मा. उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय येथे दिनांक २३.०३.२०२० ते दिनांक ३१.०३.२०२० पर्यंत आळीपाळीने न्यायीक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे. कोरोना हा साथीचा रोग संसर्गजन्य असून त्याचा फैलाव टाळण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुध्दा बदल करण्यात आला आहे.सध्या न्यायादानाची वेळ ही सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० अशी करण्यात आली आहे. या वेळेत फक्त रिमांड जामीन बाबतचे व अत्यावश्यक दावे ज्या मध्ये ०७ दिवसांच्या आत चौकशी साठी ठेवणे आवश्यक आहे. अशीच प्रकरणे ठेवण्याचे निर्देश मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिपक अ. धोळकिया यांनी सर्व न्यायाधीशांना दिले आहेत. पक्षकारांनी आपआपल्या प्रकरणांच्या तारखा घेण्यासाठी न्यायालयात येऊ नये व गर्दी करू नये असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. वकीलांनी व पक्षकारांनी त्यांच्या प्रकरणांच्या तारखा या जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरून घ्याव्यात व कोणताही पक्षकार सध्या तारखेला न्यायालयात हजर राहिला नाही तर त्या विरुद्ध कोणताही आदेश केला जाणार नाही आणि सर्व प्रकारच्या प्रकरणात चार आठवड्या नंतरच्या तारखा देण्यात येणार आहेत तरी पक्षकारांनी काळजी करू नये. सर्व पक्षकार आणि वकिलांनी सहकार्य करावे व लोक संपर्क टाळावा असे अवाहन मा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी केले आहे
Saturday, March 21, 2020
Friday, March 20, 2020
जिल्ह्यातील
सर्व आस्थापना, दुकाने
21 व 22 मार्चला बंद ठेवण्याचे आदेश
21 व 22 मार्चला बंद ठेवण्याचे आदेश
नांदेड
दि. 20 :- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग
म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शनिवार 21 मार्च व रविवार
22 मार्च 2020 रोजी नांदेड जिल्ह्यात अत्यावश्यक
सेवा देणाऱ्या आस्थापनांना वगळून इतर सर्व प्रकारचे आस्थापना व दुकाने बंद
ठेवण्याचे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
यात
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली
असून शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना,
सर्व बँका, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरवठा
करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना,
दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने,
विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोलियम व ऊर्जा
संसाधने, सर्व प्रसार माध्यमे व अत्यावश्यक सेवा पुरविणारे माहिती तंत्रज्ञान
संस्था, आपात्कालीन / अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश
दिले आहेत.
या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून
कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड 19
उपायोजना नियम 2020 मधील तरतुदी व आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 च्या कलम 51 व
इतर अनुषंगिक कायदानुसार कारवाई करण्यात येईल.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने /
आस्थापनाधारका विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल,
असेही आदेशात नमूद केले आहे.
00000
मद्य
विक्रीचे दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
नांदेड
दि. 20 :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142
(1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3),
विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4), बिअर
विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2 अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ
ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती शनिवार 21 मार्च ते मंगळवार 31 मार्च 2020
रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले
आहेत.
या
आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949
चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात
नमूद केले आहे.
00000
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 व 22 मार्चला
मराठवाडयातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा
एक भाग म्हणून नागरिकांची
एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी
दि.
21 व
22 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता
सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या
सूचना औरंगाबाद विभागीय
आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाडयातील आठही
जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाचा प्रादूर्भाव
टाळण्यासाठी मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांनी आज व्हीसीव्दारे
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी
यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर
तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा
प्रादूर्भाव व प्रसार यात
झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला
रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद
पाळणे आवश्यक आहे. दि. 21 व 22 मार्च रोजी
जनतेने घराबाहेर पडू नये, अशी सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी मराठवाडयातील
आठही जिल्हयांतील अत्यावश्यक
सेवा वगळता सर्व आस्थापना
बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर दोन दिवसांच्या
बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात
आले आहे. यामध्ये शासकीय/निमशासकीय
कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी
निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व
बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा
पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक
व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा
पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधे
दुकाने, विदयुत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम
व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक
सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना
वगळून आठही जिल्हयांतील सर्व
आस्थापना व दुकाने दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी
बंद ठेवावेत, असे विभागीय
आयुक्तांनी सूचित केले आहे.
******
कोरोना विषाणू प्रसारावरील
प्रतिबंधात्मक उपाय
रास्तभाव दुकानामध्ये
घ्यावयाची दक्षता
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणूचा प्रसार तसेच सार्वजनिक वितरण
व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून
रास्तभाव दुकानातून शिधावस्तुचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी
न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा
ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारामार्फत धान्य
मिळवणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट / अंगठा लावण्याची
आवश्यकता राहणार नाही.
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी
लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानावर गर्दी न करता रास्त भाव दुकानदार अन्न-धान्य
वितरणासाठी पात्र लाभार्थी यांना ज्याप्रमाणे टोकन देवून ज्या नियोजितवेळी
दुकानावर धान्य घेण्यासाठी यावे अशा सुचना देतील, त्याचवेळेस रास्त भाव दुकानात
जावून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थ्यांनी रास्त
भाव दुकानात उचीत अंतर ठेवून रांगेत उभे राहतील. याची दक्षता रास्तभाव दुकानदार व लाभार्थ्यांनी
घ्यावी, ही सुविधा 31 मार्च 2020 पर्यंत लागू राहील.
लाभार्थ्यांना मार्च 2020 कालावधीत धान्य
मिळण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधीत तहसिल कार्यालयास दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधीत कार्यालयास ईमेल करावा अथवा जिल्हा पुरवठा
अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाशी दुरध्वनीवरुन संपर्क अथवा ईमेल करावा, असे
आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
कोरोना विषाणू प्रसारावरील
प्रतिबंधात्मक उपाय
कार्यालयातील उपस्थिती
नियंत्रित करण्याबाबत आदेश
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणू
प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी,
कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे
तातडीचे व महत्वाचे काम चालू राहण्याचे दृष्टीने संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय
प्रमुखांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात
न बोलवता त्यांना आळीपाळीने 50 टक्के बोलवावे. (यामध्ये सुट देत असताना भेदभाव
होणार नाही याअनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची जन्म दिनांकाची सम / विषम दिनांक
लक्षात घ्यावी परंतू यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाही याची देखील दक्षता
घ्यावी). सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल
आयडी, कार्यालयास उपलब्ध करुन दयावा. तसेच त्या पत्त्यावर ते उपलब्ध आहेत याची
दक्षता घ्यावी. कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्यास त्यांना
त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहील.
हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच त्यांच्या प्रशासकिय नियंत्रणाखालील
कार्यालयांना लागू राहणार नाही. त्याचप्रमाणे क्षेत्रिय स्तरावर ज्या अधिकारी,
कर्मचारी त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते
अशा कार्यालयांना त्याचप्रमाणे आपत्कालीन, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांना
हा आदेश लागू राहणार नाही.
सामान्य प्रशासन विभागाचा 18 मार्च 2020
रोजीचा शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीचे पालन करणे संबंधीत अधिकारी,
कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासकीय
कार्यालयांना 31 मार्च 2020 पर्यंत आपतकालीन परिस्थिती म्हणून लागू राहील, असेही
आदेशात नमूद केले आहे.
000000
वेतन पडताळणी पथकाचे कामकाज
5 एप्रिल पर्यंत बंद राहणार
नांदेड दि. 20 :- सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय
दिनांक 18
मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणुंचा संभाव्य
प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासकीय
निर्देशानुसार वेतन पडताळणी पथक, सहसंचालक कार्यालय, औरंगाबाद येथे सेवापुस्तकांची देवाण-घेवाण दि.05 एप्रिल
2020 पर्यंत बंद करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद
घ्यावी असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...