Tuesday, October 1, 2019


दिव्यांगांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- सर्व दिव्यांग बांधवांना जाहिर आवाहन करण्यात येते की, विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात,‘‘लोकशाही व निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविणे’’ बाबत आपण आपल्या नजीकच्या मतदार केंद्रातील बी.एल.ओ.कडे जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन आपले नाव सदर मतदार यादीत दिव्यांग प्रवर्गाच्या नोंदी मार्क/ टिक/ फ्लॅगींग करुन घेऊन भारतीय लोकशाही निवडणूक बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवून मोठया प्रमाणत मतदान करुन भारताची लोकशाही  बळकट करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग लातूर यांनी केले आहे.
00000



लोकशाही मजबुतीसाठी
दिव्‍यांग मतदारांचा मतदानातील सहभाग आवश्‍यक
नांदेड दि. 1 :- भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी व प्रबळ लोकशाही आहे. सामान्‍य मतदार लोकशाहीचा आधार असतो म्‍हणुन जेवढे जास्‍त नागरीक मतदान प्रक्रीयेत सहभागी होतात तेवढी ती यशस्‍वी समजली जाते. मतदान प्रक्रीयेत सर्व दिव्‍यांग मतदारांनी सहभागी होण्‍याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2019 साठी भारतीय निवडणुक आयोगाने 21 ऑक्‍टोंबर 2019 रोजी होत असलेल्‍या मतदानासाठी दिव्‍यांग मतदारांचा सहभाग वाढविण्‍यासंदर्भात निवडणुक आयोगाने दिव्‍यांग मतदार जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
आयोगाने या संदर्भात दिव्‍यांग मतदारांसाठी काही विशेष उपक्रम हाती घेतले असून या देशातील वय वर्ष अठरा पुर्ण करणारा प्रत्‍येक नागरीक मतदान प्रक्रीयेत भाग घेवु शकतो. प्रत्‍येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्‍यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्‍येक दिव्‍यांग मतदारांमध्ये वाढली पाहीजे यादृष्‍टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा भाग म्‍हणुन मतदान केंद्रावर विशेष सोई-सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. स्‍वतंत्र वाहतुक व्‍यवस्‍था, व्‍हील चेअर, रॅम्‍प, मदतनीस, पिण्‍याचे पाणी, ब्रेललिपीतील मतपत्रीका तसेच इतर सुविधा पुरविण्‍यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 087- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार अरुण ज-हाड, नायब तहसीलदार सौ. उर्मीला कुलकणी, पीडब्‍लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा.डॅा.सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील हे परीश्रम घेत आहेत.
00000


सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
            नांदेड दि. 1 :- आगामी महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता नांदेड जिल्‍ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात प्रत्‍येकी तीन प्रमाणे खालील प्रमाणे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती पुढील प्रमाणे करण्‍यात आली आहे.
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्री. नरेंद्र देशमुख
तहसिलदार  किनवट
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्री. सर्वेश मेश्राम
तहसिलदार माहूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्रीमती विद्या कदम
मुख्‍याधिकारी न.प.किनवट
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्रीमती मृणाल जाधव
तहसिलदार  हदगाव
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्री. एन.बी. जाधव
तहसिलदार हिमायतनगर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्री. अर्जून गव्‍हाणे
मुख्‍याधिकारी न.प. हदगाव
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. भरत सुर्यवंशी
तहसिलदार  भोकर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. दिनेश झांपले
तहसिलदार मुदखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. सुजीत नरहरे
तहसिलदार अर्धापूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86-नांदेड उत्‍तर
श्री. आर.डब्‍लू. मिटकरी
सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86 - नांदेड उत्‍तर
श्रीमती वैशाली पाटील
तहसिलदार संगायो, जि.अ.का. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86 - नांदेड उत्‍तर
श्री. प्रसाद कुलकर्णी
तहसिलदार सामान्‍य, जि.अ.का. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्री. अरुण ज-हाड
तहसिलदार  नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्रीमती गीता रमेश ठाकरे
उप आयुक्‍त(प्रशा.), नांदेड वाघाळा शहर म.न.पा. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्रीमती सविता खरपे-हटकर
उप आयुक्‍त(विकास), नांदेड वाघाळा शहर म.न.पा. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्री. विठ्ठल परळीकर
तहसिलदार  लोहा
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्री. सखाराम मांडवगडे
तहसिलदार कंधार
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्रीमती सोनाली राठोड
मुख्‍याधिकारी न.प. लोहा
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्रीमती सुरेखा नांदे
तहसिलदार  नायगाव  (खै)
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्री. डी.एन. शिंदे
तहसिलदार धर्माबाद
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्री. एम.एन. बोथीकर
तहसिलदार  उमरी
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. अरविंद बोळंगे
तहसिलदार  देगलूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. विक्रम राजपूत
तहसिलदार  बिलोली
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. प्रशांत व्‍हटकर
मुख्‍याधिकारी न.प. बिलोली
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. के.एच. पाटील
तहसिलदार  मुखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. मंगेश देवरे
मुख्‍याधिकारी न.प. मुखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. रामराजे कापरे
मुख्‍याधिकारी न.प. देगलूर
            करीता याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन  जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


भरारी पथकाकडून जप्त केलेल्या
रक्कमाबाबत कार्यवाहीसाठी समिती  
नांदेड दि. 1 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने पोलीस / स्थिर संनियंत्रण चमू / भरारी पथकाकडून जप्त केलेल्या रक्कमाबाबत कार्यवाही करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकताच आदेश निर्गमीत केला आहे.  
या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सनियंत्रण अधिकारी तथा समिती निमत्रंक (मो. 8329140551, 9970379615), कोषागार अधिकारी अभय चौधरी यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या रक्कमांबाबत समितीने प्रमाण कार्यपद्धतीनुसार राजकयी पक्षाशी सबधीत आहे किंवा नाही हे पाहून जप्तीबाबत निर्णय घ्यावा, अशी सोपवून दिलेली कामे यात आहेत.
00000

Monday, September 30, 2019


86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांसाठी
निवडणूक विषयक पहिल्या सामुहीक प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 30 :- निवडणूकीसाठी 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्‍त मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण 2 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत डॉ.शंकराराव चव्‍हाण प्रेक्षागृह, स्‍टेडीयम जवळ, नांदेड येथे आयोजीत केले आहे. तसेच या कालावधीत प्रत्‍यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देखील दुपारी 12 ते सायंकाळी 6 या कालावधीत स्‍पर्धा परीक्षा अभ्‍यासिका, शासकीय ग्रंथालय इमारत स्‍टेडीयम परिसर येथे आयोजीत करण्‍यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 21 सप्‍टेंबर 2019 च्‍या प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये घोषित केला आहे. 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळित व कालमार्यादेत पार पाडण्‍यासाठी विविध पथके तयार करण्‍यात येवून या पथकात नमुद केल्‍याप्रमाणे पथकातील प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांच्‍या नेमणुका करण्‍यात आल्‍या आहेत.
या निवडणूकीसाठी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्‍त मतदान केंद्राध्‍यक्ष तसेच मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी  नमूद प्रशिक्षणाची नोंद घेऊन प्रशिक्षणास उपस्थित राहावे. तसेच या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या अधिकारी / कर्मचारी यांच्‍या भारतीय लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. असे  86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री सदाशिव पडदुणे यांच्‍यावतीने कळविले आहे.
000000




दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30:- दिपावली उत्‍सव दिनांक 27 ऑक्टोंबर 2019 ते 29 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 7 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख 7 ऑक्‍टोंबर 2019 आहे. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.  नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्‍थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.
जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत/मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणा-या परवान्‍यातील नमूद ज्‍या अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र.दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील1.अग्निशमन दल 2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 12 ऑक्टोबर, 2019 व 14 ऑक्टोबर,2019 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.   
            दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.
0000



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...