Monday, January 11, 2021

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क

अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 


नांदेड (जिमाका) दि.
 11 :- जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत.जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करु असा सक्त इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.


आज रात्री 8-00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून कोरोना लसीकरण आणि बर्ड फ्ल्यूबाबतच्या नियोजनाबाबत आढावा घेवून निर्देश दिले. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शरद पाटील, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000

 

 25 कोरोना बाधितांची भर तर

28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 11 :- सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 25 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 518 अहवालापैकी 490 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 866 एवढी झाली असून यातील 20 हजार 733 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 354 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 4 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, लोहा तालुक्यात 1, देगलूर 1, मुखेड तालुक्यात 1,माहूर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, पूर्णा तालुक्यात 1 असे एकुण 17 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, कंधार तालुक्यात 1, लोहा 1, मुखेड तालुक्यात 1  असे एकुण 8 बाधित आढळले.  

 

जिल्ह्यात 354 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 26, मुखेड कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 17, देगलूर कोविड रुग्णालय 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 145, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 60, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 34 आहेत.  

 

सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 62 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 1 हजार 23

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 65 हजार 122

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 866

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 733

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3  

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-354

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.            

00000 

Sunday, January 10, 2021

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गौरव

 

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या

प्रसुतीशास्त्र विभागाचा गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गौरव

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करीत नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आनंद व्यक्त करुन शासनाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी येथील विकास कामांना मदत करुन सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे रुग्णांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन देता येत असल्याचे सांगितले.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने 11 डिसेंबर, 2017 पासून ‘लक्ष कार्यक्रम’ सुरु केला आहे. या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रिरोग व प्रसुतीशास्त्र विभागाने महिलांच्या मनात बालमृत्यू रोखण्यासाठी योग्य उपचारासह विश्वास निर्माण केला. याच्या अंमलबजावणीसाठी जे गुणांकन ठेवण्यात आले होते त्यात 96 टक्के गुण मिळवून वैद्यकीय सेवेतील गुणवत्ता सिध्द करुन दाखविली.

आपल्या आरोग्य विभागाच्या धोरणानुसार प्रत्येक गरोदर महिलेला प्रसुतीसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासकीय रुग्णालयांना सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण 38.7 टक्क्यावरुन 78.9 टक्के एवढे वाढले आहे. लक्ष कार्यक्रमाअंतर्गत सर्व शासकीय महाविद्यालयामधील व इतर संस्थेमधील प्रसुतीगृहातील व इमरजन्सी ऑपरेशन थिएटरमधील सुविधा सुसज्ज व अद्ययावत करणे, हाय डिपेन्डन्सी युनिट, गंभीर रुग्णांसाठी ऑबस्टेस्ट्रीक आयसीयू तसेच नवजात बालकांसाठीच्या सुविधा अद्ययावत करणे याकडे लक्ष देण्यात आले.

            सद्यस्थितीत 1 लाख माता प्रसुतीमध्ये भारतातील माता मृत्यू दर हा सन 2001 ते 2003 या कालावधीत 301 होता. 2011 मध्ये हा दर 167,  2016 मध्ये हा दर 130 होता. 2020 मध्ये हा दर अवघ्या 70 वर रहावा असे उद्दिष्ट  देण्यात आले होते. या उद्दिष्टाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रासह, केरळ आणि तामिळनाडूने यशस्वी जबाबदारी पार पाडून दाखविली आहे. आंध्रप्रदेश व तेलंगना यांचे उद्दिष्ट पुर्णत्वाकडे आहे.

 हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनानुसार भारतास दर 1 हजार रुग्णांसाठी एक  डॉक्टर 20.6 टक्के हेल्थ केअर वर्करर्स आवश्यक आहेत. ते प्रमाण अनुक्रमे 10 हजार रुग्णांमागे एक डॉक्टर व तर 22.8 टक्के हेल्थ केअर वर्करर्स असे आहे. यानुसार 6 लाख डॉक्टर्स व 20 लाख नर्सिंगची कमतरता आहे. ही तफावत लक्षात घेवून उपलब्ध असलेल्या डॉक्टरांचे व निर्सिंगचे योग्य ते प्रशिक्षण करुन हा कार्यक्रम यशस्वी राबविणे आव्हानात्मक होते. अशा स्थितीत आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे यश संपादन केले.

येथील स्त्रीरोग व प्रसुतीगृहातील सोयीसुविधांची तपासणी गुणांकन करणाऱ्या पथकाने 96 टक्के एवढे गुण देवून आपल्या येथील प्रसुतीसंबंधित रुग्णसेसेवा ही अत्यंत अद्ययावत व दर्जेदार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

            या संपूर्ण यशामागे कर्तव्यदक्ष संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा आहे. तसेच स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शामराव वाकोडे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत डॉ. फसिहा तसनीम, डॉ. शिरीष दुलेवाड, डॉ. जयदिप सोळंके , डॉ. स्वाती कापसीकर, डॉ. मेघा झरीकर, सर्व निवासी डॉक्टर्स प्रसुतीगृहातील कार्यरत सर्व नर्सिंग स्टाफ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे अविरत कार्य आहे. या यशासाठी महाविद्यालयातील विभागप्रमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण, मेट्रन सौ. आपटे यांनी विभाग प्रमुख डॉ. वाकोडे व त्यंच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

0000

25 कोरोना बाधितांची भर तर 32 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 

25 कोरोना बाधितांची भर तर

32 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 10 :- रविवार 10 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 25 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 32 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 844 अहवालापैकी 818 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 841 एवढी झाली असून यातील 20 हजार 705 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 357 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 3, जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, माहूर तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 32 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, कंधार तालुक्यात 1, देगलूर 1, असे एकुण 16 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, नायगाव तालुक्यात 1, देगलूर 3 असे एकुण 9 बाधित आढळले.  

 

जिल्ह्यात 357 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 19, देगलूर कोविड रुग्णालय 16, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 56, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 39 आहेत.  

 

रविवार 10 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 90 हजार 83

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 64 हजार 103

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 841

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 705

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-402

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-357

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9. 

00000

Saturday, January 9, 2021

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयात माहे जानेवारीच्या दुसऱ्या मंगळवारी 12 जानेवारी 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 12 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 44 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- शनिवार 9 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 44 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 35 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 35 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 905 अहवालापैकी 845 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 816 एवढी झाली असून यातील 20 हजार 673 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 364 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार 9 जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 25, खाजगी रुग्णालय 5, माहूर तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 3 असे एकूण 35 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 23, मुखेड तालुक्यात 1, लोहा 2, कंधार 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, हदगाव 1, अदिलाबाद 1 असे एकुण 35 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, मुखेड तालुक्यात 1, लोहा 2, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, भोकर 1 असे एकुण 9 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 364 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 29, मुखेड कोविड रुग्णालय 21, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 7, देगलूर कोविड रुग्णालय 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 164, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 53, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 33 आहेत.   

शनिवार 9 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 169, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 59 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 89 हजार 565

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 63 हजार 620

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 816

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 673

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-06

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-364

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10.           

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...