प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास
Saturday, August 27, 2022
Friday, August 26, 2022
जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सि
00000
नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 119 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे धर्माबाद 2 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 404 एवढी झाली असून यातील 1 लाख 687 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2 तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 5 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 7 असे एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 577
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 95 हजार 756
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 404
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 687
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
00000
नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलींद वाघमारे यांनी केले आहे.
0000
Thursday, August 25, 2022
नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 110 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, माहूर 1, हिमायतनगर 1 असे एकूण 4 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 400 एवढी झाली असून यातील 1 लाख 682 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 8 असे एकूण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 458
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 95 हजार 642
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 400
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 682
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 01
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
00000
ई-पीक पाहणीसाठी जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम
- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
· जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांनी माहिती नोंदवावी यासाठी ही मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 25 :- खरीप हंगाम 2022 ची पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू करण्यात आली असून यात शंभर टक्के पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. तथापि या पाहणीत शंभर टक्के पिकाची नोंदणी होण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करून मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले आहे.
जिल्ह्यात एकुण 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे. यात गावांची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. अर्धापूर-64, उमरी-63, कंधार 123, किनवट 176, देगलूर 109, धर्माबाद 56, नांदेड 104, नायगाव 89, बिलोली 92, भोकर 79, माहूर 83, मुखेड 135, मुदखेड 54, लोहा 126, हदगाव 135 तर हिमायतनगर तालुक्यात 68 गावे आहेत. प्रत्येक गावासाठी उद्दीष्टानुसार प्रती गाव दहा प्रमाणे एकुण 15 हजार 560 स्वयंसेवकाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक स्वयंसेवकामार्फत किमान 20 शेतकऱ्यांची नोंदणी याप्रमाणे एकुण 3 लाख 11 हजार 200 म्हणजेच 2 लाख 80 हजार 882 उद्दीष्टांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करण्यासाठी तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, तरुण मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांची त्या-त्या गावातील पीक पेरा भरून घेण्याबाबत मदत घेतली जाईल.
00000
Wednesday, August 24, 2022
नांदेड जिल्ह्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 195 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 9 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 12 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 396 एवढी झाली असून यातील 1 लाख 679 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 5 असे एकूण 8 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 16, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 9 असे एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 348
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 95 हजार 537
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 396
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 679
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 05
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
00000
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...