Sunday, January 25, 2026

 वृत्त क्र. 133 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "हिंद दी चादर" शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड येथे आगमन 

नांदेड,दि. 25 (जिमाका) “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आगमन होताच विमानतळ परिसरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.भागवत कराड,खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड,राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पर्यावरण मंत्री श्रीमती. पंकजा मुंडे व आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नांदेड येथे आगमन झाले.त्यानंतर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

000000

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी”
“बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन
नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.
आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी
आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश दिला जात आहे.
000

 वृत्त क्र. 132 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन 

नांदेड दि. 25 (जिमाका) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळ येथे बारामती येथून विमानाने आगमन झाले.त्यांच्या आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. 

श्री.अजित पवार यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन त्याचे स्वागत केले. 

उपमुख्यमंत्री श्री.पवार हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शासकीय वाहनाने रवाना झाले.

*****

वृत्त क्र. 131 

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी” 

“बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन 

नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी    “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. 

आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.  

देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. 

भाविकांच्या सोयीसाठी 

आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश दिला जात आहे.

000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...