Wednesday, August 19, 2020

वृत्त क्र. 775   

इसापूर धरणाचा पाणीसाठा 73 टक्क्याच्या पुढे

पेनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता

नांदेड (जिमाका) दि. 19 :- पुसद तालुक्यातील पैनगंगा नदीवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर) धरण 73 टक्के भरले असून या धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने धरणाच्या पाणी पातळीत अतिशय वेगाने वाढत होत आहे. सध्या धरणात अंदाजे 753 घनमी / सेकंद इतका येवा येत आहे. अशाच प्रमाणात येवा धरणात येत राहिल्यास येत्या 4 ते 5 दिवसात धरण शंभर टक्के भरेल. इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.

 संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांना सुचना देण्यात आली आहे, अशी माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

00000

139 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 230 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- बुधवार 19 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 139 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 230 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 86 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 144 बाधित आले.

 आजच्या एकुण 1 हजार 59 अहवालापैकी  857 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 555 एवढी झाली असून यातील 2 हजार 700 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 666 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 175 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 मंगळवार 18 ऑगस्ट रोजी लोहा येथील 65 वर्षाचा एका पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील 52 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर बुधवार 19 ऑगस्ट रोजी आनंदनगर नांदेड येथील 43 वर्षाची एक महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 60 वर्षाची एक महिला, विष्णुपुरी नांदेड येथील 54 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे व वजिराबाद नांदेड येथील 84 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.

आज बरे झालेल्या 139 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 1,  हदगाव कोविड केअर सेंटर 4, माहूर कोविड सेंटर 3, बिलोली कोविड सेंटर 18, किनवट कोविड सेंटर 4 , नायगाव कोविड सेंटर 12, मुदखेड कोविड सेंटर 7, मुखेड कोविड सेंटर 28 , पंजाब भवन कोविड सेंटर 13, देगलूर कोविड केअर सेंटर 9, धर्माबाद कोविड सेंटर 31, खाजगी रुग्णालय 3, अर्धापूर कोविड सेंटर 4 असे एकूण 139 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 24, बिलोली तालुक्यात 6, हदगाव  तालुक्यात 13, कंधार तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1, हिंगोली तालुक्यात 1 , लातूर 1, नांदेड ग्रामीण 3, भोकर तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 13, लोहा तालुक्यात 11, नायगाव तालुक्यात 7, परभणी 2 असे एकुण 86 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 92, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर तालुक्यात 5, लोहा तालुक्यात 2, मुदखेड तालुक्यात 3, धर्माबाद तालुक्यात 16, उमरी तालुक्यात 6, नांदेड ग्रामीण 5, भोकर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 6, नायगाव तालुक्यात 2, हिंगोली 1 असे एकुण 144 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 666 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 188, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 766, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 31, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 37, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 104,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 52, हदगाव कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 21,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 99, किनवट कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 3, मुदखेड कोविड केअर सेटर 31,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 4, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालयात 129 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 727,

घेतलेले स्वॅब- 31 हजार 649,

निगेटिव्ह स्वॅब- 25 हजार 320,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 230,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 555,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,

एकूण मृत्यू संख्या- 159,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 700,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 666,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 271, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 175.

 प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

Tuesday, August 18, 2020

 

वृत्त क्र. 774   

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी

ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध क्षेत्रामध्ये जसे औद्योगिक, महामंडळ, पॅरामेडीकल सेक्टरमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी गुरुवार 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत करण्यात आला आहे.

 

मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जॉब फेअर (भरती मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Link for Google form https:/docs.google.com/forms/d/e/1FalpQLSegmDAM6YXO5ou1f_cRFIL4gyDBWM9Yj2pHQYWpz89tj5b6zQ/viewform?usp=sf_Link

Video Conference Link https://global.gotomeeting.com/join/779416021  या लिंकवर 20 ऑगस्ट रोजी गुगल  फॉर्म (google form) मध्ये नोंदणी करुन व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे भरती मेळावा ऑनलाईन जॉब फेअरसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

Access Code- 779-416-021 या लिंकवर उपस्थित  रहावे, असे आवाहन नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

00000

अटी व शर्तींच्या अधिन राहून

संगणक संस्था, एमकेसीएल केंद्र सुरु करण्यास मुभा

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य संगणक संस्था, केंद्र (एमकेसीएल) यांना अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. या संस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील व प्रत्येक रविवारी संस्था पुर्णत: बंद राहतील.

 

इयत्ता दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागले असून शासनस्तरावर विविध पदांच्या भरती प्रक्रिया तसेच इच्छुक उमेदवारांना एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुर्ण करुन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी, उमेदवारांनी विनंती अर्ज केले आहेत. शासनमान्यताप्राप्त संगणक संस्थांनी सर्व निकष पाळून संगणक संस्था / केंद्र (एमकेसीएल) सुरु करण्याची विनंती केली आहे.  

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य संगणक संस्था, केंद्र (एमकेसीएल) सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुढील दिलेल्या अटी व शर्तीच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहिल.

 

·         कोवीड-19 अंतर्गत केंद्र, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकार राहील.

·         जिल्ह्यातील सर्व शासनमान्य एमकेसीएल केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधीत तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी.

·         कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामजिक अंतर प्रत्येक व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.

·         कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना यामधुन वगळण्यात यावे तसेच नांदेड जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये ये-जा करण्यास सक्त मनाई राहील.

·         विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवही दररोज अद्यावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल.

·         जिल्ह्यातील सर्व वरीलप्रमाणे संस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत व शनिवारी या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील व प्रत्येक रविवारी संस्था पुर्णत: बंद राहतील.

·         कोरोना कालावधीत ज्यावेळी जिल्हा / तालुका बंद ठेवण्याबाबत अथवा जमावबंदी करण्याबाबत किंवा लॉकडाउन घोषीत करण्यात येईल त्या कालावधीत संस्था बंद ठेवणे अनिवार्य राहिल.

·         प्रत्येक विद्यार्थ्यांचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी तसेच शक्यतो प्रत्येक उमेदवाराने हॅन्डग्लोजचा वापर करावा.

·         विद्यार्थ्यांच्या तोंडाला मास्क लावणे अनिवार्य राहिल. त्याचप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणे अनिवार्य राहिल.

·         दोन तुकड्यांमध्ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्येकवेळी हॉल स्वच्छ व संगणक सॅनिटाईज करावेत.

·         कोवीड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधीत लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रवेश देऊ नये.

·         शासन निर्धारीत शुल्कापेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. तसे आढळल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

·         एकावेळेस हॉलमध्ये किमान 5 उमेदवार व एक अद्यापकाशिवाय इतरांना प्रवेश निषिब्ध करावा.

·         विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा दुरध्वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्यात यावा. कोविड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या दिलेल्या सर्व सुचना दर्शनी भागात लावाव्यात व त्या सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.

·         प्रत्येक विषयांसाठी एमकेसीएल केंद्रात स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी.

·         विद्यार्थ्यांच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोवीड-19 चा रुग्ण नसल्याची खात्री करावी.

·         प्रत्येक संस्थाचालकाने व सर्व विद्यार्थ्यांसहित सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहिल.

·         प्रत्येक उमेदवारांचे आरोग्य कार्ड तयार करुन शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदीन नोंदी घेण्यात याव्यात.

·         कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमीत होणारे शासन परिपत्रक, आदेश, निर्णय व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे पत्र व आदेशाचे पालन करण्यास कसूर केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित संस्थेस जबाबदार धरुन तात्काळ संस्था सील करण्यात येईल. त्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

 

तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या सूचना व निर्देशाचे जो कोणी पालन करणार नाही अशा व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

 

या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

00000


84 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 138 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 84 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 138 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 92 बाधित आले.

 

आजच्या एकुण 802 अहवालापैकी  627 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 325 एवढी झाली असून यातील 2 हजार 561 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 580 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 182 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

सोमवार, 17 ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्य झाला.

            सोमवार, 18 ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील 68 वर्षाचा एक पुरुष , नांदेड तालुक्यातील सुगाव खुर्द येथील 65 वर्षाचा एक पुरुष , नायगाव तालुक्यातील कहाळा येथील 65 एक पुरुषाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 153 एवढी झाली आहे.  

  

आज बरे झालेल्या 84 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8,  हदगाव कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड सेंटर 2, किनवट कोविड सेंटर 3 , हिमायतनगर कोविड सेंटर 1, मुदखेड कोविड सेंटर 1, मुखेड कोविड सेंटर 2 , पंजाब भवन कोविड सेंटर 14, देगलूर कोविड केअर सेंटर 30, धर्माबाद कोविड सेंटर 5 एकूण 84 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 13, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 17, माहूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 1 , यवतमाळ 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, भोकर तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 4, नायगाव  तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 1, परभणी 1, हिंगोली 4 असे एकुण 46 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 24, हदगाव तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 30, नायगाव तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 2, आदिलाबाद 1 , भोकर तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 3, उमरी तालुक्यात 17, धर्माबाद तालुक्यात6, परभणी 1, हिंगोली 1 असे एकुण 92 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 580 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 196, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 684, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 111,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 65, लोहा कोविड केअर सेंटर येथे 41, हदगाव कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 92, किनवट कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 25,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 18, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 627,

घेतलेले स्वॅब- 30 हजार 566,

निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 563,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 138,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 325,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 153,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 561,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 580,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 104, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 182.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...