Thursday, November 24, 2022

 26 नोव्हेंबर रोजी हुंडा बंदी दिन साजरा करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :- हुंडा देणे किंवा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अस्तित्वात आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समाजात जनजागृती व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर हा हुंडा बंदी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालयात हुंडा प्रतिबंधक विषयी चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, इ. आयोजित कराव्यात. तसेच सर्वांनी शनिवार 26 नोव्हेंबर रोजी शपथ घेवुन या अनिष्ट प्रथेस नष्ट करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अ.पी. खानापुरकर यांनी केले आहे.


शनिवार 26 नोव्हेंबर रोजी मी हुंडा देणार नाही किंवा घेणार नाही. मी हुंडा देवून किंवा घेवून होत असलेल्या लग्नास हजर राहणार नाही.  मी हुंडा देवून किंवा घेवून लग्न होत आहे असे समजल्यास अशा लग्नात आहेर किंवा मानपान स्विकारणार नाही. हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडण्याचे कार्य माझे घरापासून सुरु करेन. समाजातील इतर व्यक्तीना हुंडा देण्या किंवा घेण्यापासून परावृत्त करीन व ही अनिष्ट प्रथा मोडण्याचा प्रयत्न करेन अशी शपथ प्रत्येकाने घ्यावी.

0000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...