Thursday, April 26, 2018


मन करा रे शांत !
तुमचा दिवस त्रासात जातआहे?.  तर मग येथे मन शांत आणि लक्ष केंद्रित करण्याची १५ मिनिटाची पध्दत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतय का.
काही दिवस सगळ्या गोष्टी हाताबाहेर जात असतात. कामाचा ताण वाढत राहतो आणि काय करावे हे सुचत नाही. सततची येणारी कामे, अडचणी आणि लोक यांनी तुम्ही त्रासून जाता. शरीर काम करीत असत पण मनात एक वेगळे वादळ उठत असत. काहीच नीट नाही, हि भावना सर्व शक्ती शीण करीत असते.
दिवस अखेरीस, आपल्याला जड आणि तणाव पूर्ण वाटते. त्याहून वाईट म्हणजे, आपण काही तरी महत्वाचे विसरत नाहीना असे वारंवार वाटत राहते. आपण आपला मेंदू बंद करू शकत नाही, विचारांना आवर घालता येत नाही.
याचाच परिणाम म्हणून आपण घरी आल्यावर मुलांवर किंवा इतर लोकांवर चिडचिड करतो. आपला संपूर्ण तणाव मग घरच्यांवर निघतो, जे योग्य नाही. खाली नमूद असलेले साधे आणि सोपे उपाय १५ मिनिटात तुम्हाला प्रफुलीत करु शकतात.
५ मिनिटांची शारीरिक हालचाल
आधीच कार्यालयात कामे करताना आपले रक्त चांगलेच खवळले आहे तरी इमारतीच्या भवती जलद चालणे फायदेशीर ठरेल. हा एक ब्रेक आपल्या मनात उर्जा निर्माण करेल आणि मूड लिफ्ट करुन ताण खंडित होईल. लक्ष वेगळीकडे वळवल्याने मन शांत होईल आणि तुम्हाला हलके वाटेल. शरीराला आणि मनाला बदल मिळेल.
 ४ मिनिटांची कृतज्ञता
आता आपल्या शरीरात हरलेल्या प्राण परत आले आहे. आपण आपले विचार साफ करण्याची सुरुवात करु शकता. आपण हे सर्व का करीत आहोत हे लक्षात घ्या. आपले जीवन मूल्यवान आहे आणि आपल्याला सुमारे किती लोकांचे समर्थन लाभले आहे ह्याचा विचार करा. त्या सर्व लोकांचे आपण आभारी आहोत हि जाणीव कायम लक्षात ठेवा. चांगले आरोग्य, चांगली संधी आणि सुंदर वास्तव्य याच्याबदल कृतज्ञ राहा. आपण एक व्यापक दृष्टिकोन बाळगा. निवडक गोष्टींची टीप लिहून ठेवा. सध्या दुसऱ्या कामाची गरज नाही, महत्वाचे काम संपवा.
३ मिनिटाचे ध्यान
आता आपले शरीर आणि मन एका सकारात्मक स्थितीत आहेत. साफ मनाने आपले काम करु शकता. ध्यान हे स्वछ विचार आणि आपले केंद्र शोधण्याचे उत्तम साधन आहे. तुम्ही भरपूर गोष्टी ध्यान करण्यासाठी वापरु शकता. कोणी प्रार्थना म्हणत तर कोणी पाय हलवत एखाद गानं गुणगुणत. तुम्ही इंटरनेटवर छान सचित्र किंवा बातम्या वाचू शकता. ह्या सर्व गोष्टींचे तात्पर्य हे कि आपले मन शांत आणि सुखद झाले पाहिजे.
२ मिनिटाची शांतता
आता आपल्या मनात स्पष्ट करुन टाका की शांतता हवी.  तुम्ही बस एक शांत जागा शोधा आणि तिथे थोडा वेळ शांत बसा. आपल्या डेस्क येथील आपले फोन, दिवे, संगणक आणि सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दोन मिनिटे बंद ठेवा.सर्व प्रेरणा बाहेर अवरोधित करा. स्वत: बरोबर एकटे राहा आणि आपले लक्ष शांततेकडे केंद्रित करा. फोनमध्ये दोन मिनिटाचा टाइमर सेट करा आणि शांत बसा. आता तुम्ही थंड आणि शांत आहात हे स्पष्ट होईल.
१ मिनिटाचा खोल श्वास
आता शांतपणे शेवटी एक मिनिट उभे रहा. अर्थात, तुम्हाला माहीत आहे की परत कामाला जुंपायचे आहे म्हणून ६० सेकंद दीर्घ श्वास घ्या. आपले पूर्ण लक्ष्य मंद श्वासाकडे केंद्रित करा. एका मिनिटाचा श्वास व्यायाम तुम्हाला ताजं आणि उत्साही बनवेल.आता जागेवर जाऊन परत काम सुरु करायचे आहे. हे काम त्रास न घेता करायचे आहे असा चंग बांधा आणि कामावर नवीन जोमाने रुजू व्हा.
हे सर्व उपाय तुम्हाला शरीर आणि मन शांत करण्यास मदत करतील.चला तर मग सुरुवात करूया.!
सुजाता चंद्रकांत
******************

Wednesday, April 25, 2018


किटक नाशकाचा सुरक्षीत वापराची 

माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी

-  मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे  

नांदेड, दि. 25:-  किटक नाशकाचा सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

खरीप हंगाम नियोजन व किटक नाशकाचा सुरक्षित वापर या विषयावर कार्यशाळा येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. शिनगारे बोलत होते.  

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक एच. आर. गुंटूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि अधिकारी पंडित मोरे, जिल्हा सिड्स फर्टिलायझर ॲन्ड पेस्टीसहाऊस असोशिएशनचे अध्यक्ष मुधकर मामडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय भरगंडे सेवानिवृत्त मोहिम अधिकारी अनंत हांडे, बीएएसएफ देवानंद जाधव, मोनसॅन्टो प्रतापसिंह काळे, एन्टोमॉलॉजीस्ट का. सं. के. डॉ. शिवाजी तेलंग , कृषी उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.  

श्री. शिनगारे पुढे म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून सर्वांना शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी विक्रेते, गुणनियंत्रण अधिकारी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किटक नाशकाचा सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. तसेच विषबाधाची घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. शेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विक्रेते , कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी मोहिम स्वरुपात काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  

डॉ. मोटे यांनी अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक असल्याचे सांगून शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असल्याचेही सांगितले. तसेच यावेळी कायदेविषयक, परवाना विषयक, किटक नाशकांचा सुरक्षित वापर, विषबाधा झाल्यास लक्षणे आणि उपाययोजनेची माहिती दिली.

कार्यशाळेच्या प्रारंभी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली. यावेळी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी कॅलेंडरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील गुणनियंत्रण निरीक्षक, कृषि निविष्ठा विक्रेते, विविध कंपन्याचे प्रतिनिधी , शेतकरी उपस्थित होते.

****








दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांचा आढाव...