Wednesday, November 8, 2023

 पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार

मेळाव्याचे 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 16 व 17 नोव्हेंबर 2023 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी पास/ नापास उमेदवारांसाठी आर्यन असेथिंटीक प्रा.ली. नांदेड या कंपनीत टेलर या 10 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच नवकिसान बायो प्लानेटीक लि. कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह 30 रिक्त पदासाठी 10 वी, 12 व पदवीधर उमेदवारांसाठी व फक्त पदवीधर मुलींसाठी फ्रंन्ट ऑफिस एक्सक्युटीव्ह या एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नांदेड, लातूर , परभणी, सोलापूर या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉ. ऑफ इंडिया मध्ये लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 25 रिक्त पदासाठी इ. 10,12 व पदवीधर उमेदवारांना धर्माबाद, उमरी, नायगाव या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहेत. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

 मातंग व तत्सम पोट जातीतील व्यक्तींनी 20 नोव्हेंबरपर्यत

महामंडळाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मिनी, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादीगा या जातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा व्यक्तीनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नांदेड कार्यालयाशी 20 नोव्हेंबर 2023 पर्यत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि. आर. शिंदे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील जमीनधारकांनी महामंडळाच्या कार्यालयात  येवून अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो या माहितीसह 20 नोव्हेंबरपर्यत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत अर्जासह कागदपत्रे सादर करावीत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

0000

 पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त

राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा

नांदेड (जिमाका) दि. 8 :- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्ते 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासन स्तरावरुन आहेत.

शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व कार्यालयानी राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 जिल्हा युवा महोत्सवात अधिकाधिक युवकांच्या

सहभागासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- युवकांच्या सर्वागिण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने युवा महोत्सवाचे 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नांदेड येथे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या आयोजनात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून सुक्ष्म नियोजन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात युवा महोत्सवाचे आयोजनाबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, डॉ. सान्वी जेठवाणी आदींची उपस्थिती होती.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षीच्या जिल्हा युवा महोत्सवात कृषी विभागाने दिलेल्या संकल्पनेनुसार युवा वर्गाला सहभागी करुन घेवून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचित केले. तसेच तृणधान्याचे आहारातील महत्व प्रत्येकाला कळावे यासाठी तृणधान्यांच्या पदार्थाचे प्रदर्शनही या महोत्सवात भरविण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

सांस्कृतिक, कौशल्य विकास, संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृती याबाबीचा समावेश असणार आहे. या बाबीमध्ये लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), अस्पर्धात्मक बाबींचे आयोजन इ. उपक्रमाचा समावेश असणार आहे. युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवा सहभागी होवू शकतील.  

00000

Tuesday, November 7, 2023

डाकघर अधिक्षक कार्यालयात 

24 नोव्हेंबर रोजी विमा सल्लागार पदाच्या मुलाखती 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजने अंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भर्तीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. यासाठी अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन 24 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर, नांदेड 431601 येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे. सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

 


पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार या पदासाठी  पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहे.  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा.

श्रेणी- बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमा प्रतिनिधीसाठी थेट असे अर्ज करू शकतात.

उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवी चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपी च्या स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा ३ वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र नगरपरिषद गट-क परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत गट-क (श्रेणी अ,ब आणि क) संवर्गाची ऑनलाईन परीक्षा 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं 18 आणि 22 नांदेड या  परीक्षा केंद्रावर एका सत्रात सकाळी 9 ते 11  या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या दिवशी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

 0000

 रमाई आवास योजनेतील

3 हजार 549 पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील कुटूंबाना घर, निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना राबविली जाते. या योजनेत सन 2023-24 साठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एकूण 3 हजार 549 बेघर व पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी दिली.

 

सन 2023-24 या मध्ये जिल्ह्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी प्राप्त उदिष्टांच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडून घरकुलासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्राप्त प्रस्तावांना पालकमंत्री तथा अध्यक्ष रमाई आवास घरकुल योजना जिल्हा निवड समिती, नांदेड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...