वृत्त क्र. 775
इसापूर धरणाचा पाणीसाठा 73 टक्क्याच्या पुढे
पेनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता
नांदेड (जिमाका) दि. 19 :- पुसद तालुक्यातील
पैनगंगा नदीवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर) धरण 73 टक्के भरले असून या
धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने धरणाच्या पाणी पातळीत अतिशय
वेगाने वाढत होत आहे. सध्या धरणात अंदाजे 753 घनमी / सेकंद इतका येवा येत आहे.
अशाच प्रमाणात येवा धरणात येत राहिल्यास येत्या 4 ते 5 दिवसात धरण शंभर टक्के
भरेल. इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पेनगंगा
नदीला पूर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नांदेड उर्ध्व
पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.
00000
No comments:
Post a Comment