Wednesday, January 1, 2025

वृत्त क्रमांक 4

सन 2025 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे

करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड दि. 1 जानेवारी :-  राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दिनांक 27 डिसेंबर 2024 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रकातील परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 3

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड दि. 1 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 2 जानेवारी 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 16 जानेवारी 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 2 जानेवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 16 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

 वृत्त क्रमांक 2

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड दि. 1 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 1

जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप

                                                                                                                                                                          नांदेड, दि. 1 जानेवारी :-  महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे  यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी या टॅबचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा. तसेच जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी टॅबमार्फत प्रशिक्षण घ्यावे. यासाठी महाज्योती मार्फत सिमकार्डही उपलब्ध करुन दिले आहेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले.

इयत्ता 11 वी मध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटीची तयारी करणारे विद्यार्थ्यानी ऑनलाईन महाज्योती यावेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा. त्यामध्ये इयत्ता १० वीचे गुणपत्रक व इ. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत, ज्यास्तीत जास्त विद्यार्थी टॅबसाठी पात्र ठरतील असे आवाहन त्यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यानी टॅबचा सदुपयोग चांगल्या प्रकारे घेऊन त्याद्वारे घेण्यात येणारे प्रशिक्षणाचा फायदा घेऊन वैद्यकीय/अभियांत्रिकी प्रवेशासाठी समाज घटकातील विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील अशी सदिच्छा व्यक्त केली.

विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्ग याघटकातील विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगामध्ये टिकूण राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ताधारण करणे, विद्यार्थी / विद्यार्थीनिना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकद्ष्टया उन्नती होणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले. टॅब वितरण प्रसंगी, विद्यार्थी, पालक कार्यालयातील कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

00000

 #नववर्ष२०२५ #newyear2025




Tuesday, December 31, 2024

 वृत्त क्र. 1245

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार

#ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
#नांदेड दि. 31 डिसेंबर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे येथील आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
या परिपत्रकानुसार नांदेड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक साखर विश्वास देशमुख यांनी केले आहे.
भाऊराव चव्हाण ससाका लि. लक्मींअनगर, देगाव-येळेगाव, ता. अर्धापूर साठी शेतकी अधिकारी आर.टी. हरकळ मो. 9881066017, सुभाष शुगर प्रा. लि. हडसनी, ता. हदगावसाठी मुख्य शेतकी अधिकारी के.बी.वानखेडे मो. 94223436621 , एम.व्ही.के.ॲग्रो फुडस प्राडक्टस लि. वाघलवाडा, ता. उमरी, तज्ञ संचालक प्रतिनिधी पी.डी.पुयड यांचा मो. क्र. 9922012751, शिवाजी सर्व्हीस स्टेशन मांजरी-बाऱ्हाळी , ता. मुखेडसाठी शेतकी अधिकारी एस.जी.माळेगावे यांचा मो. क्र. 9359164388, कुटूंरकर शुगर ॲन्ड ॲग्रो प्रा.ली. कुंटूर, ता. नायगांव, मुख्य शेतकी अधिकारी एस.डी. देशमुख यांचा मो. क्र. 9423508437, ट्वेंटीवन शुगर्स लि.पो.शिवणी, ता. लोहा मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. शिंदे मो. क्र. 7588062873 यांचेशी संपर्क साधावा.
ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू / सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते / ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.
राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणुक करुन तक्रारनिवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गटऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट-अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे.
तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी. सदर तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचा rjdsnanded@rediffmail.com ईमेलवर तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
00000

 वृत्त क्र. 1244

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठीप्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 31 डिसेंबर:  क्रीडाव युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फतनांदेड जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यापुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन 2020-21, 2021-22,2022-23 व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छूक खेळाडू व मार्गदर्शकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 12 जानेवारी 2025पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्जप्राप्त करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा मो. क्र. 7517536227या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरेयांनी केले आहे. 

जिल्ह्यातील गुणवंतक्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/योगदानाचेमुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणाघ्यावी या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त करण्यासाठीकेलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील 1 जुलै ते 30 जून दरम्यानच्या कालावधी गृहीतधरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडू-1(पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह वरोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मार्गदर्शक हा मागील 10 वर्षातकिमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते  तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)  मधील राष्ट्रीयस्तरापर्यतचे पदक विजेते खेळाडूतयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासपात्र राहील. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील 5 वर्षातील उत्कृष्ट ठरणारी 3 वर्षाचीकामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शनासाठी सांघीक अथवा वैयक्तीक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्वकेलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यत यश मिळविणारेकिमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडू किती वर्षेप्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शनकेलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

खेळाडू पुरस्कारासाठीपात्र क्रीडा प्रकार-ॲथेलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/कनोईंग,सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग,गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स रायडींग, लॉनटेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण)डायव्हीग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉर्डन, पेंटॅथलॉन, रग्बी,रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग,कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल,कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आट्यापाट्या,बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्डस्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. 

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...