Thursday, November 24, 2022

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळनांदेड कार्यालयाच्यावतीने सन 2022 -23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जात आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज  तत्सम 12 पोटजातीतील तसेच मांतग समाजातील राज्य स्तरावरील  क्रीडा पुरस्कार प्राप्त (महिला  पुरुष) व्यक्तीना  सैन्यदलाती विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी च्छू अर्जदाराकडून थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज महामंडळाच्या कार्यालयात सोमवार 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

 

थेट कर्ज योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये आहे. भौतिक उदिष्टे लाभार्थी संख्या 70 असून आर्थिक उदिष्टे 70 लाख रुपये आहे. जिल्ह्यातील मांग/मातंग समाज  तत्सम 12 पोटजातीतील च्छू अर्जदाराचे वय 18 वर्षे र्ण असावे50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी  ग्रामीण अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावेअर्जदाराने या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावानियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत साधारपणे समाविष्ट विविध लघु व्यवसाय व शेतीशी निगडीत पुरक/जोड व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थि राहु दाखल करावेत. त्रयस्त/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

कर्ज प्रकरणासोबत जोडावयाची कागदपत्रे याप्रमाणे आहेत. जातीची दाखलाउत्पन्नाचा दाखला रेशनकार्डची झेरॉक्स प्रत,  आधार कार्डपॅन कार्डची झेरॉक्स प्रततीन पासपोर्ट फोटोव्यवसायाचे परपत्रक (कोटेशन)व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, नमुना नं आठ, लाईट बिल  टॅक्स पावतीग्रामपंचायत/नगरपालिका/महानगर पालीका यांचे प्रमाणपत्र किंवा शॅ ॲक्ट परवानाव्यवसाय संबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखलाशैक्षणीक दाखलाअनुदान किंवा कर्जाचा लाभ  घेतलेले प्रमाणपत्रअर्जदाराचे सीबील क्रेडिट स्कोअर 500 असावाअर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बॅक खात्याचा तपशील सादर करावा,  प्रकल्प अहवालप्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वता:च्या स्वाक्षरीने साक्षांकीत करावीएका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेच्या समोरहिंगोली रोडनांदेड या ठिकाणी स्विकारले जातील.

0000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...