद पर्व” अंतर्गत विकास योजनेच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन रविवारी प्रसारण
नांदेड, दि. 1 :- गणेशोत्सव काळात विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने “संवाद पर्व” अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत रविवार 3 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 8.15 वा. महिला व बालविकासाच्या विविध योजनांवर आधारीत नांदेडचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. पी. शाहु यांची मुलाखत आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  

000000
“संवाद पर्व” अंतर्गत कृषि योजनांच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
नांदेड, दि. 1 :- गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधन करता यावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने “संवाद पर्व” अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत शनिवार 2 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 वा. आकाशवाणीच्या किसान वाणी या कार्यक्रमात ठिबक सिंचन योजना व मृद आरोग्य पत्रिका या विषयांवर नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांची मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या “संवाद पर्व” अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...