Thursday, November 24, 2022

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान,

मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम


नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार रविवार  18 डिसेंबर 2022 रोजी मतदानाच्या दिवशी व मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी  रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून व मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.  

 हा आदेश नांदेड जिल्ह्यातील माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) रिक्त असलेल्या पदासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात रविवारी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत आणि मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.  

नांदेड तालुक्यातील बळीरामपूर, पांगरी (), सिध्दनाथ, मार्कड, चिमेगाव, बोंढार तर्फे नेरली, एकदरा तर अर्धापूर तालुक्यातील डौर, देगाव कुऱ्हाडा, भोकर तालुक्यातील चिंचाळा प.भो, कोळगाव बू., नांदा खु., मुदखेड तालुक्यातील वरदडा तांडा, हदगाव तालुक्यातील तालंग, वरंवट/जांभळसावली, मनुला बु., माटाळा, गोर्लेगाव, बेलमंडळ, हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव, किनवट तालुक्यातील जरुर, अंबाडी, अंबाडी तांडा, अंजी, बेंदी, बेंदी तांडा, बोथ, बुधवार पेठ, भंडारवाडी, भिलगाव, दिगडी म, दरसांगवी सी, दहेली, धावजी नाईक तांडा/दहेली तांडा, दुन्ड्रा, दाभाडी, दिपला नाईक तांडा, धामनदरी, जरुर तांडा, मलकजाम, मलकजाम तांडा, मारलागुडा, मरकागुडा, माळकोल्हारी, नंदगाव, नंदगाव तांडा, निराळा, पिंपरी, पार्डी खु, पाटोदा खु, पार्डी सी, पाटोदा बु, मारेगाव खा, मोहाडा, रोडा नाईक तांडा, सारखणी, सालाईगुडा, बेल्लोरी ज, चिखली खु, उनकदेव, शनिवारपेठ, वाळकी बु, देवला नाईक तांडा, चिखली बु, पांधरा, पिंपरफोडी, वडोला, तोटंबा, मारेगाव वरचे, भिमपूर, बेल्लोरी धा, पळशी, माहूर तालुक्यातील तांदळा, पाचुंदा, महादापूर, कुपटी, पवनाळा, लखमापूर, मालवाडा, बोरवाडी, पानोळा, वानोळा, गुंडवळ, इवळेश्वर, बंजारातांडा, पडसा, मच्छिद्र पार्डी, दिगडी पार्डी, दिगडी कु, हिंगणी, शेख फरीद वझरा, मांडवा, दत्तमांजरी, वायफणी, भोरड, रुई, भगवती, लांजी, शेकापुर, धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव, आटाळा, बाभुळगाव, उमरी तालुक्यातील करकाळा, बिलोली तालुक्यातील गागलेगाव, टाकळी खु,  दगडापूर, हरनाळा, भोसी, दौलतापूर, हिप्परगाथडी, कोळगाव, गळेगाव, नायगाव तालुक्यातील सुजलेगाव, अंतरगाव, रुई खु., सातेगांव, पिंपळगाव, तलबिड, ताकबिड, मुखेड तालुक्यातील लोणाळ, सुगाव बु, सुगाव खु/पैसमाळ, कोळगाव, बोरगाव, औराळ, भेडेगाव बु, भेडेगाव खु, हिप्पळनारी, थोटवाडी/सन्मुखवाडी, निवळी, राजुरा ख/ठाणा, चिंचगाव, लिंगापुर, रावणकोळा कंधार तालुक्यातील जंगमवाडी, लालवाडी, पोखर्णी, सोमठाणा, गुलाबवाडी, नवरंगपुरा, मानसपुरी, गांधीनगर, उमरज, पाताळगंगा, चौकी धर्मापुरी, सावरगाव नि., कोटबाजार, इमामवाडी, दिग्रस खु, लोहा तालुक्यातील पिंपरणवाडी, भेंडेगाव, मडकी, सोनखेड, वाळकेवाडी, पळशी, पारडी, बामणी, खरबी, चिंचोली, नांदगाव, कांजाळ तांडा, कांजाळा, मंगरुळ, काबेगाव, मस्की, हिप्परगा चि, बेरळी खु., पोलेवाडी, घुगेवाडी, कदमाची वाडी, दगडसांगवी, हाडोळी जा. हरणवाडी, लव्हराळ, रिसनगाव, नगारवाडी, लिंबोटी, नायगाव तालुक्यातील मरवाळी/कोपरा, देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव, कंधार तालुक्यातील घुबडवाडी, माहूर तालुक्यातील वसराम तांडा, किनवट तालुक्यातील सकुनाईक तांडा या ग्रामपंचायतीचा  सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमात समावेश आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...