Tuesday, August 6, 2024

 महत्वाचे वृत्त क्र.  674

 वृत्त क्र  673

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 

जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप 

नांदेड दि. 6 ऑगस्ट :  जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व  त्यांचे सहकारी  यांच्यामार्फत सोमवार 5 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यापैकी 6 बालकांना  कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची  शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित कमी प्रमाणात ऐकू येणाऱ्या  70 बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे.

त्यामुळे बालकांची श्रवण शक्ती वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.    

या शिबिरासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने, डॉ.हनुमंत जाधव, डॉ.विजय पवार यांच्या नेतृत्त्वाखाली RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC व्यवस्थापक विठ्ठल तावडे, ऑडिओलॉजिस्ट श्रीमती श्वेता शिंदे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेतले. 

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजाराचे निदान व उपचार करण्यात येतात. जन्मजात बहिरेपण तपासणी, हृदयरोग तपासणी (2D ECHO), नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्या प्रमाणावर शिबिर आयोजीत करून निदान  आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येते.  

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर  कानाच्या शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

0000



 वृत्त क्र  672 

महसूल पंधरवाडा अंतर्गत दहा ऑगस्टला 'सैनिक हो तुमच्यासाठी' विशेष उपक्रम

 

नांदेड दि. 6 ऑगस्ट : 10 ऑगस्टला जिल्ह्यात महसूल विभाग सैनिकोहो तुमच्यासाठी विशेष उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनाने एक ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा महसूल व सामान्य जनता यांच्या मधला संपर्क वाढविण्यासाठी जनसंपर्क अभियानाचा ठरवला असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

सैनिक व तुमच्यासाठी हा उपक्रम 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले प्रमाणपत्रे मिळण्याबाबतच्या अर्जावर तत्काळ कारवाई करून निकाली काढावे असे आवाहन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडतकर यांनी केलेले आहे.

 

याशिवाय संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी, तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटवाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधावा असे आवाहनही महेश वडदकर यांनी केले आहे.

0000

Monday, August 5, 2024

वृत्त क्र. 671

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी

 


वृत्त क्र. 670

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे

राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ; 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक 

 

·   अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 

 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय.डी.वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल. 

 

सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. 

 

7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. 

 

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईचे संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 669 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा

नांदेड दि. 5 :- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

मंगळवार 6 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2 वाजता हैद्राबाद येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. बुधवार 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून  शासकीय वाहनाने हदगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रुई येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यत हदगाव येथे महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता हदगाव येथून वाहनाने भोकर कडे प्रयाण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यत भोकर येथे युवक-युवती व महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता भोकर येथून वाहनाने नांदेड शहराकडे प्रयाण. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यत नांदेड येथे शुक्ला कॉम्प्लेक्स, नवीन मोंढा नांदेड येथे आगमन व जनसंपर्क विभागीय कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 2 ते 2.30 पर्यत नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड . दुपारी 3 वाजता नांदेड येथून वाहनाने हैदराबाद कडे प्रयाण.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...