Tuesday, August 2, 2022

 बालसंगोपन योजनेचा लाभ

विनामूल्य व मध्यस्थाविना मंजूर


नांदेड (जिमाका) दि. 2 :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून शुन्य ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ निकषाप्रमाणे विनामूल्य व कोणत्याही मध्यस्थाविना मंजूर करण्यात येतो. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाने आर्थिक रकमेची मागणी केल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शास्त्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम. एस. वाघमारे यांनी केले आहे.

 

शून्य ते 18 वयोगटातील अनाथ  किंवा ज्याच्या पालकाचा पत्ता लागत नाही. जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व कौटूंबिक संकटात असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटूंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही ग्रस्त/बाधित बालके, तीव्र मतिमंद/एकाधिक अपंगत्व बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील संकटातील परिस्थिती मधील बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले) बालके यांना बाल कल्याण समितीच्या मंजुरीने बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...