Thursday, November 24, 2022

 सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी संवर्गातुन भरण्यात येतील. पदे पुढीलप्रमाणे आहेत.

स्वयंपाकी पद संख्या 2 व सफाई कामगार 1 या पदासाठी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव असा राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मो.क्र. 8918774880 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड

0000

 26 नोव्हेंबर रोजी हुंडा बंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :- हुंडा देणे किंवा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अस्तित्वात आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समाजात जनजागृती व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर हा हुंडा बंदी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालयात हुंडा प्रतिबंधक विषयी चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, इ. आयोजित कराव्यात. तसेच सर्वांनी शनिवार 26 नोव्हेंबर रोजी शपथ घेवुन या अनिष्ट प्रथेस नष्ट करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अ.पी. खानापुरकर यांनी केले आहे.

शनिवार 26 नोव्हेंबर रोजी मी हुंडा देणार नाही किंवा घेणार नाही. मी हुंडा देवून किंवा घेवून होत असलेल्या लग्नास हजर राहणार नाही.  मी हुंडा देवून किंवा घेवून लग्न होत आहे असे समजल्यास अशा लग्नात आहेर किंवा मानपान स्विकारणार नाही. हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडण्याचे कार्य माझे घरापासून सुरु करेन. समाजातील इतर व्यक्तीना हुंडा देण्या किंवा घेण्यापासून परावृत्त करीन व ही अनिष्ट प्रथा मोडण्याचा प्रयत्न करेन अशी शपथ प्रत्येकाने घ्यावी.

0000

 तंबाखू नियंत्रण पथकामार्फत माहूर येथे 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 24 :- माहूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने माहूर शहरात अचानक धाड टाकून 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत 9 तंबाखू विक्रेत्यांवर 4 हजार 600 रुपयांचा दंड आकारला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय पवार व जमादार श्री. आडे आदी होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

जिल्ह्यातील 4432 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 25 हजार 842 पशुधनाचे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 216 बाधित गावात 4 हजार 432 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 242 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 2 हजार 838 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1358 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 25 हजार 842 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 74 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

                                                               तंबाखू नियंत्रण पथकामार्फत

माहूर येथे 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 24 :- माहूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने माहूर शहरात अचानक धाड टाकून 9 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत 9 तंबाखू विक्रेत्यांवर 4 हजार 600 रुपयांचा दंड आकारला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय पवार व जमादार श्री. आडे आदी होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

  सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी संवर्गातुन भरण्यात येतील. पदे पुढीलप्रमाणे आहेत.

स्वयंपाकी पद संख्या 2 व सफाई कामगार 1 या पदासाठी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव असा राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मो.क्र. 8918774880 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड

0000

 26 नोव्हेंबर रोजी हुंडा बंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :- हुंडा देणे किंवा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अस्तित्वात आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समाजात जनजागृती व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर हा हुंडा बंदी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालयात हुंडा प्रतिबंधक विषयी चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, इ. आयोजित कराव्यात. तसेच सर्वांनी शनिवार 26 नोव्हेंबर रोजी शपथ घेवुन या अनिष्ट प्रथेस नष्ट करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अ.पी. खानापुरकर यांनी केले आहे.

शनिवार 26 नोव्हेंबर रोजी मी हुंडा देणार नाही किंवा घेणार नाही. मी हुंडा देवून किंवा घेवून होत असलेल्या लग्नास हजर राहणार नाही.  मी हुंडा देवून किंवा घेवून लग्न होत आहे असे समजल्यास अशा लग्नात आहेर किंवा मानपान स्विकारणार नाही. हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडण्याचे कार्य माझे घरापासून सुरु करेन. समाजातील इतर व्यक्तीना हुंडा देण्या किंवा घेण्यापासून परावृत्त करीन व ही अनिष्ट प्रथा मोडण्याचा प्रयत्न करेन अशी शपथ प्रत्येकाने घ्यावी.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...