Thursday, June 11, 2020

वृत्त क्र. 537



18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त
संबंधितांवर गुन्हा दाखल 
नांदेड (जिमाका) दि. 11 :- लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. के. ए. 38- 6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली. यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला.  गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील पडसावली (ता. आळंदा) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.  अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.  
000000


वृत्त क्र. 535



नांदेड जिल्ह्यात 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 
 बाधितांमध्ये 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश
दोन बाधित व्यक्ती बरे झाल्याने सुट्टी   
नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 21 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 224 वर पोहचली आहे. आज या 21 बाधितांपैकी 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 67, 62, 55, 52, 45, 41, 38, 35,28,26 व 16 वर्षाचे तीन पुरुष  तर महिलांमध्ये 52, 50, 38, 30, 28, 26 व 10, 3 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. पंजाब भवन यात्री निवास येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 139 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
गुरुवार 11 जून रोजी प्राप्त झालेल्या 89 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. नवीन 21 पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये चौफाळा भागातील 1 स्त्री (वय 52 वर्षे), फरांदेनगर भागातील 1 पुरुष (वय 52 वर्षे), खोजा कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 67 वर्षे), उमर कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 16 वर्षे), देगलूरनाका भागातील 2 व्यक्तींमध्ये 1 स्त्री (वय 26 वर्षे) व 1 पुरुष (वय 16 वर्षे), इतवारा भागातील 5 व्यक्तींपैकी 4 पुरुष (वय 16,26,28,62 वर्षे) व 1 स्त्री (वय 50 वर्षे), तसेच गुलजारबाग भागातील 8 व्यक्तींपैकी 3 पुरुष (वय 35,41,38 वर्षे) व 5 स्त्री (वय 3, 10,28,30,38 वर्षे) असे आहे. तसेच मुखेड शहरातील 2 पुरुषांपैकी होळकरनगर येथील 45 वर्षाचा 1 व्यक्ती तर विठ्ठलनगर परिसरातील 55 वर्षाचा 1 व्यक्तींचा यात समावेश आहे. या सर्व व्यक्तींची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.   
  औषधोपचार सुरु असलेल्या 74 बाधितांपैकी 3 व्यक्तींमध्ये 65 वर्षाची 1 महिला तर 74 व 38 वर्षाचे 2 पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकुण संख्या 11 झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 74 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 51, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर  1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 1 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे.  गुरुवार 11 जून रोजी 62 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 222, 
घेतलेले स्वॅब
 4 हजार 711, 
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 154, 
आज
 पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 21, 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 224, 
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या
 181, 
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
 
मृत्यू संख्या-
 11, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 139, 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती
 74, 
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 62 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000

वृत्त क्र. 534



जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 13.99 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात गुरुवार 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 223.84 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 47.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5.38 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 26.63 (85.89), मुदखेड- 15.67 (42.34), अर्धापूर- 12.00 (45.00), भोकर- 11.25 (62.50), उमरी- 3.00 (25.00), कंधार- 7.00 (39.17), लोहा- 13.83 (49.16), किनवट- 13.00 (29.28), माहूर- 17.75 (39.00), हदगाव- 10.71 (64.28), हिमायतनगर- 12.00 (71.67), देगलूर- 31.50 (65.26), बिलोली- 7.00 (21.00), धर्माबाद- 11.33 (41.99), नायगाव- 2.60 (24.00), मुखेड- 28.57 (60.99). आज अखेर पावसाची सरासरी 47.91 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 766.53) मिलीमीटर आहे.
00000

Wednesday, June 10, 2020

वृत्त क्र. 534


नांदेड शहरातील दहा व्यक्तींना कोरोनाची बाधा 
सहा महिन्याच्या बालकाचा समावेश
तीन बाधित बरे झाल्याने सुट्टी ; दोन व्यक्तींचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 10 :- नांदेड शहरात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 10 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 203 वर पोहचली आहे. आज या दहा बाधितांपैकी 8 पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 12, 43, 45, 47, 48, 54, 55 व सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. 5 व्यक्ती या इतवारा नांदेड या बाधित क्षेत्रातील असून 1 व्यक्ती मालेगाव रोड तर 2 व्यक्ती सिडको नांदेड  परिसरातील आणि 2 महिला वय वर्षे 50 व 10 असून त्यापैकी एक चौफाळा तर एक इतवारा नांदेड येथील आहे. यातील 9 व्यक्तींची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. यातील 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. या 3 व्यक्तीसह एकुण 137 व्यक्ती हे कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारा दरम्यान दोन बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात 65 वर्षाचा एक व्यक्ती इतवारा नांदेड व 45 वर्षाचा एक पुरुष हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील आहे. या रुग्णास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. औषधोपचार सुरु असलेल्या 55 बाधितांपैकी 3 व्यक्ती 65 वर्षे वयाची 1 स्त्री आणि दोन पुरुष अनुक्रमे 38 व 74 वर्षे वयाचे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 39, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. एक बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आला आहे. बुधवार 10 जून रोजी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 13, 
घेतलेले स्वॅब
 4 हजार 658, 
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 92, 
आज
 पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 10, 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 203, 
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या
 177, 
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-81,
 
मृत्यू संख्या-
 11, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 137, 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती
 55, 
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000

Tuesday, June 9, 2020

वृत्त क्र. 535



जिल्हा परिषदेची सोमवारी सर्वसाधारण सभा
नांदेड (जिमाका) दि. 9 :-  नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार 15 जून 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे व जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 524


महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 च्या
नियम 11 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना प्रसिद्ध
सूचना, हरकती सादर करण्याचे आवाहन  
नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 14 फेब्रुवारी 2020 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नियमांचा मसुदा
या नियमांना, “महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम, 2020” असे म्हणावे. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम, 11 च्या पोट-नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात, “रुपये 35,000” या मजकुराऐवजी “रुपये 8,00,000” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
या सुधारणेच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी त्या, या कार्यालयास सादर कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

Monday, June 8, 2020


वृत्त क्र. 523   
प्राणी संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
सदस्यांचा पुढाकार आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. विपीन  
नांदेड (जिमाका) दि. 8 :- प्राणी संरक्षण कायदाचे जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सदस्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिली. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन बोलत होते.   
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सखाराम खुणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, अशासकीय सदस्य डॉ. विजय लाड, शंकर कट्टी यांच्यासह शासकीय, अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.
मुक्या प्राणीमात्रांच्या अमानवीय पद्धतीने वाहतूकीचे प्रकार आजही सर्रास होतांना आढळतात. मानवतेच्या दृष्टिकोणातून विचार करता तसे पाहिले तर यासाठी कायदाच्या बडग्याची आवश्यकता नाही. तथापि असे प्रकार नियंत्रणात रहावे व मुक्या प्राण्यांना त्रास होऊ नये, प्राणीमात्रांचे संरक्षण व्हावे यासाठी भारतीय संविधानातील परिच्छेद क्र. 51 अ नुसार प्राणी संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे.  
00000


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...