Tuesday, May 4, 2021

बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी मंत्रालयीन पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय - पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत निर्णय

                                                       बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी  

मंत्रालयीन पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत निर्णय

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यातील पेरणीमध्ये असलेली विविधता, विविध पिकांसमवेत सोयाबीन पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक असलेला कल कृषी विभागाने लक्षात घेणे आवश्यक आहे. गतवर्षी सोयाबीन पेरणीमध्ये जी आव्हाने निर्माण झाली ती लक्षात घेता या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणांची सहज उपलब्धता व्हावी यासाठीही दक्षता घेतली पाहिजे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात एकूण सोयाबीन बियाणांची अपेक्षित मागणी लक्षात घेता जवळपास 50 हजार क्विंटल कमतरता दिसून येत आहे. ही कमतरता येत्या पेरणीपुर्वी पूर्ण करण्याचे कृषी विभागातर्फे नियोजन जरी केले जात असले तरी यातील संभाव्य आव्हाने लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांसाठी त्रास होवू नये या उद्देशाने मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून मार्ग काढू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामाची आढावा बैठक आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, अधिष्ठाता दिलीप म्हेसेंकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  रविकुमार सुखदेव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे बियाणांची उगवण न झाल्यामुळे तर कांही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या विमाधारक शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याबाबत विमा कंपन्यांना महाराष्ट्र शासनाने आदेश निर्गमित केले. हे आदेश देवूनही अनेक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम अदा झालेली नाही. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन पातळीवर दाद मागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याही वर्षी पावसाचा अंदाज हा समाधानकारक असल्याने स्वाभाविकच जिल्ह्यातील पेरा हा वाढणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्ज वाटपाबाबतचे नियोजन वेळेत झाले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज हे 15 ऑगस्टपूर्वी वितरण व्हावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन आणि कापूस खरेदी केंद्र याचा पुन्हा एकदा आढावा घेणे गरजेचे आहे. किनवट, माहूर, मुखेड, लोहा या तालुक्यात कापसाचे अधिक होणार उत्पादन लक्षात घेता कापसाचे अतिरिक्त खरेदी केंद्र किती ठिकाणी सुरु करता येतील याचे नियोजन करण्याबाबतही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सांगितले.

खते व निविष्ठा याबाबत आजच्या घडिला पूर्व तयारी म्हणून मागणीच्या 50 टक्के सामग्री उपलब्ध आहे. उर्वरित 50 टक्के खतांची पूर्तता शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे वेळेत पूर्ण केली जाईल, असे कृषी विभागाच्यावतीने बैठकीत सांगण्यात आले. उगवण क्षमता नसणाऱ्या सोयाबीन बियाणांची विक्री ज्यांच्यामार्फत झाली त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. याच्या तपासाबाबत लवकर कार्यवाही होण्यासाठी पोलीस विभागाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नांदेड जिल्ह्याचे सुमारे 10 लाख 33 हजार 100 हेक्टर क्षेत्रापैकी येत्या 2021-2022 हंगामामध्ये सुमारे 8 लाख 2 हजार 780 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 लाख 43 हजार 590 एवढी शेतकरी संख्या आहे. या बैठकीत मान्यवर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत अनुपालन अहवाल सादर करुन विभागाने केलेल्या कार्यवाहीची कृषी विभागाने माहिती दिली.

0000

Sunday, May 2, 2021

जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते

 

जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांना 

बोलता व ऐकता यायला लागते




नांदेड (जिमाका) दि.
 1:-आजचा काळ हा कोरोनाच्या दृष्टिने शासकीय आरोग्य विभागासाठी अत्यंत आव्हानात्मक जरी असला तरी नागरिकांच्या इतर आजारांकडे शासनाला दुर्लक्ष करता येत नाही. ग्रामीण भागातील माता बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल, क्षयरोग निर्मुलन अभियान असेल, कुष्ठरोग निवारण अभियान या साऱ्या नागरिकांच्या आरोग्य विषयक विविध उपक्रमांची जबाबदारी आरोग्य विभागातर्फे अत्यंत समर्थपणे सुरु आहे. यातील अशाच एका महत्वाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांची निवड करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया व बोलता येण्यासाठी स्पीच थेरपीचा उपचार करुन त्यांना बोलता येण्यासह ऐकण्याच्या दृष्टिनेही समर्थ केले.


नांदेड जिल्ह्यात
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. या तपासणीतून गंभीर आजार असल्यास अथवा कुण्या बालकांमध्ये व्यंग असल्यास त्याचेही मोफत उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. या उपक्रमातंर्गत वैद्यकीय पथकाकडून शोध घेतलेल्या 90 मुक कर्णबधीर बालकांची तपासणी व उपचाराबाबत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ.सुधीर कदम व त्यांची टिम कडून तपासणी करून त्यामधून 30 बालकांची बेरा तपासणी केली असता 15 बालकांना कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे निष्पण झाले होते. या 15 बालकांचे कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्यापूर्वी CT, MRI, ECG, 2D Echo आणि रक्ताच्या सर्व चाचण्या ह्या ग्रामिण/उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय येथे मोफत करण्यात आल्या. या 15 बालकांमध्ये नांदेडमधील 2, नायगावमधील 4, लोहा 2, कंधार 1, किनवट 2, भोकर 1, हिमायतनगर 2, उमरी 1 या बालकांचा समावेश आहे.

शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या 78 लक्ष रुपये खर्चाची तरतुद आवश्यक होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे सदरील अनुदान उपलब्ध नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

या सर्व बालकांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी सामजस्य करार करण्यात आलेल्या यशश्री ENT हॉस्पिटल मिरज-सांगली येथे या 15 बालकांची अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. सदर शस्त्रक्रीया पार पाडण्यासाठी 78 लक्ष रुपये खर्च शासनाने केला. त्या बालकांचे बहिरेपण दूर झाले असुन पालकांनी निशुल्क वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हयातील कार्यरत राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, वैद्यकीय आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व ANM यांनी सध्याच्या करोना महामारी  काळात सुद्धा बालकांच्या पालकांचे यशस्वी समुपदेशन करून शस्त्रक्रीया केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

0000

कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकार्याची नितांत गरज ! महाराष्ट्र दिनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 

कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकार्याची नितांत गरज !

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 1:- लोकसहकार्याशिवाय कोरोनाला रोखणे शक्य नाही. राज्याचे प्रशासन मागील वर्षभरापासून कोरोनाविरूद्ध लढते आहे. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते आहे. त्यांच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यशस्वी करायचे असेल तर नागरिकांनी प्रशासनाचे निर्देश आणि खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करून सहकार्य करण्याची नितांत गरज असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

शनिवारी महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न झाल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. महाराष्ट्र ही शुरविरांची भूमि आहे. अनेक मोठ-मोठी संकटे महाराष्ट्राने परतवून लावली आहेत. यापूर्वी आपण प्लेग, देवी, टीबी सारख्या अनेक आजारांचा मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोनावरही आपण नक्कीच मात करू, असा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. मागील काही वर्षात आपण पूर्वीच्या तुलनेत आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या. परंतु, कोरोनाचा जोर इतका प्रचंड आहे की, संपूर्ण देशभरात आज सुविधा तोकड्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत संयम न सोडता नियोजनपूर्वक आणि सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केले तर कोरोनाला रोखणे सोपे होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे राज्य हे रयतेचे असावे, हेच एकमेव उदिद्ष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे सरकार काम करते आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा व इतर विकासात्मक कामांची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा हा कार्यक्रम अगदीच मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

0000  

कोणतीही कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण, ग्रामीण आरोग्य सुविधेत आता 52 रुग्णवाहिकेची भर , राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्धता

 

जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यासाठी

कोणतीही कमतरता पडू देणार नाही

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

ग्रामीण आरोग्य सुविधेत

आता 52 रुग्णवाहिकेची भर

 

                          राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्धता 


नांदेड (जिमाका) दि.
 1:- नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रयत्नांची शर्त केली जात आहे. जिल्ह्याचा भव्य विस्तार व 38 लाखाच्या जवळपास असेलेली लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात 12 ग्रामीण रुग्णालय, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 377 आरोग्य उपकेंद्रे उभारुन आपण आरोग्य सुविधेचे जाळे भक्कम केले आहे. या व्यतिरिक्त चार उपजिल्हा रुग्णालय, एक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, एक आयुर्वेदिक महाविद्यालय, एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे.  या सर्व आरोग्य सुविधेचा विचार करुन ही सेवा अधिक भक्कम होण्यासाठी आता जिल्ह्यात 52 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत असतांना स्वाभाविकच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

          


महाराष्ट्र दिनानिमित्त या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषदेचे सदस्य आमदार अमर राजूरकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर
, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड -19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांमध्ये रेफरल ट्रान्सफोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा आता या ॲम्बुलन्स उपलब्धतेमुळे आणखी चांगल्या प्रकारे होणार आहे. याचबरोबर गरोदर मातांची मोफत तपासणीसाठी, लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व केंद्रापर्यंत अत्यंत कमी कालावधीत लसीकरणाचा साठा पोहचविणे, ग्रामीण भागातील, दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात विविध सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणली जात आहे. जिल्ह्यात यापुर्वी जी काही वाहने उपलब्ध होती ती अनेक वर्षांपासून उपयोगात असल्याने त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. यामुळे सदर जुने वाहने निर्लेखन केल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत या ॲम्बुलन्स नांदेड जिल्ह्यासाठी घेणे शक्य झाले.

0000




 

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड (जिमाका) दि. 1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. माधवराव पाटील जवळगावकर,                           महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

Friday, April 30, 2021

1 हजार 304 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 665 व्यक्ती कोरोना बाधित 21 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

 

698                       1 हजार 304  कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 665 व्यक्ती कोरोना बाधित

 21 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 19 अहवालापैकी 665 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 520  तर अँटिजेन तपासणीद्वारे 145 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 80  हजार 182 एवढी झाली असून यातील 67  हजार  611  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  10  हजार  757 रुग्ण उपचार घेत असून 181 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 28 ते 30 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 552 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पिंगळी येथील 80 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील बोधडी येथील 85 वर्षाचा पुरुष दिनांक 29 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे किनवट येथील 85 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 63 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील 55 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 70 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे अर्धापूर तालुक्यातील देलूब येथ्ज्ञील 71 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथे आर्शीवाद नगर नांदेड येथील 80 वर्षाची महिला, श्री गणेशा रुग्णालय येथे पटेल कॉलोनी नांदेड येथील 63 वर्षाची महिला, गोदावरी रुग्णालय येथे येथे तुप्पा नांदेड येथील 26 वर्षाचा पुरुष, नारायणा रुग्णालय येथे करीमलकापूर तालुका देगलूर येथील 75 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथे पांडुरंगनगर नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, लोटस रुग्णालय येथे अश्रु नगर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव तालुक्यातील तामसा येथील 70 वषाचा पुरुष, तृप्ती नगर नांदेड येथील 37 वर्षाचा पुरुष, देगलूर तालुक्यातील तमलूर येथील 45 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 48 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 52 वर्षाचा पुरुष, शक्ती नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, हदगाव येथील 55 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 210, बिलोली 7, हिमायतनगर 8,माहूर 23,उमरी 5, लातूर 2,  नांदेड ग्रामीण 8, देगलूर 52, कंधार 39, मुदखेड 26, परभणी 6, वाशिम 2, मुखेड 39, यवतमाळ 2, नायगाव 3, हिंगोली 8 असे एकूण 520 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30, बिलोली 1, माहूर 8, मुखेड 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 17, मुदखेड 2, नायगाव 5, अर्धापूर 10, धर्माबाद 6, किनवट 26,  हिंगोली 6, भोकर 2, हदगाव 5, लोहा 4, परभणी 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 145 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 304 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 696, धमार्बाद तालुक्यातंर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 19, अर्धापूर तालुक्यातंर्गत 12, उमरी तालुक्यातंर्गत 52, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 28, मुखेड कोविड रुग्णालय 64, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुगणालय 45, हिमायतनगर तालुक्यातर्गत 38, बिलोली तालुक्यातंर्गत 44, किनवट कोविड रुग्णालय 23, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 38, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 21, कंधार तालुक्यातंर्गत 43, माहूर तालुक्यातंर्गत 20, लोहा तालुक्यातंर्गत 62, खाजगी रुग्णालय 116 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 11 हजार 757 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 180, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 167, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 85, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 114, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 94, देगलूर कोविड रुग्णालय 37, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 39, बिलोली कोविड केअर सेंटर 72, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केअर सेंटर 31, उमरी कोविड केअर सेंटर 29, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 63, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 51, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 66 , मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 10, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 39, एनआरआय कोविड केअर सेंटर 55, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 33 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 4 हजार 608, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 914, खाजगी रुग्णालय 1 हजार 896, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 10 हजार 757 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 35 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 60 हजार 840

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 71 हजार 170

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 80 हजार182

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 67 हजार 611

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 552

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-43

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-103

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-494

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 10 हजार 757

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-181

00000

 

ताळेबंदी कालावधीत 15 मे पर्यंत वाढ जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आदेश

 

ताळेबंदी कालावधीत 15 मे पर्यंत वाढ

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून सद्या लागू असलेले ताळेबंदीचे आदेश 15 मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात दिनांक 15 मे 2021 रोजी सकाळी 7 वा. पर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्‍यात आली आहे.

फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 च्या कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिनांक 22 एप्रिल, 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी व शर्ती जशाच तशा लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 15 मे पर्यंत ताळेबंदीचा (ब्रेक द चेन) कालावधी वाढविला आहे.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...