Thursday, April 21, 2022

 किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी

विशेष ग्रामसभेचे रविवारी आयोजन 

नांदेड, (जिमाका)  दि. 21 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहिम संपूर्ण देशभर सुरू करण्यात आली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार राज्यात पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 14 लाख 93 हजार एवढी आहे. यापैकी 89 लाख 36 हजार लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. यात जवळपास 33 लाख 57 हजार पी.एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्याप किसान क्रेडिट कार्डधारक नाहीत. यांनाही किसान क्रिडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ही मोहिम देशभर राबविली जात आहे. 

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करुन दिलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स विकास, नाबार्ड आणि‍ जिल्हा अग्रणी बँक यांच्या समन्वयातून ही मोहिम राबविली जात आहे. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हे अग्रणी बँक व संबंधित उपनिबंधक सहकार यांना जिल्ह्यातील तालुका व गावनिहाय पी. एम. किसान लाभार्थ्यांची बँक खाते तपशिलासह यादी उपलब्ध करुन देतील. संबंधित बँका किसान क्रिडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन त्यांना 1 मे 2022 पर्यंत कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील, असे कृषि आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पी. एम. किसानचे धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्याचे जिल्हा व्यवस्थापक हे कृषि विभागाच्या समन्वयाने ग्रामसभेत या योजनेविषयी माहिती लोकांपर्यंत पोहचवतील. याचबरोबर दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय पिक विमा पाठशाळेचे आयोजन केले जाणार आहे. या पाळशाळेतही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांचा यात सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न केला जाणार आहे. किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत सर्व विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी दिली.   

000000

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 46 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 300

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 285

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- निरंक

आज उपचार घेत असलेले रुग्ण- निरंक

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- निरंक

0000

सुधारीत वृत्त

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 21 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

गुरूवार 21 एप्रिल 2022  रोजी मुंबई येथून विमानाने नांदेड विमानतळ येथे सायं 8 वा. आगमन. शुक्रवार 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. नांदेड येथून मोटारीने उदगीर जिल्हा लातूरकडे प्रयाण करतील. उदगीर येथून मोटारीने नांदेड येथे दुपारी 3.30 वा. आगमन व राखीव. सायं. 6 वा. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. स्थळ- आय. जी. ऑफिस समोर, नवीन कौठा परिसर नांदेड.

000000

 


Wednesday, April 20, 2022

 आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी

भरती मेळाव्याचे गुरुवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने तसेच डीजीटी यांच्या मान्यतेने गुरुवार 21 एप्रिल 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सकाळी 9 ते सायं. 5 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. या भरती मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्या भाग घेणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंशकालिन प्राचार्य एम. एस. बिरादार आणि सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. एस. परघणे यांनी केले आहे.

 

या भरती मेळाव्यासाठी उमेदवारांनी पुढीलप्रमाणे आवश्यक मुळ कागदपत्रे व सत्यप्रत घेवून उपस्थित रहावे. यात आधार कार्ड,  दहावी उत्तीर्ण गुणपत्रक, आय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्रक, इडब्लुएस / जात प्रमाणपत्र आणि फोटो इत्यादी तसेच काही अडचणी किंवा शंका असल्यास मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Tuesday, April 19, 2022

 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने संरक्षण क्षमता महोत्सव-2022 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला महत्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे जीवाश्म इंधनावरील अपव्यय खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे, जीवाश्म इंधानाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूचा प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे.पेट्रोलीयम संरक्षण संघटना, पेट्रोलियम नैसर्गिक वायु मंत्रालय आणि तेल उद्योगाचे समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य  सरकारच्या सक्रीय सहभागाने विविध उपक्रम हाती घेणे.

 

दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये उद्योगासाठी तांत्रिक बैठका, सायक्लोथॉन, वॉकथॉन, शालेय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा, वादविवाद महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र, वॉल पेंटिंग स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख, लेखन, टिव्ही रेडिओवर टॉक शो, जिंगल्स, या माध्यमातून ऊर्जेच्या वापराबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागृतता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 69 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणात असलेल्या 1 कोरोना बाधिताला बरे झाल्याने सुट्टी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 215

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 200

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

 खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या

कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 19 :- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषि विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात अनधिकृत बियाणे, रासायनिक खते व किटक नाशके यांची विक्री होत असल्यास संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषि विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, रेल्वे डिसीएम जय पाटील, पोलीस उप अधिक्षक डॉ.आश्विनी जगताप, कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेट्टे, महाबीज जिल्हा प्रतिनिधी, एमएआयडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा पणन अधिकारी प्रतिनिधी, सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद, कृषि विक्रेते यांचे प्रतिनिधी व रेल्वे रॅक वाहतुकदार, माथाडी कामगार संघटना प्रतिनिधी मुनेश्वर, मोहिम अधिकारी जी.एन.हुंडेकर, कृषि अधिकारी पी.आर. माने, व्ही.एस.निरडे, खत पुरवठादार कंपनी, बियाणे पुरवठादार कंपन्याचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

रेल्वे, वाहतुकदार, माथाडी कामगार अधिकारी यांनी रासायनिक खताच्या वितरणास रेल्वे निर्बंधामूळे अडचण येणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच 100 टक्के अनुदानित खत विक्री ई-पॉश मशिनद्वारेच करुन खताची पोहोच 24 तासाच्या आत झाली पाहिजे. आवंटनानुसार खत कंपनीचे प्रतिनिधीनी खते उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरवठा कृषि विभागाकडून मंजूर करुन घ्यावा. बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त नसलेले एचटी -बीटी बियाणे विक्री होणार नाही यांची दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात रासायनिक खताचे नियोजन करण्यासाठी कृषि सेवा केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधिताना दिल्या.  

यावेळी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते व संभाव्य अडचणी/नियोजन यांचे सादरीकरण कृषि विकास अधिकारी चिमणशेट्टे यांनी केले. खरीप हंगामासाठी 7 लाख 56 हजार 200 हे. क्षेत्र खरीप पिकासाठी प्रस्तावित असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र 4 लाख 40 हजार हे. सोयाबीन पिकाखाली प्रस्तावित आहे. घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे खरीप अपेक्षित सोयाबिन पेरणीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी  सांगितले. सोयाबीन क्षेत्रासाठी 1 लाख 15 हजार क्विंटल बियाणे मागणी नोंदविलेली आहे. यानुसार सोयाबीन बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यास सर्व खताची मिळून 2 लाख 11 हजार 110 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे.  युरिखताचे 66 हजार 160 मे. टन, डीएपी खताचे 38 हजार 980 मे. टन, एम.ओ.पी.खताचे 18 हजार 390 मे. टन, एस.एस.पी.खताचे 25 हजार 650 मे. टन , एन.पी.के.एस.खताचे 61 हजार 930 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यास युरिया 4 हजार 350 मे. टन व डीएपी 3 हजार 590 मे. टन बफर स्टॉक खरीप हंगामासाठी नोडल एजन्सी म्हणून एम.ए.आय.डी आहे. खरीप नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरावर 1 व तालुका स्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यास बफर स्टॉकसाठी नेमणूक केलेल्या नोडल मार्कफेड व एमए आयडीसी एजन्सीच्या साठवणूक गोडाऊनला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...